' दुसऱ्या महायुद्धात ‘कलकत्ता’ वाचलंय ते ब्रिटिशांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे…. – InMarathi

दुसऱ्या महायुद्धात ‘कलकत्ता’ वाचलंय ते ब्रिटिशांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कलकत्ता किंवा कोलकता हे शहर भारतातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. कोलकता या शब्दाचा अर्थ ‘मां कालीचे स्थान’ असा असून नवरात्रीत येथे होणारी दुर्गापूजा ही देशाबरोबरच विदेशातही प्रसिद्ध आहे. या शहराला ऐतिहासिक तसेच नाट्य, कला, साहित्याचा मोठा वारसा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वातंत्र्यपूर्व काळात कलकत्ता हे देशाचे सत्ताकेंद्र होते. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ ते १९११ च्या ब्रिटिश राजवटीच्या काळात कलकत्ताला देशाची राजधानी बनविले होते. त्याकाळी बनवलेल्या अनेक सुंदर वास्तूंनीं या शहराच्या सौंदर्यात अजूनच भर घातली.

व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल ही कलकत्त्यामधील मोठी संगमरवरी इमारत जगप्रसिद्ध आहे. सुमारे १९२१ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.

 

kolkata memorial hall inmarathi

 

या वास्तूचे डिझाइन इंडो-सारासेनिक पुनरुज्जीवन शैलीमध्ये आहे, ज्यात व्हेनेशियन, इजिप्शियन, डेक्कनी वास्तुशास्त्रीय प्रभावांसह ब्रिटिश आणि मुघल घटकांचे मिश्रण वापरले आहे. मकराना मार्बल म्हणजेच पांढरा संगमरवरी दगड वापरून ही इमारत बनविण्यात आली आहे.

आग्रा येथील ताजमहल आणि या इमारतीच्या रचनेत साम्य असल्यामुळे या इमारतीला ‘ताज ऑफ राज’ असेही म्हटले जायचे, पण तुम्हाला माहीत आहे का? ही प्रतिष्ठित इमारत एकदा काळ्या रंगात रंगवली गेली होती?

तर ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाची. या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने थेट सहभाग घेतला नव्हता, परंतु कलकत्ता हे ब्रिटिशांची वस्ती तसेच अमेरिकन सैन्याचे तळ बनले होते.

१९४३ च्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी आर्मी एअर फोर्सने कलकत्त्यावर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. त्या काळात जपानी आर्मी बहुदा रात्रीच्या वेळी हवाई हल्ले करत असत. बघता बघता कलकत्त्याचे आकाश रणांगणात बदलून जाई.

 

war im

 

जपानी आक्रमणांमुळे शहरातील काहीही अबाधित राहिले नाही. सैन्याचा फटका बसण्यापासून वाचण्यासाठी लोकांनी रस्ते, दुकाने, घरे आणि इतर इमारती जाड काळ्या कागदाने झाकायला सुरुवात केली.

व्हिक्टोरिया मेमोरियल वाचवण्याचे आव्हान होते. चमकदार पांढर्‍या संगमरवरीने बनलेली आणि १८४ फूट उंच असणारी ही भव्य इमारत कशी लपवायची हा प्रश्न ब्रिटिशांना पडला.

ब्रिटीश सरकारने १९४३ मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी माती, शेण यांच्या मिश्रणात काळा रंग टाकून स्थापत्यशास्त्राचा हा चमत्कार पूर्णतः लपविला. रात्रीच्या वेळी काळ्या रंगामुळे ही वास्तु पटकन दिसत नसे आणि त्याचमुळे जपानी हवाई हल्ल्यापासून या वास्तूचे रक्षण करता आले.

ब्रिटिश सरकारची ही क्लृप्ती जपानी सैन्यापर्यंत पोहचू नये म्हणून शहरात कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण करण्यास शहरात बंदी घातली होती. असे मानले जाते, की खालील छायाचित्र यूएस आर्मी फोटोग्राफर फ्रँक बाँड आणि फ्रँक कागल यांनी १९४३ च्या उत्तरार्धात काढले होते.

 

kolkata memorial hall inmarathi1

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?