' नवरी ‘या’ गाण्यावर नाचली, म्हणून वराने संतापून लग्नमंडपातच दिला घटस्फोट – InMarathi

नवरी ‘या’ गाण्यावर नाचली, म्हणून वराने संतापून लग्नमंडपातच दिला घटस्फोट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्व असलेल्या दिवसांपैकी एक दिवस असतो. या दिवसापासून तो व्यक्ती त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात करतो. जगातील प्रत्येक कोपऱ्यात विवाहाला घेऊन वेगवेगळे नियम आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या भारतीय परंपरेत लग्न हे एक नव्हे तर सात जन्मांचे बंधन मानले जाते, परंतु काही दिवसांपूर्वी इराणमध्ये एका प्रेमी जोडप्याचा लग्नाच्या दिवशीच घटस्फोट झाला. ऐकायला तर आपल्याला हे विचित्र वाटेल, परंतु ही संपूर्ण घटना खरी आहे आणि ईरान मधील बगदाद या शहरात घडलेली आहे.

या घटस्फोटामागचे कारण सांगितले जात आहे, की लग्न झाल्यानंतर डीजेवर गाणी वाजवली जात होती. गाणे सुरु असतांनाच वधूने तिच्या आवडीचे गाणे वाजवले आणि त्यानंतर ती त्या गाण्यावर नाच करु लागली, परंतु वराला वधूने लावलेले ते गाणे अजिबात आवडले नाही आणि त्यामुळे त्याने संतापून लग्नमंडपामध्येच वधूला घटस्फोट दिला.

 

divorce inmarathi

 

या लग्न समारंभात वधू ‘प्रक्षोभक’ सीरियन गाण्यावर नाच करत होती. ‘मेसायतारा’ या सीरियन गाण्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि वराने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

खरंतर, सीरियन गाणे ‘मेसायतारा’ याचा अर्थ ‘मी स्वावलंबी आहे’ किंवा ‘मी तुला नियंत्रित करु शकते’ असा होतो. याच कारणामुळे वर आणि त्याच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि परिणामस्वरूप त्याने आधी वधूसोबत वाद घातला आणि त्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा गाण्याच्या सुरुवातीच्या ओळींचे भाषांतर केले गेले तेव्हा गाण्याच्या पहिला भागाचा अर्थ पुढीलप्रमाणे निघाला, ‘मी प्रभावी आहे; माझ्या नियमांप्रमाणे तुला काम करावे लागेल. जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहेस तोपर्यंत तू माझी आज्ञा पाळशील; मी गर्विष्ठ आहे, मी गर्विष्ठ आहे.’

 

divorce-in-india InMarathi

 

या गीतामुळे वराला आणि त्याच्या नातेवाईकांना इतका राग आला, की त्याने वधूपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एखादे गाणे लग्न मोडण्याचे कारण बनण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील जॉर्डन मध्ये अशी घटना घडलेली आहे.

दुसर्‍या एका घटनेत, लेबनॉन या देशामध्ये “आय लव्ह यू गाढव” या गाण्यामुळे भर लग्नामध्ये घटस्फोट झाला होता. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वराने आपल्या पत्नीला या गाण्यावर डान्स केल्यामुळे घटस्फोट दिला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?