नो मोबाईल डे : रोजच्या कटकटीपासून ब्रेक घेण्यासाठी, एक दिवस सुखाने जगण्यासाठी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आले, अगदी खेडे झाले असे म्हटले जाते. असं म्हणतात की पानिपताच्या लढाई हरल्यानंतर महाराष्ट्रात माहिती कळायला दीड महिन्याचा कालावधी लागला
परंतु आज काही क्षणातच जगाच्या पाठीवर कुठेही काही घडले तर आपल्या मोबाईलवर माहिती उपलब्ध होते. सॅम्युएल मोर्स च्या तारे पासून झालेली सुरुवात आज व्हीडीओ कॉलींग पर्यंत पोहचली.
यापुढे भविष्यात काय प्रगती असेल हे कल्पनेच्या पलीकडे आहे.
विज्ञानाच्या प्रगतीचा आवाका इतका प्रचंड आहे की तो आपल्याला कितपत पेलवेल या विषयी जरा शंकाच आहे. गेल्या पुर्ण सहस्त्रकात झालेली विज्ञानाची प्रगती एकीकडे आणि शेवटच्या शतकाच्या बरोबर आहे, शतकाची प्रगती दशकाच्या आणि दशकात केलेली प्रगती आता आपण एका वर्षात करत आहोत इतका हा वेग प्रचंड आहे.
माकडापासून आजचा मानव उत्क्रांत व्हायला लाखो वर्षांचा कालावधी जावा लागला, अश्म युगापासुन झालेली सुरुवात मानवाला आज या टप्प्यावर घेऊन आली आहे. विज्ञानाच्या प्रगतीच्या मानाने मानवाच्या उत्क्रांतीचा वेग निश्चितच तोकडा आहे.
खरेतर विज्ञानाच्या मदतीने माणसाचे जीवन सुखकारक होणे अपेक्षित होते, ते बहुतांश प्रमाणात झालेही, परंतु भौतिक शास्त्राच्या माहिती तंत्रज्ञान या शाखेने मानवावर नियंत्रण मिळवायला, दुष्परिणाम करायला सुरुवात केली.
याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भ्रमणध्वनी.
भ्रमणध्वनी चा स्मार्ट फोन झाला आणि आपल्याला त्याचे व्यसनच लागले. ईतके की बॅटरी संपल्यावर माणसे किती बेचैन होतात हे आपण अवतीभवती पाहतो. अशी माणसं पाहिल्यावर दारूच्या व्यसना पेक्षा हे वाईट हे जाणवते.
स्मार्ट फोन मुळे सोशल मिडिया आपल्याला हातावर उपलब्ध झाला. अप्रुप तर होतेच आता उपलब्ध ही झाल्यामुळे सर्वच हरखून गेले. खरेतर सोशल मिडियाचा उद्देश हलक्याफुलक्या गोष्टी शेअर करणे, विचार मांडणे, काही प्रमाणात मनोरंजन, हा होता.
परंतु हा उद्देश मागे पडून याचा वापर आता सर्रासपणे कार्यालयीन कामासाठी, आपल्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. चांगल्या गोष्टींचा आपण बट्ट्याबोळ केला.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे माहितीचा वेग वाढला, माहितीचे विश्लेषण ही झटपट होउ लागले. अंतराच्या मर्यादा मिटल्या. बरीचशी धावपळ वाचली. माहितीचा खजिनाच उपलब्ध झाला.
परंतु एक गफलत इथेच झाली, माहितीला ज्ञान व तंत्रज्ञान समजण्याची.
हे सर्व होत असताना माणसांच्या शारीरिक व मानसिक मर्यादा यापूर्वी प्रमाणेच आहेत. सहाजिकच कामाचे तास वाढले. यातूनच माणसाची घुसमट सुरू झाली. संवादाची साधने वाढण्यापूर्वी आपण कामं करतच होतो. उलट कामाच उरक आणि आवाका जास्त होता असं “जुनी जाणती” सांगतात.
स्मार्ट साधनामुळे आभासी जगातच माणूस जास्त वावरतो. जागतिक गुंतवणूक गुरु वॉरन बफे मोबाईल वापरत नाहीत तसेच रतन टाटा CEOजना वर्षातून फक्त एकच पत्र पाठवतात.
WHO च्या अहवाला नुसार ४० तास प्रती आठवडा यापेक्षा जास्त काम केले, तर माणसाच्या शरीरावर वाईट परीणाम होतात. याचमुळे अनेक देशांमध्ये ५ दिवसांचा आठवडा आहे . त्यामुळे कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे.
स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे चिंता, नैराश्य, निद्रा नाश, ताणतणाव यासारखे मनाशी संबंधीत आजार होतातच, परंतु त्यातूनच हृदयविकार, रक्तदाब या सारखे त्रास होतात.
कर्मचाऱ्यावरील ताणतणाव टाळण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या दर आठवड्याला नो मोबाईल डे राबवतात. आठवड्यात एक दिवस मोबाईल वापरावर बंदी. याचे खूप सकारात्मक परिणाम दिसून आले. कार्यक्षमता वाढली. या कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत जे आपल्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतात.
शेवटी नोकरी सुखा समाधानासाठी केली जाते.
बहुराष्ट्रीय कंपन्यांना जे जमले ते आपल्याला का शक्य नाही. कोणाची वाट पाहण्या ऐवजी सुरुवात करुयात…एक दिवस मोबाईल शिवाय….नो मोबाईल डे….!
—
- अॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा
- सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.