१०-१२वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी; या राड्यामागचा ‘हिंदुस्तानी भाऊ’ आहे तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी पुस्तकं बाजूला सारून रस्त्यावर उतरले. आधी महाविद्यालयीन विद्यार्थी, नंतर युपीएससी-एमपीएससीचे परिक्षार्थी आणि आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनीही सरकारविरुद्ध बंड पुकारलाय.
कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे लक्षात घेत शाळा महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यासह फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या दहावी, बारावीच्या परिक्षाही यंदा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला, या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत झाले असले तरी काही विद्यार्थ्यांनी मात्र गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राडा घालायला सुरुवात केलीय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
परिक्षा ऑनलाईन हव्यात ही मागणी करणाऱ्या या विद्यार्थ्यांची माथी नक्की कुणी भडकावली? विद्यार्थ्यांच्या आडून ही तेढ नक्की कोण निर्माण करून पाहतयं? या प्रश्नांची उत्तरं शोधताना एक नाव सातत्याने समोर येतंय, ते म्हणजे हिंदुस्थानी भाऊ! सोशल मिडीयापुरती मर्यादित ओळख असलेल्या या हिंदुस्तानी भावाने विद्यार्थ्यांना चिथवण्याचा प्रयत्न नेमका केला कसा? कोण आहे हा भाऊ? जाणून घेऊयात.
संजुबाबाचा आवाज आणि मराठमोळा रांगडा लूक
”पहली फुरसत मे निकल”, “रुको जरा, सब्र करो” ही वाक्य ऐकली की हिंदुस्तानी भाऊ आठवला नाही तरच नवल! सोशल मिडीयावर वावरणाऱ्या प्रत्येकालाच ही वाक्य काही नवी नाहीत.
विकास पाठक हे त्याचं खरं नाव! मात्र फार कमीजण त्याला या नावाने ओळखतात. सोशल मिडीयापासून बिग बॉसपर्यंतच्या टिव्ही शोपर्यंत सर्वत्र तो भाऊ म्हणूनच ओळखला जातो.
आपलं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेल्याचं भाऊ नेहमी सांगतो. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने सातवीत शाळा सोडली आणि उदबत्यांची विक्री, एखाद्या हॉटेलमध्ये तात्पुरतं काम सुरु केलं.
काही काळानंतर त्याने हॉटेल्स आणि बारमध्येही काम केलं. दरम्यान त्याने एका वृत्तपत्रात नोकरी सुरु केली. मात्र कोणतीही डिग्री नसताना वृत्तपत्रात त्याला ही नोकरी नेमकी मिळाली कशी? याबाबतचा खुलासा त्याने आजवर कधीही केलेला नाही. क्राईम रिपोर्टिंग हा त्याचा आवडीचा विषय असल्याने त्याने याच बीटमध्ये काही वर्ष काम केलं.
सोशल मिडीयातील ‘भाऊ’
२०१४ मध्ये या क्षेत्राचा कंटाळा आल्याने त्याने सोशल मिडीयाची कास धरली आणि खऱ्या अर्थाने विकासचा हिंदुस्थानी भाऊ झाला. आपल्या सोशल मिडीया हॅन्डल्सवरून त्याने वेगवेगळे व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली.
मुळातच तो संजुबाबा अर्थात संजय दत्त याचा चाहता. लहानपणापासून संजुबाबाची भुरळ असल्याने सोशल मिडीयावर तो दाखल झाला संजुच्याच स्टाईनमध्ये! संजय जत्त सारखा पोषाख, त्याच्यासारखाच आवाज, रावडी भाषा मात्र या सगळ्याला असलेला मराठी चट यामुळे तो प्रचंड लोकप्रिय होऊ लागला.
उत्तम मिमिक्री, विनोदशैली, बिन्धास्त वागणूक यामुळे भाऊ वाऱ्याच्या वेगात व्हायरल झाला. लोकप्रियता लक्षात घेत त्याने मग आपली शैली निर्माण करायला सुरुवात केली. ”रुको जरा सब्र करो”,”पहली फुरसत मे निकल” म्हणत त्याने तरुण वर्गावर आपली पकड घट्ट केली.
अनेक सामाजिक मुद्द्यांवर तो व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करतो. कधी शायरी करत प्रेक्षकांची मनं जिंकतो तर कधी एखाद्या मुद्द्यावर आक्रमक होवून आपली मतं मांडतो.
बिग बॉसमुळे प्रसिद्धी
सोशल मिडीयावर त्याचा वाढता चाहता वर्ग लक्षात घेत बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये त्याला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. घरात आल्यानंतरही आपल्या हटके स्टाइलमुळे तो सर्वांचा आवडता ठरला.
मात्र इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत त्याचा खेळ न आवडल्याने तो अंतीम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र या शोमुळे त्याच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली.
—
- दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो NDA मध्ये जायचा विचार करताय? अशी करा तयारी
- १० वी नंतर ‘करियर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स वाचाच!
—
चर्चा तर होणारच
विद्यार्थी प्रकरणात राडा घालण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. यापुर्वीही तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. निर्माती एकता कपूर हिच्या एका वेबसिरिजच्या अश्लिल दृश्यांवरून तो पेटून उठला होता. एकता कपूरवर आरोप करत त्याने त्याने तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याचीही मागणी केली होती.
याच प्रकरणी सोशल मिडीयावर प्रचंड टिका केल्याप्रकरणी त्याचे इन्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आले होते.
विद्यार्थी प्रकरणात हात?
विद्यार्थ्यांना चिथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. भाऊनेच विद्यार्थ्यांना आंदोलन करायला भाग पाडलं. आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून त्याने विद्यार्थ्यांची माथी भडकवली. परिक्षा या ऑनलाईनच व्हाव्यात ही बाब त्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यात भरवली असे आरोप त्यावर करण्यात आले आहेत.
अर्थात या आरोपांना दुजोरा देणारे काही धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागल्याने मंगळवारी सकाळी हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
”परिक्षा या ऑफलाईन घ्यावात, परिक्षासंबंधीचा निर्णय बदलला नाही तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर निदर्शन करू, महाराष्ट्रचं काय अख्ख्या देशात आंदोलन करू” असा पवित्रा घेणाऱ्या भाऊला आता सध्या पोलिसांसमोर आपली बाजू सिद्ध करावी लागत आहे.
सोशल मिडीया हे सशक्त माध्यम असलं तरी याचा वापर कसा करावा? आपल्या वापरामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही ना? याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे.
स्वतः दहावीची परिक्षाही पुर्ण न केलेल्या भाऊने आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे शस्त्र दिल्याने पोलिस याबाबत कोणती कारवाई करणार? हे येणारा काळ ठरवेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.