' प्रेमाला वयाची मर्यादा नसते; ८० वर्षांच्या आजोबांनी पळवून नेलं ८४ वर्षांच्या प्रेयसीला! – InMarathi

प्रेमाला वयाची मर्यादा नसते; ८० वर्षांच्या आजोबांनी पळवून नेलं ८४ वर्षांच्या प्रेयसीला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच वर्षांपूर्वी ‘उत्तरायण’ हा नितांतसुंदर चित्रपट आला होता. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पण एकमेकांपासून दुरावलेले रघु आणि दुर्गी कैक वर्षांनी अचानक एकमेकांच्या समोर येतात आणि एक तरल प्रेमकथा पडद्यावर खुलत जाते.

या चित्रपटातली गाणी आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. या कथानकातली सगळ्यात सुखद गोष्ट ही की परिस्थितीने आपोआपच त्यांची पुनर्भेट घडवून आणली होती.

 

uttarayan IM

 

‘सगळ्या कसोट्या पार करून खरं प्रेम अखेरीस जिंकतंच’ या म्हणण्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्यातून उलगडला होता. प्रेमात विश्वासासोबत संयमही महत्त्वाचा असतो पण बऱ्याचदा प्रेमाच्या नावाखाली बेभान होत काही जण काहीच्या काही गोष्टी करतात.

टिपिकल हिंदी रोमँटिक चित्रपटांमध्ये दाखवतात तसल्या गुडीगुडी प्रेमाचा अनेकांवर आजही पगडा असतो. तरुणांकडून असे प्रेमात पडून वाहवत जाण्याचे प्रकार घडले तर समजू शकतो पण जर एखादे आजोबाच असे प्रेमात वेडे होऊन आपल्या प्रेयसीला पळवून घेऊन गेले तर?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऑस्ट्रेलियातल्या आजी आजोबांची एक अतरंगी लव्हस्टोरी नुकतीच समोर आली आहे. आजोबांनी आजींना पळवून नेलं आणि नंतर आजोबांच्या एका मोठ्या चुकीमुळे थेट पोलिसांनीच आजोबांना अटक केली. आजोबांनी असं केलं तरी काय?

ऑस्ट्रेलियात राहणारे ८० वर्षांचे आजोबा राल्फ गिब्स आणि त्यांची ८४ वर्षांची प्रेयसी कॅरोल लिस्ले गेली १५ वर्षं एकमेकांच्या प्रेमात आहेत. या ८४ वर्षांच्या आजी सध्या खूप आजारी आहेत. त्यांना पार्किन्सन आणि डिमेन्शिया झाला आहे.

 

ralph gibs IM

 

हे आजार मनुष्याच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम करतात. आजींची स्मरणशक्ती खूप कमी झाल्यामुळे त्या थोड्याच वेळात गोष्टी, माणसं विसरतात. त्यांना धड स्वतःहून नीट चालतादेखील येत नव्हतं.

कुणाच्यातरी आधाराची त्यांना गरज लागते. त्यामुळे त्यांना पर्थ शहरातील एका नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.

या आजींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आजोबांना आजींपासूनचा दुरावा सहन झाला नाही म्हणून ते ४ जानेवारी २०२२ ला तिला भेटायला गेले. पण त्यानंतर आजोबांनी जे काही केलं त्याला प्रेम म्हणायचं की कहर हे कळेनासं झालंय.

बिचाऱ्या आजींची शुश्रूषा करणं तर सोडाच पण आजींची अवस्था इतकी वाईट असतानासुद्धा आजोबांनी तिला चक्क पळवून नेलं. आजींवर उपचार होणं आवश्यक आहे हे माहीत असूनही १५ वर्षं आजींसोबत एकत्र राहणारे आजोबा स्वतःवर संयम कसा ठेवू शकले नाहीत याचं नवल वाटतं.

आजींना आपल्यासोबत पळवून नेल्यावर ते दोघे १५ दिवस ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरले. ते दोघे पर्थपासून ४८०० किलोमीटर दूर असलेल्या क्विसलँडला जाणार होते. पण ते तिथे पोहोचायच्या आधीच एका वाळवंटी प्रदेशात पोलिसांनी त्यांना पकडलं.

 

love story IM

 

त्या वाळवंटात त्यावेळी ४३ डिग्री तापमान होतं. इतक्या जास्त तापमानात ते वृद्ध गाडी चालवताना सापडले. पोलीस आलेले पाहून सहाजिकच आजींना खूप भीती वाटली. तिथून एअरलिफ्ट करून आजींना पर्थला पुन्हा पाठवलं गेलं. आजोबांना मात्र अपहरणाच्या गुन्ह्याखाली पोलीस अटक करून घेऊन गेले.

राल्फ आजोबांवर कॅरोल आजींचं आयुष्य धोक्यात टाकण्याबरोबरच इतर काही आरोप लावण्यात आले. आपली बाजू मांडण्याची संधी जेव्हा कोर्टात सुनावणीदरम्यान आजोबांना मिळाली तेव्हा आपलं आपल्या प्रेयसीवर प्रचंड प्रेम असून आयुष्याची शेवटची काही वर्षं आपल्याला तिच्यासोबत घालवायची आहेत आणि म्हणून आपण तिला पळवून नेलं असं त्यांनी सांगितलं.

डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आजोबांची बाजू ऐकल्यावर खुद्द न्यायाधीशांच्याही डोळ्यांत पाणी आलं पण त्याचा आपल्या न्यायनिवाड्यावर त्यांनी अजिबात परिणाम होऊ दिला नाही. आजोबांना त्यांच्या चुकीसाठी ७ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ वर्षांचा रेस्ट्रेनिंगचे आदेश देण्यात आले.

 

aged couple IM

 

एकीकडे आपलं आपल्या जोडीदारावर प्रेम आहे असं म्हणायचं आणि तो किंवा ती कुठल्या परिस्थितीत आहे हे समजून न घेता केवळ आपल्याला ती व्यक्ती आता आपल्या जवळ हवी आहे म्हणून मनाला येईल तसं वागायचं असं जर आपण करत असू तर हे करताना आपण कळत नकळत जोडीदाराला आनंद देण्याऐवजी त्याला त्रास होईल असं वागतोय का हे वेळीच लक्षात घ्यायला हवं.

राल्फ आजोबांसारखी चूक आपल्याकडून होणार नाहीच तरी फिल्मी प्रेमाच्या बबलमधून आतातरी बाहेर येऊया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?