“मंदीमध्येच असते फायदा कमावण्याची खरी संधी”: इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्या टिप्स
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शेयर मार्केट म्हंटलं की अजूनही कित्येक लोकांच्या मनात जुगार किंवा सट्टाबाजार असंच चित्र निर्माण होतं. पण शेयर मार्केट म्हणजे “२५ दिवसांत पैसे डबल” अशी काही स्कीम नाहीये, शेयर मार्केटमधून पैसे कामवायचे असतील तर त्यासाठी बराच अभ्यास गरजेचा असतो.
सध्याच्या काळातल्या तरुण वर्गाकडे आधीच्या पिढीसारखे रिटायरमेंट प्लॅन्स नाहीत, त्यामुळे सध्याच्या नोकरदार वर्गासमोर नोकरी करत असतानाच स्वतःच्या भविष्याची तजवीज करायचं टेंशन असतं. याचसाठी शेयर मार्केटशिवाय गत्यंतर नाही हे आपण सगळेच जाणतो!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शेयर मार्केटशी निगडीत अशीच काही माहिती आपण आजच्या लेखातून इन्वेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नीरज बोरगावकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!
युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.
आज नेमक्या मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या, कोणत्या शेयरने बाजी मारली, किंवा मंदी असूनही मार्केटमधून नेमका कसा नफा मिळवता येईल याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया नीरज बोरगांवकर यांच्याकडून!
===
दिनांक – ७ मार्च २०२२
निफ्टी – १५८६३.१५ (-३८२.२०)
सेन्सेक्स – ५२८४२.७५ (-१४९१.०६)
बॅंकनिफ्टी – ३२८७१.२५ (-१५३६.५५)
गोल्ड – ५४८२०
यु एस डॉलर – ७७.१२
आजचे निफ्टी High Low – १५७११.४५ – १५९४४.६०
निफ्टीमधील टॉप गेनर्स – ONGC , HINDALCO , COALINDIA , BHARTIARTL , UPL
निफ्टीमधील टॉप लूझर्स – INDUSINDBK , MARUTI , AXISBANK , BRITANNIA , BAJAJFINSV
मंदीमधील संधी!
सध्याच्या बाजारामधील परिस्थितीमध्ये नेमके काय करावे असा प्रश्न बर्याच जणांच्या मनामध्ये आहे. शेअर बाजारामध्ये काम करताना आपल्याला डायनॅमिक रहावे लागते. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवण्याची क्षमता असणे हा एका ट्रेडरसाठीचा अत्यावश्यक गुण आहे.
बाजारामध्ये सध्या युद्धामुळे एक नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुमारे ३८० पॉईंट्स गॅप-डाऊन उघडला. दिवसभर बाजार अत्यंत व्होलटाईल होता.
सध्या जसा काळ सुरु आहे त्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडर्सनी काही काळजी घेणे आवश्यक असते. शेअर बाजारामध्ये जेव्हा सातत्यपूर्वक “गॅप-अप्स” आणि “गॅप-डाऊन्स” बघायला मिळतात अश्या वेळी बाजारामध्ये “नेकेड पोझिशन्स” घेणे टाळले पाहिजे.
नेकेड पोझिशन्स कोणत्या कोणत्या असतात?
* फ्युचर कॉंट्रॅक्ट खरेदी करणे
* फ्युचर कॉंट्रॅक्ट शॉर्ट सेल करणे
* कॉल ऑप्शन खरेदी करणे
* कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करणे
* पुट ऑप्शन खरेदी करणे
* पुट ऑप्शन शॉर्ट सेल करणे
वर दिलेल्यापैकी काही पोझिशन्स समजा आपण घेतल्या आणि दुसर्या दिवशी बाजार गॅप-अप किंवा गॅप डाऊन उघडला तर यामध्ये प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
–
–
मग अश्या बाजारामध्ये कोणत्या पोझिशन्स घ्याव्यात?
अश्या प्रकारच्या व्होलटाईल बाजारामध्ये प्रॉफिट मिळवण्याच्या खर्या संधी लपलेल्या असतात. ऑप्शन्समध्ये कॉम्बिनेशन ठरवून काम करण्याचे काही प्रकार आहेत.
हे प्रकार जर आपण वापरले तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण सुंदर असे रिझल्ट्स मिळवू शकतो. पुढे काही कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज्ची यादी देत आहे
* बुल कॉल स्प्रेड
* बेअर पुट स्प्रेड
* बेअर कॉल स्प्रेड
* बुल पुट स्प्रेड
* आयर्न बटरफ्लाय
वर दिलेली नावे ही वेगवेगळ्या ऑप्शन स्ट्रॅटेजीज्ची नावे आहेत. अश्या स्ट्रॅटेजीज वापरुन काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोझिशन घेतानाच आपण आपला अधिकतम नफा आणि अधिकतम नुकसान हे जाणून घेऊ शकतो. यामुळे काम करताना आपल्याला टेन्शन येत नाही आणि बाजारामधील सुंदर संधीचा आपण उत्तम प्रकारे लाभ मिळवू शकतो.
वर दिलेल्या पद्धतींची नावे ही समजण्यास अवघड वाटत असली तरी प्रत्यक्षात या पद्धती आत्मसात करणे अतिशय सोपे आहे. फ्युचर्स ऑप्शन्सचे कार्य कसे चालते याचे थोडेसे बेसिक जर आपण शिकून घेतले तर सहजरित्या आपण या पद्धती वापरुन काम करु शकतो.
अश्या पद्धती वापरुन काम करण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामध्ये आपल्याला तुलनेने कमी भांडवल गुंतवावे लागते.
या सर्व पद्धती किचकट इंग्रजी भाषेमध्ये शिकायच्या असतील तर तुम्ही गूगलवर वर दिलेली नावे शोधून शिकू शकता. किंवा या सर्व पद्धती सोप्या मराठी भाषेमध्ये शिकायच्या असतील तर तुम्ही “गुंतवणूक कट्टा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” हा ऑनलाईन कोर्स जॉईन करु शकता. (पेड कोर्स आहे, पण वर्थ आहे!)
आजवर आपल्या या कोर्समध्ये एकवीस हजारांहून अधिक मराठी व्यक्ती सहभागी झालेल्या आहेत आणि उत्तम प्रकारे शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेत आहेत. हा एक लाईफटाईम अॅक्सेस असलेला ऑनलाईन कोर्स आहे
या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. पुढील लिंकवर जाऊन तुम्ही या वेबिनारसाठी रजिस्टर करु शकता. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल.
वेबिनार रजिस्ट्रेशनसाठी या लिंकवर जरूर क्लिक करा – https://marathimarket.in/register
===
टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.