IT मध्ये लोक धडाधड नोकऱ्या सोडतायत, तुमच्यासाठी नामी संधी चालून येतेय, वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
भारतात नोकरी मिळवणे किंवा असलेली नोकरी सोडणे या खूप मोठ्या गोष्टी आहेत. इतकं सगळं असूनही भारतातील IT क्षेत्रात काम करणारे कामगार सध्या नाखूष आहेत. प्रत्येक तिमाहीमध्ये IT क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्या कामगारांची संख्या आणि टक्केवारी वाढतच चालली आहे.
हीच समस्या सध्या अमेरिकेत सुद्धा भेडसावत आहे. अमेरिकेत मोठ्या संख्येने लोक IT मधील नोकरी राजीनामा सोडत आहेत. हे वर्षभरापासून सुरू आहे, मात्र गेल्या महिन्यात राजीनामा देणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढली. त्याला ‘The Great Resignation’ असे नाव देण्यात आले आहे.
भारतातील नोकरीची बाजारपेठ युरोप आणि अमेरिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इथले लोक स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने इतक्या लवकर नोकरी सोडणे योग्य समजत नाहीत. तसेच भारतात रोजगार कमी आणि लोकसंख्या जास्त आहे.
तर भारतीय आयटी क्षेत्र सध्या एका नव्या समस्येला तोंड देत आहे. आयटी क्षेत्रामधून नोकरी सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील टॉप आयटी कंपन्या जसे की TCS, Infosys आणि Wipro या कंपन्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे, कारण या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कंपनी सोबत जोडून ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
—
- कंपनी जेव्हा राजीनामा देण्यास दबाव टाकते त्यावेळी टर्मिनेशन लेटर घ्यायचं की राजीनामा द्यायचा?
‘नोकरी’ सोडताना घ्या ही खबरदारी; या चुका चुकूनही करू नका!
मागील काही महिन्यांपासून या कंपन्यांमध्ये नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सध्या या कंपन्या मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सची भरती करत आहेत, जेणेकरून ते कंपन्या सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरपाई करू शकतील.
तिन्ही प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांनी बुधवारी डिसेंबर तिमाहीचे त्यांचे निकाल जाहीर केले. यामध्ये या कंपनींनी सांगितले, की त्यांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात नोकरी सोडत आहेत.
पहिल्या क्रमांकावर असलेली भारतीय आयटी कंपनी टीसीएस या कंपनीमधून डिसेंबरच्या तिमाहीत एकूण १५.३% कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. तर या तिमाहीच्या मागील तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान नोकरी सोडणाऱ्यांचा हा दर ११.९% होता.
त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाची टॉप भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसचीही परीस्थिती फारशी चांगली नाही. या कंपनीमध्ये डिसेंबर तिमाहीत नोकरी सोडणाऱ्या लोकांच्या दरात २५% ने वाढ झाली आहे.
यापूर्वी, म्हणजे जून ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये हा दर २०% एवढा होता. त्यामुळे आपल्याला दिसून येईल, की डिसेंबरच्या तिमाहीमध्ये ही टक्केवारी ५०% पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे इंफोसिस एकूण ५५ हजार नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती करणार आहे.
भारतीय आयटी कंपनी विप्रो देखील याच समस्येमुळे चिंतीत आहे, तिची स्थिती पण इतरांपेक्षा काही वेगळी नाही. या कंपनीतही सप्टेंबरच्या तिमाहीत नोकरी सोडणाऱ्यांची संख्या २०.५% होती. जी डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत २१.७% वर पोहोचलेली आहे. तुम्हाला जाणून आनंद होईल, की विप्रो ही कंपनी सुद्धा ३० हजार नवीन लोकांची भर्ती करणार आहे.
एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तिन्ही भारतीय आयटी कंपन्यांनी १.३४ लाख लोकांची भरती केली आहे. जर आपण वर्षभरापूर्वीच्या याच कंपनीच्या भरतीशी तुलना केली तर वर्तमानकाळात सुरु असणारी भरती जवळपास ४ पट जास्त आहे.
गेल्या डिसेंबर तिमाहीत, TCS मध्ये ३४,००० नवीन लोकांची भरती झाली. दुसरीकडे, या आधीच्या सप्टेंबरच्या तिमाहीबद्दल बोलायचे झाले तर, या भरतीची संख्या ४३,००० एवढी होती.
त्याचप्रमाणे, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत विप्रोचे कर्मचारी १०,००० ने वाढले. जर आपण इन्फोसिसबद्दल बोललो, तर या कालावधीत त्याने १५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
Limeade च्या अहवालानुसार, ४०% लोकांनी कंपनीमध्ये जास्त काम दिले जाते म्हणून नोकरी सोडली आहे. या सर्वेनुसार, लोकांना अशी नोकरी हवी आहे, ज्यात कामाचे तास कमी असतात. आठवड्यातील कामकाजाच्या दिवसांची संख्या कमी असते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी वीकेंड सुट्टी हवी असते.
कामगार विभागाच्या जॉब ओपनिंग्ज आणि लेबर टर्नओव्हर सर्वेक्षणानुसार, सप्टेंबरमध्ये नोकऱ्या सोडणाऱ्यांची एकूण संख्या १६४००० वरून वाढून ४.४ दशलक्ष झाली आहे.
अमेरिकेमध्ये सध्या १०.४ दशलक्ष पदे रिक्त आहेत. फॉर्च्युन आणि डेलॉइट यांनी एक सर्वेक्षण केले. ११७ सीईओच्या सर्वेक्षणात असे दिसून आले, की कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे येत्या २-३ वर्षात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
५७ टक्के सीईओचा असा विश्वास आहे, की योग्य प्रतिभा असलेले कामगार मिळवणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचवेळी, ५१ टक्के लोकांचे म्हणणे आहे, की चांगल्या लोकांना नोकरी सोडण्यापासून रोखणे हे देखील मोठे आव्हान बनत चालले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.