' १२वीत झाला नापास म्हणून सुरु केली शेती, आज देतोय हजारो लोकांना रोजगार – InMarathi

१२वीत झाला नापास म्हणून सुरु केली शेती, आज देतोय हजारो लोकांना रोजगार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोहनलाल द्विवेदी यांची एक कविता आहे, ‘नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है… मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है… आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती…’

मित्रांनो ही कविता तुम्ही नक्कीच ऐकली असेल, शाळेत अभ्यासली असेल, पण जर कोणी ही कविता प्रत्यक्षात आणून त्या कवितेतील शब्द सिद्ध करून दाखवले असतील तर? तर तुम्हाला नक्कीच त्याचे कौतुक वाटेल.

होय मित्रांनो, हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील सालेमगढ गावच्या, एका २४ वर्षीय तरुण शेतकर्‍याने या ओळी शब्दश: सिद्ध करून दाखवल्या आहेत. कोण आहे हा तरुण? काय आहे त्याची यशोगाथा?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिसार येथील विकास वर्मा जेव्हा १२ वी च्या परीक्षेत नापास झाला तेव्हा पुढे काय? असा त्याच्यापुढे प्रश्न होता. घरची परिस्थिती देखील बेताची होती, पाच जणांचे कुटुंब आणि संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून होती. विकासचे वडील परंपरागत पद्धतीने शेती करून कसेबसे ताळमेळ बसवत होते.

२०१६ मध्ये विकास ने १२ वीची परीक्षा दिली होती, पण तो नापास झाला आणि त्याने पुन्हा प्रयत्नही केला नाही. त्यांचे पाच जणांचे कुटुंब असून पारंपारिक शेतीमुळे त्यांना कटकसरीने जगावे लागत होते, त्यात काही फायदा होत नसल्याने विकासला असे काहीतरी करायचं होतं ज्यातून जास्त कमाई होईल.

विकास सांगतो, ‘माझे वडील त्यांच्या पाच एकर जमिनीवर पारंपारिक पिके घेत असत आणि मलाही शेती करायची होती, पण वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मी मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मी मशरूम वाढवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी एका मित्रासोबत सोनीपतला गेलो.’

 

mushroom im1

 

सोनीपत येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने घरात पाच हजार रुपयांच्या भांडवलात मशरूमची लागवड सुरू केली. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने मशरूमसाठी लागणारे कंपोस्ट खत स्वतः बनवले. पण यश मिळालं नाही आणि पहिल्या वर्षीच सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालं, पण विकासने हार मानली नाही आणि त्याला त्याच्या घरातल्यांनी देखील पूर्ण पाठिंबा दिला.

विकासने बटन मशरूम ची लागवड सुरवातीला केली. बटन मशरूमच्या वाढीसाठी २०-२२ अंश तापमान आवश्यक असते. हिवाळा लागवडीसाठी सर्वोत्तम हंगाम आहे. नंतर ते वाढणे सुद्धा खूप कठीण आहे. विकासने त्याची उमेद कायम ठेवली.

पुढच्या वर्षी चांगल्या प्रशिक्षणासाठी हिसार येथील चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठात गेला. तेथील प्रशिक्षणाने त्याला खूप नवीन शिकायला मिळाले आणि त्याने चुका सुधारल्या.

 

mushroom im

 

तो म्हणतो, ‘मी निश्चय केला होता, की काहीही झाले तरी मी लोकांना माझे मशरूम खाऊ घालीन. यानंतर, मी हळूहळू माझ्या मशरूमपासून बिस्किटे, पापड, लोणचे, वड्या असे पदार्थ बनवणे सुरू केले.’ मशरूमच्या लागवडीत मूल्यवर्धन कसे करावे हे देखील तो शिकला. त्याने आपले आधी झालेलले आर्थिक नुकसान देखील भरून काढले.

विकास सांगतो, ‘बटण मशरूमचे शेल्फ लाइफ क्वचितच ४८ तास असते. त्या वेळी मशरूमची विक्री झाली नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. म्हणून मी ऑयस्टर, मिल्की अशा विविध जाती वाढवायला सुरुवात केली. बटण मशरूम बाजारात दिसायला थोडे छान आहेत. त्यामुळे मशरूमचे नाव घेताच लोकांच्या मनात एकच चित्र उमटते, पण ऑयस्टर, दुधी यांसारख्या जातींमध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात आणि ते क्षयरोग, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी असतात.’

 

mushroom inmarathi

 

विकासने वेगवेगळ्या जातींची लागवड केली, पण त्याला हवी तशी बाजारपेठ मिळाली नाही. त्याने मशरूम सुकवून विकण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्याने निश्चय केला होता, की काहीही झाले तरी तो लोकांना त्याचे मशरूम खाऊ घालणारच.

विकास त्याच्या ऑयस्टर मशरूमवर प्रक्रिया करून दुसरीही काही उत्पादन बनवतो. हे मशरूम तो ७०० रुपये किलोने विकत असला तरी त्याच एक किलो मशरूमवर प्रक्रिया केल्यानंतर त्याला सुमारे ८००० रुपये मिळतात.

विकास म्हणतो, ‘५ किलो बिस्किटे बनवण्यासाठी एक किलोपेक्षा कमी मशरूम लागतात. त्यात मैदा, दूध, तूप अशा अनेक गोष्टी मिसळल्या जातात. आम्ही १ किलो बिस्किटे ५०० रुपयांना विकतो. त्याच बरोबर उरलेल्या मशरूमपासून पेय, बड्या अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात.

अशा प्रकारे, सुमारे एक किलो ऑयस्टर मशरूमपासून आम्हाला सुमारे ८००० रुपये मिळतात. ज्यामध्ये ६००० ते ६५०० रुपये आमचा निव्वळ नफा असतो.’

 

mushroom farming inmarathi

 

मशरूम व्यतिरिक्त, विकास त्याच्या एक एकर जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने टोमॅटो, काकडी, कोबी, खरबूज अशा अनेक भाज्यांची लागवड करतो. त्यामुळे त्यांना वर्षाला सुमारे आठ लाख रुपये मिळतात. त्यासाठी त्यांनी हायड्रोपोनिक्स, ठिबक सिंचन अशा अनेक आधुनिक तंत्रांचा अवलंब केला आहे. १० हजारांहून अधिक लोकांना त्याने मशरूम शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. तो अनेक कृषी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी जातो.

मशरूमची लागवड तरुण, महिला आणि दिव्यांगांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यासाठी जास्त जागा किंवा प्रयत्नांची आवश्यकता नाही. घराच्या कोणत्याही रिकाम्या आणि टाकाऊ भागात ते सहजपणे पिकवता येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?