ओमिक्रोनमुळे लशीची गरजच राहिली नाही; जगभरातील तज्ज्ञांचा नवीन सिद्धांत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
गेली २ वर्षे कोरोनामुळे आपण घरात अडकून पडलो होतो. कुठे बाहेर जायची सोय नव्हती, की कोणाला भेटता येत नव्हतं. सण- समारंभ, लग्नसराई या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या उदासीतच गेल्या.
पण हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत, असं वाटलं आणि पुन्हा ‘ओमिक्रोन’ नावाचं एक वादळ आलं. पुन्हा निर्बंध लावण्यात आले, आकडे वाढू लागले आणि लोकांच्या मनातील धास्तीसुद्धा..
या नव्या व्हायरसविषयी लोकांनी अनेक सिद्धांत मांडले, यातला एक सिद्धांत सुखावणारा होता. ओमिक्रोन हा व्हायरस आपल्याला कोरोनापासून कायमची सुटका मिळवून देऊ शकतो, असा एक सिद्धांत तज्ज्ञांनी मांडला होता.
सिद्धांत असा आहे, की कमी दाहक व्हायरस प्रबळ झाला, तर जास्त लोकांना व्हायरसची लागण होईल, पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत. व्हायरस हा प्रॉब्लेम असणारच आहे, एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली आणि त्यातून तो बरा झाला तर त्याच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. आता दिलेल्या कोणत्याही लसीपेक्षा या रोगप्रतिकारशक्तीचा फायदा जास्त असेल.
—
- ओमिक्रोन ठरणार मानवजातीसाठी वरदान? वाचा, तज्ज्ञांचा सिद्धांत
- हॉस्पिटलला न जाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढायचंय? मग घरात या ५ वस्तु हव्याच
—
आता अनेक शास्त्रज्ञांचा या गोष्टीवर विश्वास बसू लागला आहे, की ओमिक्रोनमुळे कोव्हीडची दाहकता कमी झाली आहे. ज्या लोकांना ओमिक्रोन व्हायरस झाला, त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज तयार झाल्या. अतिशय कमी किंवा काहीच लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या शरीरात सुद्धा अँटीबॉडीज तयार झाल्या.
अनेक देशांमध्ये रुग्णांचे आकडे वाढताना दिसत असले, तरी त्यांना अत्यंत कमी लक्षणं आहेत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज अत्यंत कमी रुग्णांना भासतेय.
नोव्हेंबर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत हा व्हायरस सगळ्यात पहिल्यांदा दिसून आला होता, परंतु ओमिक्रोनची लाट तिथे ओसरली असून बाकीच्या देशातही येत्या काही दिवसात ती लाट जाईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही तज्ज्ञांनी असेही म्हणणे मांडले आहे, की तुम्हाला ओमिक्रोन झाला असेल, तर तुम्हाला लस घ्यायची सुद्धा गरज नाही. ओमिक्रोन नैसर्गिक लसच आहे, त्याचा जीवाला धोका कमी आहे, असेही डॉक्टर सांगतात.
‘आतापर्यंत येऊन गेलेल्या साथीच्या रोगांचा इतिहास बघता आपण कोव्हीड संपण्याचा जवळ आलो आहोत. पँडेमिक्स संपताना त्यांचं स्वरूप हे हळूहळू कमी दाहक होत जातं. त्यामुळे ओमिक्रोनकडे एक टेन्शनची गोष्ट म्हणून बघू नका, व्हायरसचं हे कमी दाहक रूप आपल्याला एकच गोष्ट सांगतंय, ती म्हणजे आपण ही साथ संपण्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत.’ असे एका डॉक्टरचे म्हणणे आहे.
‘ज्यांना ओमिक्रोन होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता डेल्टा, अल्फा, गॅमा आणि इतर व्हायरसपासून धोका नाही. दोन वर्ष आपण ज्या संकटातून जात होतो, ही त्या संकटाच्या शेवटाची सुरुवात आहे’ असे डॉक्टरांनी एका कॉन्फरन्समध्ये सांगितले.
एखाद्या जंगलात वणवा लागला, की संपूर्ण जंगल पेटतं, सगळी झाडं नष्ट होतात, पण त्यानंतर मात्र जाळण्यासाठी काहीच उरत नाही. मग आगही कमी होते. या साथीच्या रोगाचे, ओमिक्रोनचे सुद्धा तसेच आहे. आकडे खूप वाढल्यानंतर त्याची संख्या कमी होणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका आणि लंडनमध्ये ओमिक्रोन जवळपास गेलाच आहे.
ही पँडेमिकच्या शेवटाची सुरुवात आहे, सगळ्यांना योग्य इम्युनिटी मिळाल्यामुळे हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येतील. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिलं’ असं आपण या सगळ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यावरून सांगता येऊ शकतं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.