या गोष्टींचा विचार न करता DSLR कॅमेरा खरेदी केलात तर पश्चाताप करण्याची वेळ येईल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
आजकाल DSLR कॅमेऱ्याची चलती आहे. प्रत्येकाला आपल्याकडे DSLR कॅमेरा असावं असं वाटतं. तुम्ही देखील DSLR कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी, कारण यात आम्ही सांगणार आहोत अश्या गोष्टी ज्या DSLR कॅमेरा खरेदी करण्यास जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपल्या वापराच्या आणि आवडीच्या आधारावर DSLR कॅमेरा खरेदी केला पाहिजे.
DSLR कॅमेरा खरेदी करणाऱ्यांनी खरेदी करण्याच्या अगोदर कॅमेराच्या उपयोगी एक्सेसरीजची संख्या आणि खर्च यांचा विचार करायला हवा.
प्रत्येक प्रकारच्या फोटोग्राफी मध्ये रुची घेणाऱ्या व्यक्तींचे काम एका लेंसनी होत नाही, काही खास उद्देशासाठी किंवा अजून चांगले फोटो घेण्यासाठी त्यांना कितीतरी लेंस खरेदी कराव्या लागू शकतात. नंतर त्यांना ठेवण्यासाठी खास बॅग खरेदी करणे देखील आवश्यक असते हे देखील विसरून चालणार नाही.
कॅमेरा बॅग मध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कॅमेरा/लेंस, चार्जर, मेमरी कार्ड, फिल्टर्स, केबल्स, फ्लॅश इत्यादी ठेवण्यासाठी व्यवस्था असते. काही कॅमेरा बॅगांमध्ये तुम्ही लॅपटॉप सुद्धा ठेवू शकता, कारण आजकाल फोटोंना डिजिटल एडिटिंग देण्यासाठी कॉम्प्यूटर गरजेचा असतोच.
फ्रेशर फोटोग्राफर्सना मिनी ट्राइपॉड पासून फुल-लेंथ ट्राइपॉड खरेदी करण्याची आवश्यकता सुद्धा भासू शकते. DSLR कॅमेरा खरेदी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ज्या कंपनीचा कॅमेरा असेल त्याच कंपनीच्या लेंस त्या कॅमेऱ्याला लागतात.
उदारणार्थ, कॅननच्या कॅमेऱ्याला निकॉन किंवा सोनीच्या लेंस लावू शकत नाही कारण त्यांच्या माउंटचा आकार वेगवेगळा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही कॅमेऱ्याला कोणतीही लेंस लावू शकत नाहीत.
काही थर्ड-पार्टी लेंस बनवणाऱ्या कंपन्या आहेत ज्या सर्व प्रमुख कॅमेऱ्याच्या लेंस बनवतात. उदा. टॅमरॉन, सिग्मा, कार्ल जीस इत्यादी. तरीही तुम्ही प्रामुख्याने त्याच कंपनीच्या लेंस वापरा ज्या कंपनीचा कॅमेरा तुमच्याकडे आहे.
बॅटरी,फ्लॅश इत्यादी मध्येही ह्याच समस्या असतात. हेच कारण आहे की उत्साहामध्ये येऊन DSLR कॅमेरा खरेदी करणारे या गोष्टी समजल्यावर नंतर पश्चाताप करत बसतात.
हाय क्वालिटीचे कॅमेरा आणि लेंस बनवणाऱ्या कंपन्या जवळपास एकाच प्रकारच्या लेंसचे सामान्य आणि हाय-क्वालिटी मॉडेल बनवतात ज्यांच्या किंमतीत खूप फरक असतो. प्रसिद्ध फोटोग्राफर कडून काढण्यात आलेले सुंदर फोटो प्रोफेशनल कॅमेऱ्यातून आणि चांगल्या हाय-क्वालिटी लेंस मधून टिपलेले असतात.
कमी क्वालिटीच्या कॅमेऱ्यामधून सुद्धा चांगले फोटो काढता येतात, परंतु एकदा का बेस्ट कॅमेरा आणि लेंस आपल्याकडे नसल्याची भावना मनात घर करून बसली की कित्येक फोटोग्राफर नैराश्यात जातात.
अशा काही वेबसाईट आहेत जिथे आपल्याला बेस्ट फोटोग्राफर्सनी चांगले फोटो टिपण्यासाठी दिलेले सल्ले पाहता येतात, ते लक्षात ठेवून तुम्ही कॅमेऱ्याची निवड करू शकता.
जर तुम्ही शिकण्यासाठी कॅमेरा घेत असला तर कॅमेरा कंपनीचे शो-रूम, अधिकृत डीलर/सेलर आणि ऑनलाईन शॉप व्यतिरिक्त OLX आणि QUIKR सारख्या सेकंड हॅण्ड साईट्सवर देखील कॅमेरा शोधू शकता. ज्यामुळे कमी किंमतीत तुम्हाला उत्तम कॅमेरा मिळू शकतो आणि पैसे देखील वाया जाणार नाहीत.
खूप लोक OLX आणि QUIKR वर कॅमेरा विकण्यासाठी जाहिरात टाकतात. पण त्यांच्याकडून कॅमेरा खरेदी करण्याआधी तो कॅमेरा बरोबर वापरून बघा, जास्तकरून वारंटी मध्ये असलेलाच कॅमेरा खरेदी करा.
कॅमेरा खरेदी करतेवेळी त्यासोबत सर्व एक्सेसरीज जसे कॅमेरा केस/बॅग, चार्जर, मेमरी कार्ड, केबल्स सारख्या वस्तू आहेत की नाहीत ते तपासून पहा. कित्येकवेळा कॅमेराच्या सर्व एक्सेसरीज बॉक्स मधून दिल्या जात नाही, त्या वेगळ्या दिल्या जातात. जर तुम्ही आपला जुना कॅमेरा/लेंस विकून नवीन कॅमेरा घेत असाल तर त्या कॅमेऱ्याची चांगली किंमत वसूल करा.
तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि आपण कॅमेऱ्याचा कसा वापर करणार आहोत त्याचा सारासार विचार करूनच कॅमेरा विकत घ्या!!!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.