कर्मचाऱ्याने असं काय खास काम केलं, की मालकाने थेट मर्सिडीज कार भेट दिली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चकाचक, इंपोर्टेड कार्सची आवड कुणाला नसते? एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात. अशा गाड्या घेणं हे अनेकांसाठी तर प्रत्यक्षातसुद्धा उतरणार नाही, असं स्वप्न असतं. एवढंच नाही, तर या इंपोर्टेड, दैदिप्यमान गाड्यांच्या किंमती आणि अनेकांच्या निवाऱ्याची सोय असणाऱ्या चार भिंती आणि वर छप्पर असणाऱ्या घरांच्या किंमती बहुतेकवेळा सारख्याच असतात.
काही लाखांची किंमत असणारी अशीच एखादी उत्तम गाडी जर तुम्हाला भेट म्हणून मिळाली तर? एखादी नेहमी वापरात असणारी, मध्यमवर्गीयांना परवडणारी गाडी सुद्धा भेट म्हणून दिलेली पाहिली, तर आश्चर्य वाटू शकतं. पण, इथे एका कर्मचाऱ्याला चक्क मर्सिडीज गाडी भेट म्हणून मिळाली.
मालकांची ही अशी कृपादृष्टी उगाच होत नाही, बरं का मंडळी! त्यासाठी मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाची जोड असावी लागते. स्वतःच्या कर्मचाऱ्याला मर्सिडीज गाडी भेट देणारा हा मालक नक्की आहे तरी कोण आणि ही भेट मिळण्यासाठी या कर्मचाऱ्याने नेमकी कशी मेहनत घेतली आहे, ते जाणून घेऊया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
बावीस वर्षांपासून करत आहेत काम…
ही घटना आहे केरळमधली. केरळमधील एक बिझनेसमन खूपच चर्चेत आहेत. त्यांनी चर्चेत का असू नये, या प्रश्नाला काही उत्तरच नाही असं म्हणायला हवं. आपल्या कर्मचाऱ्याला साधंसुधं गिफ्ट न देता, तब्बल ४५ लाख रुपये किंमतीची मर्सिडीज कार जर भेट दिली गेली, तर त्या व्यक्तीने चर्चेत राहणं अगदीच साहजिक आहे.
कर्मचारी सी आर अनिश, हे गेली २२ वर्ष ए के शाजी यांच्यासाठी काम करत आहेत. हा एक मोठा व्यवसाय असून, त्यांची खूप मोठी रिटेल चेनसुद्धा आहे. शाजी यांनी व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हापासून आजतागायत अनिश यांनी त्यांच्यासाठी काम पाहिलं आहे. २२ वर्षांची त्यांची ही तपस्या, त्यांची मेहनत, त्यांची इमानदारी आज फळली असं म्हटलं, तरी ते वावगं ठरू नये.
–
- मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? वाचा काय कारणे आहेत
- फक्त ५ रु. मानधनात सुरु केला अभिनयप्रवास; खुद्द रमेश देव यांनी सांगितलेले भन्नाट किस्से
–
२-४ वर्षांत नवी नोकरी शोधण्याचा आजचा काळ पाहता, २२ वर्ष एखाद्या व्यवसायासोबत एकनिष्ठ राहणं ही फार मोठी आणि कौतुकास्पद बाब नक्कीच आहे. आज त्याचंच फलित म्हणून ‘मर्सिडीज-बेंज जीएलए क्लास २२० डी’ ही गाडी अनिश यांच्या मालकीची झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी सुद्धा…
अनिश यांना एवढा महागडा उपहार मिळण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी शाजी यांनी कर्मचाऱ्यांवर खुश होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दोन वर्षांपूर्वी अशाच एका कारणासाठी शाजी चर्चेत होते. १-२ नव्हे, तर चक्क ६ कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी मर्सिडीज गाडी भेट केली होती.
त्यांची ही दानशूर वृत्ती आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्याची अनोखी पद्धत पाहून, त्यावेळी सुद्धा नेटकरी भारावून गेले होते. बॉसकडून हे असं कौतुक होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना काम करण्याचा हुरूप मिळणं अगदीच साहजिक आहे. मात्र शाजी यांच्यासाठी कर्मचाऱ्यांची किंमत एक माणूस म्हणूनही खूप आहे, हे त्यांच्या वागण्यातून दिसून येतं.
अनिश यांच्याविषयी अधिक आपुलकी
जेव्हा शाजी यांनी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हापासूनच अनिश त्यांच्या व्यसायाचा एक भाग आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीसा अधिक आपलेपणा असणं साहजिकच होतं. मात्र अनिश खास कर्मचारी आहेत, याचं हे एकच कारण नाही.
त्यांनी सातत्याने केलेले परिश्रम, वेळप्रसंगी कंपनीसाठी एक महत्त्वाचा खांब म्हणून उभं ठाकणं, हे त्यांचं समर्पण सतत पाह्यला मिळालं. त्यामुळेच शाजी त्यांना केवळ कर्मचारी नाही, तर सोबती मानतात. अशा या सोबत्याला प्रेमाने त्यांनी मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली.
मालक आणि कर्मचाऱ्याच्या या जोडीविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंटमधून नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.