' मुंबईमधील अशा ७ जागा जिथे बॉलीवूड सेलिब्रेटी हमखास पडीक दिसतील! – InMarathi

मुंबईमधील अशा ७ जागा जिथे बॉलीवूड सेलिब्रेटी हमखास पडीक दिसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिनेतारकांची आयुष्यं हा आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. त्यांच्या अभिनयामुळे आपण त्यांचे चाहते असतोच पण याशिवाय त्याचं दिसणं, त्यांचं राहणीमान, त्यांच्या स्टाईल्स अशा अनेक गोष्टींकडे आपण आकर्षित होतो.

सेलिब्रिटीजच्या अफेअर्सपासून त्यांच्या पॅपराझी लुकपर्यंत सगळ्यातच आपल्याला रस असतो. मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या या तारेतारकांचं एक गारूड कायमच आपल्या मनावर असतं.

 

bollywood celebrities IM

 

त्यांनी सिनेमांमध्ये केलेल्या कामाची आपल्यावर इतकी जादू असते की त्यांच्याकडे एक साधा माणूस म्हणून आपल्याला बघताच येत नाही. पण सेलिब्रिटीजही आधी आपल्यासारखी माणसंच असतात. त्यांच्या व्यस्त शेड्यूल्समधून त्यांनाही विरंगुळा हवा असतोच.

कितीही ‘पब्लिक फिगर’ म्हटलं तरी कुठेतरी त्यांचंही एक वैयक्तिक आयुष्य त्यांना एकांतात घालवायचं असतं. आपल्याला हँग आउट करायला आवडतं तसं ते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीजनाही आवडतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण राहात असलेल्या शहरात आपल्या फिरायच्या, खायला जायच्या काही खास आवडीच्या जागा असतात. बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटीज मुंबईत राहतात.

तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर ज्यांचे तुम्ही चाहते आहात ते कलाकार एकदातरी आपल्या प्रत्यक्ष दृष्टीस पडावे यासाठी तुम्ही आसुसलेले असता. बॉलिवूड सेलिब्रिटीज ज्या ठिकाणी, ज्या रेस्टॉरंट्समध्ये हमखास पडीक असतात अशा काही जागा जाणून घेऊ.

१. ओट्टर्स क्लब –

 

otters club IM

 

बांद्रा वेस्ट मधील ‘ओट्टर्स क्लब’ हा तसा जुना क्लब आह. रणवीर सिंग, फरहान अख्तर हे अभिनेते त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत बऱ्याचदा तिथे वर्कआउट करायला येतात.

रणवीर सिंग तुम्हाला अधूनमधून या क्लबच्या गेटपाशी चाहत्यांची आणि क्लबच्या इतर सदस्यांची आनंदाने दाखल घेऊन त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना दिसेल.

२. बायरूट –

 

bayroyte IM

 

बायरूटची पहिली २ रेस्टॉरंट्स ‘कफ परेड’ आणि ‘पवई’ ला आहेत. जुहूमध्ये बायरूटचं तिसरं रेस्टॉरंट आहे. हे मेडिटरेनीअन रेस्टॉरंट तिथे आसपास राहणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत कधीतरी जेवायला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि त्यांची मुलं, वरूण धवन, नताशा दलाल, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा हे सेलिब्रिटीज बऱ्याचदा इथे लंच करायला येतात.

३. जॉगर्स पार्क –

 

joggers park IM

 

बांद्रयातील कार्टर रोडला समुद्राजवळ हे पार्क आहे. तिथे जवळपास राहणारे उच्चभ्रू लोक जॉगर्स पार्कला येतात. कार्टर रोडला बरेच सेलिब्रिटीज राहतात.

त्यामुळे एखादा सेलिब्रिटी या पार्कमध्ये हमखास घाम गाळताना दिसतो. तुम्ही जेव्हा तिथे समुद्रावर छान वेळ घालवायला जाल तेव्हा नक्की जॉगर्स पार्कला जा आणि थोडी वाट बघा. तुमच्या लाडक्या कलाकारांची एखादी झलक तुम्हाला दिसू शकेल.

४. सोहो हाऊस –

 

soho house IM

 

बॉलिवूडमधले मोठमोठे स्टार्स सांताक्रूझ वेस्टमधल्या सोहो हाऊस मध्ये येतात. इंडस्ट्रीमधील बऱ्याच कलाकारांच्या घरांपासून हे जवळ आहेच. शिवाय या बिल्डिंगमध्ये स्वतःच्या थिएटरपासून रुफटॉप पूल पर्यंत सगळ्या सुविधा आहेत.

क्रिएटिव्ह प्रोफेशनल्ससाठी हे त्यांचं नेहमी यायचं ठिकाण आहे. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रापासून अर्जून कपूरपर्यंत बरेच सेलेब्रिटीज इथे डिनरला येतात.

५. हक्कासन रेस्टॉरंट –

 

hakkasan hotel IM

 

बांद्रयातील हे एक प्रसिद्ध कॅन्टॉनीज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर बऱ्याचदा लंच करायला येतात. शिल्पा शेट्टी कुंद्रा आपला नवरा राज कुंद्रा याच्यासोबत इथे बऱ्याचदा येते.

याच रेस्टॉरंटमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला लोकांनी पहिल्यांदा डेटवर आलेलं पाहिलं होतं.

६. अंधेरी लिंक रोड –

 

andheri link road IM

 

अंधेरी लिंक रोडवर तुम्हाला बरेच स्टार्स दिसू शकतील. ‘बालाजी टेली फिल्म्स’ आणि ‘यशराज फिल्म’ ही प्रसिद्ध प्रॉडक्शन हाउसेस इथे आहेत. बॉलिवूड स्टार्स आणि दिग्दर्शक त्यांच्या आलिशान, महागड्या गाड्यांमधून उतरून जवळपासच्या रेस्टॉरंट, कॅफेजमध्ये तुम्हाला कॅपेचिनोचा आस्वाद घेताना दिसतील.

तुमचं नशीब जोरावर असेल तर तुम्हाला एखाद्या सिनेमाचा अख्खा क्रूच स्क्रिप्टवर चर्चा करत करत काहीतरी खाताना दिसू शकेल.

७. पृथ्वी थिएटर –

 

prithvi theatres IM

 

पृथ्वी थिएटरला तुम्हाला तुमचे लाडके बॉलिवूड स्टार्स हमखास दिसतील. तुम्ही जेव्हा तिथे नाटक बघायला जाल तेव्हा तिथल्या प्रसिद्ध पृथ्वी कॅफेमध्ये जाऊन तिथले पदार्थ ट्राय करायला विसरू नका.

माफक किंमतीत चविष्ट आणि पोटभर पदार्थ तुम्हाला तिथे खायला मिळतीलच. शिवाय आमिर खान, कल्की कोचलीन हे स्टार्सही तिथे तुमच्या दृष्टीस पडू शकतील.

तुम्ही मुंबईत राहत असाल तर वीकेंड्सना बांद्रा, जुहूच्या या परिसरांमध्ये नक्की फेरफटका मारा.आम्ही या या सेलिब्रिटीजना प्रत्यक्षात पाहिलंय ही आठवण मनात जपण्यासाठी आणि इतरांना सांगण्यासाठी तुमच्याकडे कायम असेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?