' एकीकडे हिजाबवरून वाद, पण इथे ८०० वर्ष जुन्या मंदिरासाठी एकत्र आले हिंदू- मुस्लिम! – InMarathi

एकीकडे हिजाबवरून वाद, पण इथे ८०० वर्ष जुन्या मंदिरासाठी एकत्र आले हिंदू- मुस्लिम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत हा विविधतेने नटलेला जगातील एकमेव देश आहे. वेगवेगळे धर्म, जातीचे लोक एकत्र रहाणारा आपला देश जगात लोकशाही आणि लोकांमधील एकतेच्या भावनेमुळे नेहमीच नावाजला जातो. आपण भांडतो, एकमेकांवर शाब्दिक टीका करतो, पण एकमेकांचा द्वेष करत नाही. हीच आपल्या देशभक्तीची व्याख्या आहे.

कर्नाटक राज्यातील मँगलोर शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘पित्तुर’ गाव हे सध्या आपल्या एकात्मतेसाठी चर्चेत आहे. या गावाने नुकतंच हिंदू-मुस्लिम या धार्मिक भिंतींना पार करून एक सामायिक मंदिर बांधलं आहे आणि एकात्मतेचा आदर्श समोर ठेवला आहे. काय नाव आहे या मंदिराचं? आणि ही संकल्पना कशी समोर आली? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘सर्वे’ नावाच्या या गावात ‘येल्ला श्री विष्णूमूर्ती’ नावाचं ८०० वर्षं जुनं एक मंदिर आहे. काही वर्षांपासून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होतं, पण त्याकडे सरकारचं लक्ष जात नव्हतं.

 

temple im

 

मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी बरीच प्रयत्न केली, पण कर्नाटक सरकारला या प्रकरणाचं गांभीर्य जाणवत नव्हतं. शेवटी, ५०% हिंदू आणि ३०% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या गावाचे लोक एकत्र आले, त्यांनी प्रभागनिहाय व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले, मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव सर्वांनी एकमुखाने मान्य केला आणि त्या दिशेने काम सुरू झालं.

२०१९ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा खर्च साधारणपणे २ कोटी रुपये येईल इतका अंदाज वर्तवण्यात आला होता. पुत्तुर गावातील अब्बास मजलुडे, अनुबकर कुदूरस्ते आणि पुत्तु बारी या तिघांनी मंदिराला लागून असलेली तीन एकर जागा संस्थानाला अर्पण केली आणि प्रकल्प आकारास आला.

मंदिराच्या प्रस्तावाची बातमी जशी पसरली तशी कित्येक देणगीदार हे समोर आले, पण ग्रामस्थांनी ठरवलं, की आपण आपल्या गावातील या मंदिराच्या खर्चाचा भार बाहेरच्या व्यक्तींवर टाकू नये. मग ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रसन्ना राय यांची कोषाध्यक्षपदी एकमुखाने निवड केली.

प्रसन्ना राय यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देतांना या प्रकल्पाबद्दल ही माहिती दिली, की “मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी पहिली मागणी आम्हाला आमच्या गावातील मुस्लिम बांधवांकडून आली होती. आम्ही कामं विभागली आणि विहीर तयार करण्याचा ७५,००० रुपये इतक्या खर्चाचा निधी हा एका समूहाने उभा करायचं ठरलं.

तांब्याचं छत तयार करण्यासाठी येणारा खर्च हा आम्ही सर्वांनी १००० रुपये प्रतिचौरस फूट प्रत्येकी इतका वाटून घेतला आणि आम्ही हे बांधकाम पूर्ण केलं. आमच्या गावातील हिंदू जनता ही हौशेने उत्सवाची तयार करत असते आणि मुस्लिम बांधव हे मंदिरातील उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. आमचं हे मंदिर आम्हाला सांस्कृतिक केंद्र म्हणून घोषित व्हावं अशी इच्छा आहे.”

कर्नाटक हे तेच राज्य आहे जिथे सध्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान करण्यावरून वादंग सुरू आहे. त्याच कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या या मंदिराचं बांधकामाचं सोशल मीडियावर सध्या खूप कौतुक सुरू आहे. पुत्तुर गावातील बहुतांश ग्रामस्थ हे मध्यमवर्गीय असूनही त्यांनी दिलेल्या देणगीचं सध्या सर्वांना नवल वाटत आहे.

 

temple im1

 

‘येल्ला श्री विष्णूमूर्ती’ या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ हेसुद्धा गरजेनुसार उपलब्ध होत गेलं आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला.

६ फेब्रुवारी २०२२ पासून या मंदिरात ‘ब्रह्मकलशोत्सव’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पुत्तुर गावातील ग्रामस्थ आणि नोकरी, व्यवसाय करण्यासाठी इतर राज्यात, देशात स्थायिक झालेले भाविक हे या उत्सवासाठी गावात आले आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेचा हा सोहळा साजरा करत आहेत.

धार्मिक गोष्टींवरून नेहमीच वाद पसरवणाऱ्या समाज प्रवृत्तींनी अशा सकारात्मक बतम्यांचं सुद्धा हॅशटॅग सुरू करावं आणि “इट हॅपन्स ऑन्ली इन इंडिया” हे सुद्धा जगाला सांगावं अशी इच्छा व्यक्त करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?