' बारावीनंतर सहज दिली ऑडिशन आणि बॉलिवूडला मिळाली ‘धकधक गर्ल’ – InMarathi

बारावीनंतर सहज दिली ऑडिशन आणि बॉलिवूडला मिळाली ‘धकधक गर्ल’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तम भूमिका साकारणाऱ्या, छान नृत्य करणाऱ्या देखण्या अभिनेत्रींची काही बॉलिवूडमध्ये कमतरता नाही. तरी आजही सिनेप्रेमींच्या दृष्टीने त्या कुणीही माधुरी दीक्षितला पर्याय नाहीत. एखादी व्यक्ती वरून येतानाच बलवत्तर नशीब घेऊन येते. आपल्याकडे माणसांमध्ये साधारण तीन गट पाहायला मिळतात. एक गट त्या माणसांचा असतो जी बिचारी आयुष्यभर कष्ट उपसत राहतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुसरा गट आपल्यासारख्या बहुतांशी माणसांचा असतो ज्यांची काही स्वप्नं पूर्ण होतात तर काही होत नाहीत. तिसरा गट हा देवाच्या काही खास लाडक्या मंडळींचा असतो. उगीच काही आपण अश्या मंडळींना तारे-तारका म्हणत नाही! आज इतकं वय झाल्यानंतरही आपल्या समवयस्क अभिनेत्रींच्या तुलनेत माधुरी दीक्षितचं स्टारडम मोठं आहे.

 

madhuri dixit 5 inmarathi

 

सामान्य माणसावरून तर तिची मोहिनी उतरलेली नाहीच. पण बॉलिवूडमधल्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनासुद्धा आजही माधुरी दीक्षित ‘कॉम्प्लेक्स’ देते. माधुरी दीक्षितने अनेक यशस्वी चित्रपट इंडस्ट्रीला दिले. तिच्या गाण्यांची नावंही घ्यावी लागत नाहीत इतकी ती सुप्रसिद्ध आहेत. पण या बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’ ला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला होता याचा फार रंजक किस्सा आहे.

 

madhuri dixit

 

अनेकदा वेगवगेळ्या मुलाखतींमधून तिने तो सांगितला आहेतच. पण कदाचित माधुरी दीक्षितच्या काही चाहत्यांना आजही तो माहीत नसेल. तर जाणून घेऊयात त्या किश्श्याविषयी.

शाळेत असल्यापासूनच माधुरी दीक्षित नृत्य करायची आणि नाटकात काम करायची. बारावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीत आता नवीन काय करायचं या विचारात माधुरी दीक्षित होती. नेमकं त्याच वेळी ‘अबोध’ या चित्रपटासाठी राजश्री प्रॉडक्शन एका निरागस चेहऱ्याच्या मुलीच्या शोधात होतं.

 

madhuri 3 inmarathi

राजश्री प्रॉडक्शनशी संबंधित एका व्यक्तीची माधुरी नावाची मुलगी माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण होती. त्यांना माधुरी दीक्षित माहीत होती त्यामुळे ती व्यक्ती ‘अबोध’ चित्रपटाची ऑफर घेऊन माधुरी दीक्षितच्या घरी आली आणि तिच्यासमोर त्यांनी चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला. माधुरी दीक्षितच्या घरचं कुणीही त्यापूर्वी चित्रपटसृष्टीत नव्हतं.

या चित्रपटात माधुरीला काम करू द्यायला तिच्या कुटुंबीयांनी त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. पण म्हणतात ना, एखाद्या गोष्टीवर ज्याचं नाव लिहिलेलं असतं त्याच्याकडूनच ती गोष्ट घडायची असते. चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीला बहुधा माधुरी दीक्षितच चित्रपटासाठी हवी असावी. त्याने खूप समजावल्यानंतर अखेरीस माधुरीच्या घरचे तिला चित्रपटात काम करू द्यायला तयार झाले आणि राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये पोहोचले.

 

rajshree im

 

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर माधुरीला तिथे काही संवाद हिंदीत वाचायला दिले गेले. माधुरी दीक्षितचं हिंदी चांगलं असल्यामुळे तिला त्यानंतर थेट स्क्रीन टेस्टसाठीच बोलावलं गेलं. या स्क्रीन टेस्ट मध्ये माधुरी दीक्षितची निवड झाली आणि अश्या प्रकारे तिला तिचा ‘अबोध’ हा पहिला चित्रपट मिळाला.

१९८४ साली ‘अबोध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हीरेन नाग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यावेळी माधुरी दीक्षित अवघ्या १६-१७ वर्षांची होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला आणि माधुरीने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. पण दरम्यान तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने ३-४ चित्रपटांत कामं केली. मात्र तेही चित्रपट चालले नाही.

 

madhuri 2 inmarathi

 

दुसरी एखादी व्यक्ती यानंतर पुढे येऊ शकली नसती. पण याही वेळेस माधुरीचं नशीब जोरावर होतं. खुद्द सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटात तिला घेऊन तिला री-लाँच केलं. कालौघात माधुरी दीक्षित हे नाव अजरामर झालं.

 

madhuri inmarathi

 

एका पेक्षा एक उत्तमोत्तम चित्रपट आणि गाणी दिलेल्या माधुरी दीक्षितने लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून बराच काळ ब्रेक घेतला होता. पण २००७ साली ‘आजा नचले’ या चित्रपटातून माधुरी मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकली आणि तिच्या दिलखेचक अदाकाऱ्यांनी आणि ठुमक्यांनी चाहते पुन्हा घायाळ झाले. ‘कलंक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर ती शेवटची दिसली होती.

बारावीनंतरच्या सुट्टीत कंटाळा घालवण्यासाठी ऑडिशन देणारी एक मुलगी आजही तिच्या अमाप चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. कुणाचं नशीब कुणाला कुठे घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?