युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिवसेंदिवस रशिया-युक्रेन युद्धाचा अधिकाधिक भडका उडताना दिसतोय. रशिया अधिकाधिक आक्रमक होऊ लागलाय, तर दुसरीकडे युक्रेनला सुद्धा इतर राष्ट्रांची या ना त्या प्रकारे साथ मिळू लागल्याचं सुद्धा दिसून येतंय. भारताने मात्र सावध पवित्रा घेत, तटस्थ भूमिका घेतली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
युद्धभूमीवर अडकलेल्या भारतीयांना सुखरूप घरी आणण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांना युद्धभूमीवरून सुखरूप घरी आणण्यासाठी, एका यशस्वी एअरलिफ्ट ऑपरेशनसाठी भारतीयांना कंबर कसलेली असताना, तिथे युक्रेनमध्येच असणाऱ्या एका भारतीयाने ‘माणुसकी’ म्हणजे काय, हे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे.
कोण आहे हा माणूस? आणि काय आहे त्याचं हे माणुसकीचं कार्य, ते जाणून घेऊया.
ट्रेनमधला लंगर…
युक्रेनमधील एकंदर स्थिती फारच भयावह झालेली आहे. एकीकडे रशियाने फारच आक्रमक पवित्रा घेत हल्ले सुरु केले आहेत. तर दुसरीकडे युक्रेन सुद्धा मागे हटायला तयार नाही.
–
- पर्ल-हार्बर हल्ला नव्हे तर “या” कारणांमुळे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली!
- युक्रेन-रशिया युद्ध सुरु झालं, पण भारतावर परिणाम होणार नाही असं समजू नका
रशियन सैन्य थेट युक्रेनची राजधानी असणाऱ्या किव पर्यंत पोचलं आहे. ठिकठिकाणी बॉम्ब हल्ले सुद्धा सुरु आहेत. अशाच स्थितीमध्ये युक्रेनच्या पूर्व भागात एक ट्रेन नियमितपणे कार्यरत आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हरदीप सिंगच्या रूपात देवदूत भेटला आहे, असं म्हटलं तरी ते फारसं चुकीचं ठरू नये.
हरदीप या शीख व्यक्तीने लोकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मदत करण्याचा विडा उचलला आहे. या ट्रेनमधील प्रवाशांना मदत करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं. हे काम तो अगदी मनापासून करत आहे. त्याने केलेलं हे मदतकार्य जणू काही ‘गुरु का लंगर’ ठरतंय. त्याची माणुसकी पाहून अनेकजण भावुक झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल…
एखादी वाईट गोष्ट वेगाने व्हायरल होण्यासाठी हल्लीच्या काळात सोशल मीडिया जबाबदार आहे. मात्र एखादं उत्तम कार्य घडत असताना, तेही व्हायरल वहावे याची काळजी घेणार, सोशल मीडियाचा योग्यरीतीने वापर करणारे, सुज्ञ नेटकरी सुद्धा पाहायला मिळतात.
माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सारं काही उध्वस्त होत असताना, अनेकांना दोन वेळचं खाण्याची सुद्धा भ्रांत पडू लागली आहे. अशात हरदीपने सुरु केलेला लंगर, त्यामुळे गरजूंची होणारी मदत, आणि त्याचं हे कार्य दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियाचा वापर करून सगळ्यांपर्यंत पोचवले जात आहेत. हरदीपची, त्याच्यातील माणुसकीची वाहवा केली जात आहे.
नेटकऱ्यांनी मानले आभार…
या ट्रेनने प्रवास करणारी मंडळी भाग्यवान असल्याचं सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून एका माणसाने व्यक्त केलं आहे. माणुसकीचा दर्शन देत, अत्यंत आपुलकीने लोकांसाठी लंगर करणाऱ्या हरदीपने अनेकांची मनं जिंकली आहेत.
एवढंच नाही, तर रशिया आणि युक्रेनच्या या भीषण युद्धात इतर देशांनी, इतर नागरिकांनी सुद्धा आपापल्या परीने मदत करायला हवी, यासाठी तो नकळतपणे सगळ्यांनाच प्रोत्साहित करत असल्याचं सुद्धा नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
एका बाजूला युद्धाचे भीषण आणि धडकी भरवणारे प्रसंग सोशल मीडियावरील बहुतांश डेटा काबीज करत असताना, हरदीप सिंगसारख्या व्यक्तींनी सुरु केलेलं मानवतेचं दर्शन घडवणारं कार्य सुद्धा लोकांपर्यंत पोचणं ही सकारात्मक बाब म्हणायला हवी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.