' “फार्महाऊसवर मृतदेह गाडलेत” लाडक्या भाईजानवर लागलेल्या आरोपात तथ्य आहे का? – InMarathi

“फार्महाऊसवर मृतदेह गाडलेत” लाडक्या भाईजानवर लागलेल्या आरोपात तथ्य आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या सगळ्यांचा लाडका भाईजान सलमान खानचं नाव जेव्हा येतं तेव्हा काहीना काहीतरी व्यंग निर्माण होतोच. सलमान एक अभिनेता म्हणून किंवा एक सुपरस्टार म्हणून किती मोठा आहे हे आम्ही सांगायची गरज नाही, पण यापलीकडे सलमानची माणूस म्हणून जी प्रतिमा तयार झाली आहे त्यावर कायमच प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.

मग तो “कधीच न घडलेला फुटपाथ अपघात” असो किंवा “काळविटाची आत्महत्या” असो, अशा असंख्य केसेसमध्ये आपल्या भाईजानच्या केसालाही कुणी धक्का लावू शकलं नाही, हो की नाही?

 

salman deer case IM

 

एवढंच नाही तर कित्येक गुणी कलाकारांना ‘घरबसल्या’ पैसे कमावता येतील अशी सोयसुद्धा आपल्या भाईजानने करून दिली. विवेक ओबेरॉयपासून अरजित सिंग ते सुशांत सिंहपर्यंत कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘केवळ आणि केवळ ऐश्वर्याच्या बिल्डिंगमधल्या लोकांना त्रास होऊ नये’ म्हणून सल्लूने तर चक्क आपल्या ‘प्रेमाचासुद्धा’ त्याग केला. अशा या ‘दानशूर’ ‘कर्मवीर’ लाडक्या भाईजानवर पुन्हा असेच काही बिनबुडाचे आरोप लागले आहेत.

 

salman aishwarya IM

 

सलमानच्या पनवेल फार्म हाऊसच्या बाजूच्या प्लॉटचा मालक आणि सलमानचा शेजारी केतन कक्कड याने एका यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सलमानवर फार गंभीर आरोप लावले आहेत.

सलमानच्या या शेजाऱ्याने सलमानच्या फार्महाऊसवर बऱ्याच स्टार्सचे मृतदेह गाडले असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय बडी नेतेमंडळी, डी गॅंगच्या आड राहून सलमान काम करतोय आणि त्याचा लहान मुलांच्या तस्करीमध्येसुद्धा हात आहे.

 

ketan kakkad IM

 

हे आरोप फार गंभीर असल्याने याविरोधात सलमानने केतन यांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून, सलमानच्या वकिलाने यावर स्पष्टीकरण दिले आहे की “हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत आणि  या सगळ्या प्रकारात एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, शिवाय याविषयी कोतेही पुरावे नसल्याने हे आरोप धादांत खोटे आहेत!”

यूट्यूबवरचा हा व्हिडिओ काढण्याचे आदेश अजूनतरी आदेश दिले नसले तरी यामुळे सलमान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्याकडून या आरोपांचे खंडन जरी केले असले तरी शंकेला वाव आहे असंच त्याचं वागणं असतं.

चॅरिटी, NGO च्या आड नेमके काय काय धंदे चालू असतात हे आपण याआधीही बऱ्याचदा पाहिलं आहे, शिवाय सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सलमानचं नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं.

 

salman sushant IM

 

आजही सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अशा बऱ्याच थिअरीज आपल्याला इंटरनेटवर वाचायला पाहायला मिळतील ज्यामध्ये थेट सलमानचं नाव घेऊन बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या आहेत.

अर्थात या सगळ्या गोष्टी तेव्हाच सिद्ध होतील जेव्हा या सगळ्याविरोधात पुरावे सापडतील आणि ते पुरावे सिद्ध करण्यात आपल्या यंत्रणेला यश मिळेल. तोवर या सगळ्या गोष्टींकडे Conspiracy theory म्हणूनच आपण बघायला हवं.

हे सगळं मांडून भाईजानची प्रतिमा मलिन करण्याचा या लेखाचा हेतु नाही. पुढे या प्रकरणात समजा काही तथ्य आढळून आलं आणि केतन कक्कडची अवस्थासुद्धा सलमानच्या बॉडीगार्डप्रमाणे म्हणजेच रवींद्र पाटीलप्रमाणे झालीच तर त्यात नवल वाटायची काही गरज नाही.

 

salman ravindra patil IM

 

आपला भाई किती चांगला ‘Human’ आहे याची आपल्याला जाणीव आहेच, लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या लोकांप्रमाणेच भाईजान केतन कक्कडचीसुद्धा चांगलीच सोय करेल, कारण भाईजानने एकदा कमिटमेंट केली की ते स्वतःचंसुद्धा ऐकत नाहीत, विषय संपला!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?