“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चक्क बॉलिवूडला मराठी सिनेमाचा रिमेक करण्यासाठी भाग पाडणाऱ्या नागराज मंजुळेचा सैराट सिनेमा अजूनही लोकांच्या लक्षात आहे. पहिला मराठी सिनेमा ज्याने हिन्दीच्या तोडीस तोड १०० करोडची कमाई केली.
आजही मराठी चित्रपटसृष्टिचा अभ्यास केला तर, सैराट आधी आणि सैराट नंतर असे विभाजन करावं लागेल, इतका सैराट तेव्हाच ट्रेंडसेटर होता.
नागराज मंजुळेने नवोदित कलाकारांना घेऊन जी जादू केली होती ती जादू पुन्हा हिन्दीच्या रिमेक बघायला मिळाली नाही. आता सैराटच्या घवघवीत यशानंतर नागराज मंजुळे आणखीन एक वेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यावेळेस तो एकटा नसून त्याच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीचा खुद्द शेहनशाह अमिताभ बच्चन आहेत. सिनेमाचं नाव आहे झुंड, येत्या ४ मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे!
खरंतर नागराज बिग बींसोबत सिनेमा करतोय ही बातमी खूप वर्षांपूर्वीच बाहेर आली होती, नंतर या सिनेमाचं नाव लोकांना समजलं, सिनेमाच्या कथेवरून मध्यंतरी वाददेखील निर्माण झाला होता, काहींच्या म्हणण्यानुसार अमिताभ बच्चन यांनी शूटिंगसाठी नकारसुद्धा दिल्याचं ऐकायला आलं होतं!
अखेरीस या सगळ्या गोष्टीवर पडदा पडलेला असून हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून कथेविषयी उत्सुकता ताणून ठेवण्यात नागराजला नेहमीप्रमाणेच यश मिळालं आहे.
शिवाय नागपूरमध्ये शूट झालेला हा पहिला सिनेमा आहे त्यामुळेसुद्धा याची बरीच चर्चा होताना दिसत आहे, याआधी कधीच कोणत्या सिनेमाचं नागपूर मध्ये शूटिंग झालेलं नाही!
शिवाय सिनेमाच्या संगीतानेसुद्धा प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडलं आहे. अजय-अतुलचं संगीत पुन्हा लोकांना थीरकायला भाग पाडणार हे मात्र नक्की!
तरी सोशल मीडियावर एक वेगळाच सुर आपल्याला बघायला मिळत आहे. “हा सिनेमा मराठीत का केला नाही?” अशी तक्रार सध्या बऱ्याच लोकांकडून सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एका कार्यक्रमात नागराज आणि अतुल गोगावले उपस्थित होते, त्यावेळेस नागराजला हा प्रश्न विचारण्यात आला की “झुंड मराठीतून का बनवला नाही?”
त्यावर नागराजने अतिशय हुशारपणे उत्तर दिलं की “पुष्पा हिंदीत कुणी का बनवला नाही?” नागराजने यावर स्पष्टीकरण दिलं त्याच्या बोलण्यातून असं स्पष्ट झालं की हिंदीमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा मराठीत नाही, शिवाय एवढे पैसे ओतून अमिताभसारख्या महानायकाला मराठीत काम करायला लावणं ही अगदी तारेवरची कसरत आहे!
—
- सिनेमात आंबेडकरांच्या एका फ्रेममुळे नागराज मंजुळेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे!
- झुंड सिनेमात Big- Bनी साकारलेले विजय बारसे नेमके आहेत तरी कोण?
—
त्यासाठी खर्ची होणार वेळ आणि पैसा या सगळ्याच विचार करूनच झुंड हा हिंदीत बनवायचा निर्णय घेतला असं नागराजने कबूल केलं. पण एक मराठी दिग्दर्शक म्हणून नागराजकडून लोकांच्या फार अपेक्षा आहेत म्हणूनच त्याचं हे म्हणणं बऱ्याच लोकांना खटकलं!
पुष्पा हा सिनेमा जसा हिंदीत डब केला तसंच झुंडसुद्धा मराठीत डब करावा असं काही चाहत्यांचं म्हणणं होतं त्यामुळे नागराजने सरसकट मराठी इंडस्ट्रीबद्दल केलेलं वक्तव्य बऱ्याच लोकांना रुचलं नाही.
आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का? असाही सवाल बऱ्याच लोकांनी उपस्थित केला!
आणि मराठी भाषा गौरव दिनाच्यावेळी या सगळ्या गोष्टी समोर आल्याने नागराजचे ही वक्तव्य खूप लोकांना खटकले!
अर्थात यामध्ये कोणाचे चूक आणि कोणाचे बरोबर हे आपण ठरवू शकत नाही, कारण एक कलाकार म्हणून काय करायचं आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपण ज्या मातीत मोठे झालो, ज्या भाषेने आपल्याला नावलौकिक दिलं तिचं ऋण आपण विसरता कामा नये हेदेखील तितकंच खरं आहे.
सोशल मीडियावर नेमकी काय चर्चा होतिये आणि लोकं नेमकी का नाराज आहे ही नागराजसारख्या दिग्दर्शकाने जाणलं पाहिजे तसंच प्रेक्षकांनीसुद्धा सिनेमाची आर्थिक गणितं समजून न घेता भावनेच्या भरात कोणतंही स्टेटमेंट करणं चुकीचं आहे!
नागराजचा आगामी झुंड या सिनेमालासुद्धा घवघवीत यश मिळेल आणि पुन्हा एकदा हा सिनेमा साऱ्या जगाला दखल घ्यायला भाग पाडेल अशी आशा आपण व्यक्त करुयात!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.