' “पुष्पा”ची स्टार रश्मिका मंदाना फक्त त्याच्याशीच लग्न करेल जो…. – InMarathi

“पुष्पा”ची स्टार रश्मिका मंदाना फक्त त्याच्याशीच लग्न करेल जो….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका विशिष्ट वयात आल्यानंतर आपला जोडीदार कसा असावा याचं चित्र प्रत्येक मुलामुलींच्या मनात तयार झालेलं असतं. शाळा -कॉलेजात असल्यापासूनच कुणावर ना कुणावरतरी आपला क्रश असतोच.

अनेकजण नंतर रिलेशनशिप्समध्ये असतात. कधी रिलेशनशिप्स टिकतात तर कधी ब्रेकअप होतं. कधीच रिलेशनशीपमध्ये नसलेले आणि ब्रेकअपनंतर पुन्हा सिंगल झालेलेही अनेक असतात, पण तरीही आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे झालं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत, पण गोष्ट जेव्हा सिनेसृष्टीतल्या तारेतारकांची असते तेव्हा त्यांना कसा जोडीदार हवाय, त्यांना कुणाशी लग्न करायचंय याचं आपल्याला प्रचंड औत्सुक्य असतं.

बहुचर्चित ‘पुष्पा’ या चित्रपटातून रश्मीका मंदाना या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांवरच भुरळ घातलीये. मुलांसाठी तर ती ‘नॅशनल क्रश’ आहेच पण मुलींनाही रश्मीकासारखं दिसायचंय. अजूनही ‘सामी सामी’चे रिल्स इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

मध्यंतरी रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात काही तथ्य नसल्याचं दोघांनी सांगितलं. ‘इंडिया टुडे’शी झालेल्या संवादादरम्यान रश्मीका प्रेम आणि रिलेशनशीपविषयी बोलली. रश्मीकाच्या स्वप्नातला राजकुमार नेमका कसा आहे हे जाणून घेऊ.

 

rashmika inmarathi

 

रश्मीका जरी स्टार असली तरी आधी ती आपल्यासारखी एक माणूसच आहे. २५ वर्षांच्या रश्मीकाचं प्रेमाविषयीचं मत तुमच्याआमच्यापेक्षा काही वेगळं नाही.

रश्मीका म्हणते, “माझ्या मते, जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, एकमेकांना वेळ देता आणि जेव्हा तुम्हाला एकमेकांसोबत सुरक्षित वाटतं तेव्हा तुमच्यात प्रेम असतं. प्रेमाचं नेमकं वर्णन करणं कठीण आहे कारण ही एक भावना आहे. दोन्ही बाजूंनी असतं तेव्हाच प्रेम यशस्वी होतं. एकतर्फी असेल तर नाही.”

लग्नाच्या बाबतीत आपलं मत मांडताना रश्मीका म्हणाली, “लग्नाबद्दल नेमका काय विचार करायचा हे मला माहीत नाही. कारण, लग्नाच्या दृष्टीने माझं वय अजून कमी आहे. मी यावर फारसा विचार केलेला नाही, पण असं असलं तरी मी एक सांगेन की ज्याच्याबरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यासोबत तुम्ही असलं पाहिजे.”

नात्यात कम्फर्ट असेल तर दोघंही कुठलाही आडपडता न ठेवता चांगल्या प्रकारे नातं फुलवू शकतात. अशा वेळी एकमेकांसाठी करावे लागणारे बदलही ‘तडजोड’ वाटत नसावेत. लग्नाच्या बाबतीत रश्मीकाने हा साधा पण महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे.

 

rashmika inmarathi1

 

रश्मीकाने दोन बॉलिवूड चित्रपट साइन केले आहेत. ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. तर ‘गुडबाय’ या चित्रपटातून ती खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

या वर्षी मार्च मध्ये ती ‘पुष्पा’ चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा : द रूल (पुष्पा २) या चित्रपटच्या शूटिंगलादेखील सुरुवात करणार आहे. तर रश्मीकासोबत नाव जोडलं गेलेला विजय देवरकोंडा हा अभिनेता बॉलिवूडच्या ‘लायगर’ या बहुभाषिक चित्रपटातून अनन्या पांडे या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे.

असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. मग तो सामान्य माणूस असो की प्रसिद्ध कलाकार. रश्मीका केव्हा लग्न करेल, कुणाशी करेल याकडे लोकांचे डोळे लागलेले असतीलच. रश्मीकाचं लग्न तिला मनापसून आवडलेल्या व्यक्तीशी व्हावं अशीच इच्छा आपण तिचे चाहते म्हणून व्यक्त करूया. करियरच्या पुढल्या वाटचालीसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी तिला शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?