लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ : रशियन KGB च्या कपटाचा परिपाक?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – तुषार दामगुडे
===
लाल बहादूर शास्त्री यांचा मूत्यू म्हणजे आजही एक न उलगडलेलं कोडं आहे. त्या काळातले काही संदर्भ तुम्हाला माहीतच असतील त्यामुळे थोडक्यात महत्वाच्या मुद्द्यांवर लिहितो. शास्त्रीजी पंतप्रधान असताना पाकिस्तानी आक्रमण झाल्यावर शरीराने पाच फुट उंचीच्या या कणखर नेत्याचे वाक्य होते
हम हथियार का जवाब हथियार से देंगे, हम रहे या ना रहे, यह देश बना रहे, यह झंडा लहराता रहे!
झालेल्या युद्धात सपाटून मार खाल्ल्यावर पाकिस्तानने हा विषय युनोच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित केला. विषयांतर न करण्याची तंबी मिळुनही पाकिस्तानी प्रतिनिधी झुल्फिकार अली भुत्तो वारंवार काश्मीर विषय भाषणात मांडत होता. याचा निषेध म्हणुन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी सभात्यागाचा निर्णय घेतला हे पाहून झुल्फीकार भुत्तो
हे भारतीय कुत्रे सुरक्षा परिषदेतून चाललेत, पण काश्मीरमधून जायचे नाव घेत नाहीत
असे ओरडला. यामुळे परिस्थिती तणावपुर्ण बनली. या स्फोटक परिस्थितीत भारत पाक मध्ये मध्यस्थी करण्यास कोणीच तयार नव्हते, अशा वेळी रशियाने पुढाकार घेतला. यामागे अमेरिकेच्या गोटात सामील झालेल्या पाकला आपल्या कळपात ओढुन घ्यायचा डाव रशियाचा होता. या त्रिसदस्यीय चर्चेसाठी शास्त्रीजी ताश्कंदला जायच्या तयारीला लागले.
त्यांची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबातील कोणीतरी असे, त्याप्रमाणे त्यांचा पुत्र अनिल जाण्यास तयार झाला. पण अचानक शास्त्रीजींनी कुणालाही बरोबर न येण्याचे फर्माविले.
या विषयावर शास्त्रीजींनी यशवंतराव चव्हाणांशी चर्चा करून पाक जोपर्यंत युद्धविरामाचे लेखी आश्वासन देत नाही, तोवर भारताच्या ताब्यात आलेला भूप्रदेश पाकिस्तानला द्यायचा नाही असे ठरवले.
तर तिकडे पाकने चर्चेचं गाडं काश्मिराभोवती ठेवून भारताकडुन मिळेल ते पदरात पाडून घेण्याचं ठरवल.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
दोन्ही पंतप्रधान रशियात दाखल झाल्यावर पाकिस्तानी पंतप्रधान अयुब खानने शास्त्रीजींशी समोरासमोर हात मिळवण्याचेही टाळले. हे पाहून रशियन राष्ट्र प्रमुख कोसिजिन यांनी अयुब खान यांना फैलावर घेतले. तेव्हा त्यांनी हातात हात मिळवला, असा हा पाकिस्तानी माजोरीपणा.
न्युट्रल विला येथे झालेल्या चर्चेत रशियाचे कोसिजिन यांनी आपल्या भाषणात एकूण २६ वेळा भारत-पाक देशाचे नाव घेतले. त्यात १३ वेळा भारत आणि १३ वेळा पाकचे नाव घेऊन दोन्ही राष्ट्रांविषयी रशियाच्या समान दृष्टिकोनाचे दर्शन दिले.
परंतु अमेरिकन मांडीवर बसलेल्या पाकला आपल्या गोटात खेचायचे तर पाकला झुकते माप द्यायचे हे त्यांनी आधीच मनाशी ठरविले होते.
कोसिजिन आणि शास्त्रीजी यांच्यात रात्री साडे आठला झालेल्या चर्चेत भारताने जिंकलेला हाजी पीर घाट, सियालकोट, लाहोर आदी प्रदेश विनाशर्त परत करावेत असा आग्रह धरला, अन्यथा रशिया चर्चेतून आपले अंग काढुन घेईल असे सुचविले.
–
- ”शास्त्रीजी एकदा नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात…”
- कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’
–
परिस्थिती नाजूक असल्याने होकार देण्याशिवाय शास्त्रीजींना पर्याय उरला नाही. १० जानेवारी १९६६ ला हा करार सही शिक्क्यानिशी कागदावर उतरला. युद्ध जिंकूनही भारताच्या पदरात काहीच पडलं नव्हतं.
करार समारंभ रात्री झाला. शास्त्रींनी कन्या कुसुमला फोन केला, तेव्हा भारतात या करारावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटत असल्याचे सांगितले. जनसंघाच्या अटलबिहारी वाजपेयींनी या करारावर कडाडून जाहीर टिका केल्याचं सांगितलं.
या बातमीने शास्त्रीजींना आणखी नैराश्य आले. हे चालू असताना शास्त्रीजींच्या सहायकांनी परतण्याची तयारी सुरु केली. शास्त्रीजींची तब्येत तोपर्यंत व्यवस्थित होती, मध्यरात्री शास्त्रीजींनी अचानक डॉक्टरांना पाचारण केले. त्यांनी इंजेक्शन दिले, परंतु…
एक वाजून बत्तीस मिनिटांनी त्यांचे देहावसान झाले.
आता यात केजिबिचा हात आहे का? तर याचं ठाम उत्तर देता येत नाही. पण घटनांची साखळी पहा आणि तुम्ही ठरवा.
महायुद्धानंतर जगात इस्लामी देश तेलामुळे महत्वपुर्ण बनले. शिवाय पाकच्या निमित्ताने अमेरिकेचे अस्तित्व आशियात नको ही रशियन भूमिका. त्यात रशियात मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश होते.
त्यात इस्लामी दहशतवादाचे लोण पसरू नये ही इच्छा, त्यासाठी पाकला गोंजारावे असे रशियन मनसुबे, असे असताना भारतात स्वतंत्र इच्छाशक्ती आणि कार्यक्षमता असलेला पंतप्रधान असणे रशियाला कसे रुचावे?
आणीबाणीच्या प्रसंगी एक वेळ अन्न शिजवण्याची विनंती करणारा भारतीय नेता भारताला स्वाभिमानी सार्वभौम बनवू शकतो हे ओळखण्यासाठी कुणाची गरज नाही. त्यामुळे अशा पंतप्रधानांची अडचण इतर राष्ट्रांना होणे साहजिक आहे.
पण सदर कारस्थान देशाच्या सर्वोच्च नेत्याविषयी असल्यामुळे त्यासाठी अंतर्गत मदत असल्याशिवाय यश मिळत नसते. मग कुणाला शास्त्रीजी नसल्यामुळे असा राजकीय फायदा होऊ शकेल त्याची यादी करा. ती करण्याची देखील गरज नाही कारण इतिहास तुमच्यासमोर आहे.
शास्त्रीजींची मृत्यूनंतर निळसर झालेली त्वचा अधिक बोलकी आहे. रशियन डॉक्टने मृतदेह कुजू नये म्हणून स्पिरीट, फोर्मालीन, युरोत्रापीन हे टोचल्याच सांगितलं, पण मग पोस्टमोर्टम का केलं गेलं नाही?
ज्या ठिकाणी शास्त्रीजींच्या निवासाची सोय केली होती ते ठिकाण २४ तास आधी बदलण्यात आलं. जे नियमानुसार नव्हतं. झोपण्याच्या खोलीत टेलिफोन, call bell नसणं, शास्त्रीजींना हृद्यविकार आहे हे माहित असून डॉक्टरांच पथक तैनात नसणं अशा बऱ्याच संशयास्पद गोष्टी आहेत.
असो, यानंतर झालेल्या पंतप्रधानासाठी रशियन केजीबीने निवडणुकांमध्ये वारंवार पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे यातच सर्व आलं. भारतामधे एक असं सुदैवी कुटुंब आहे ज्या कुटुंबाला कायम कुणाच्यातरी मृत्यूमुळे फायदा झालेला आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.