' “बाळाला अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला, पण..” पहा या अभिनेत्री काय म्हणतायत! – InMarathi

“बाळाला अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला, पण..” पहा या अभिनेत्री काय म्हणतायत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आई आणि बाळ यांचे नाते हे शब्दात मांडणे तसे कठीणच! ते क्षण असे असतात जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला हातात धरता तेव्हा जगातले सर्वात मौल्यवान काहीतरी तुमच्या हातात असल्याचा तुम्हाला भास होतो. आई आणि बाल यांच्यात असे अनेक भावबंध तयार होत असतात त्यासाठीचा महत्वाचा एक मार्ग आहे स्तनपान किंवा ब्रेस्टफीडिंग.

 

breast feeding inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आईचे दूध हा नवजात बाळाच्या पोषणासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे हे आत्तापर्यंत सिद्ध झाले आहे. पण तरीही याबद्दल समाजात अजूनही काही समज-गैरसमज आहेत. आजकाल स्त्रिया अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. जेव्हा त्या अशा अनुभवांना समोऱ्या जातात तेव्हा त्यांना काय वाटते किंवा स्तनःपानाबाबत दिले जाणारे सल्ले या सगळ्या गोष्टी आजही पडद्याआडच आहेत, स्तनपान किंवा ब्रेस्टफिडिंग याबद्दल अनेकदा आपल्या समाजात लोकं उघडपणे बोलताना दिसत नाहीत.

खरंतर याआधीच सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजण्याच्या मुद्द्यावरुनही बरीच चर्चा झालेली आहे, पण तरिही अनेकदा स्तनपात करण्याचे अनुभव, त्यातील समस्या यावर अजूनही महिला मनमोकळेपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र आता नव्या फळीतील काही बॉलीवूड तारका हे अनुभव सांगण्यासाठी पुढे आल्या आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे आपली मते आणि आपले स्तनपान करतानाचे फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केले आहेत.

 

breastfeeding im

 

त्यातील काहींना ट्रोलिंगचा ही सामना करावा लागला. तरीही नव्याने आई होवू घातलेल्या मुलींना स्तनपानाचे महत्व समजावे आणि त्यांच्यात त्यासाठीची जागरूकता यावी म्हणून या अभिनेत्रीनी आपला हा उपक्रम सुरूच ठेवला आहे.

पाहूया, स्तनपानाबद्दल काय म्हणतात या अभिनेत्री…

१. करीना कपूर-खान

आजची आघाडीची अभिनेत्री असलेल्या करीनाने स्तनपानाबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हंटले आहे की आईचे दूध हे नवजात बाळासाठी खूप महत्वाचे असते.

 

kareena im

 

बाळाच्या जन्मानंतरचा, त्याचा सगळ्यात महत्वाचा आहार आईचे दूध हाच असतो. बाळाला त्याची सर्वात जास्त गरज असते,तेव्हा आईने आपल्या बाळाला स्तनपान केलेच पाहिजे.

२. ऐश्वर्या राय बच्चन

लाडकी लेक आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्याची ‘आई’ ही नवी ओळख जगाने पाहिली. सुरवातीपासूनच सौंदर्य, फिटनेस यासाठी ऐश्वर्या प्रसिद्ध आहे. आराध्याच्या जन्माच्या दुसर्‍या दिवशीच ऐश्वर्यावर खूप कठीण वेळ आली, खासकरून ती ‘वजन-वाढीचे’ चे लक्ष्य बनली. पण वाढलेल्या वजनाच्या समस्येकडे दुर्लक्ष करत तिने लहानग्या आराध्याचे संगोपन केले.

 

aishwarya im

 

एका अहवालानुसार, तिने दीर्घकाळ स्तनपान सुरू ठेवले होते. त्यावेळी स्वतःसाठी आणि तिच्या मुलीसाठी योग्य पोषण आहाराकडेही तिने लक्ष ठेवले. ती म्हणते, “बाळासोबतचा तिचा ‘वेळ’ हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. याशिवाय, मातृत्वाची चमक ही जगातील सर्वोत्तम सौंदर्यप्रसाधने आहे…”

३. लारा दत्ता

सायराच्या, म्हणजे तिच्या मुलीच्या जन्मानंतर लारा तिला नियमितपणे स्तनपान देत असे. यामुळे सायराची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत झाल्याचे तिला आढळले. कालांतराने, यामुळे लाराला तिचे शरीर टोन करण्यास आणि तिने गर्भधारणेदरम्यान वाढवलेले अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत झाली.

आज, लारा स्तनपानाची सक्रिय समर्थक आहे आणि नेहमी तरुण मातांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यास प्रोत्साहन देते.

 

lara dutta im

 

तिचा ठाम विश्वास आहे की नर्सिंग हा केवळ आपल्या मुलाशी संबंध ठेवण्याचाच नाही तर पूर्वीच्या आकारात परत येण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

लारा म्हणते “आई होणे ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर बाब आहे. ती मोठी जबाबदारी आहे. एक आई म्हणून मला सर्व नवीन आणि गर्भवती मातांना स्तनपानाचे महत्त्व समजण्यास मदत करायची आहे. व्यायाम आणि डाएटिंग व्यतिरिक्त, स्तनपानामुळे मला अभिनयात परत येण्यासाठी माझे शरीर टोन करण्यास मदत झाली.”

५. लिसा हेडन

नवजात बालकांना स्तनपान देण्याच्या गरजेबद्दल लिसा अनेकदा बोलली आहे. तिने तिचे वजन कमी करणे आणि फिटनेसचे श्रेय स्तनपानाला दिले आहे.

गेल्या वर्षी मे मध्ये मातृत्व स्वीकारल्यानंतर, लिसाने खालील कॅप्शनसह, जागतिक स्तनपान सप्ताहादरम्यान तिच्या मुलाला, झॅकला स्तनपान करताना इंस्टाग्रामवर स्वतःचे एक छायाचित्र अपलोड केले होते.

 

lisa im

 

ती म्हणते, “माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा पुर्वीच्या आकारात येण्यासाठी स्तनपानाने खूप मोठी भूमिका बजावली आहे. स्तनपान करणे हे आव्हानात्मक+वेळ घेणारे आहे. परंतु आपल्या मुलाशी नाते जोडण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे तसेच आपल्या दुधापासून आपल्या मुलाला मिळणारे सर्व पौष्टिक फायदे दुर्लक्षित करू नयेत ”

५. नेहा धुपिया

नेहा धुपियानं बाळाला अंगावरचं दूध पाजण्याचा आपला अनुभव शेअर केला. एका शूटिंगच्या दरम्यान, आपल्या मुलीला दूध पाजण्यासाठी नेहाला झाड्याच्या मागे जावं लागलं होतं.

 

neha dhupiya im

 

आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी नर्सिंग रुमची सेवा सुरु करायला हवी, असं तिनं म्हटलंय. अनेकदा अशी काही सुविधा नसल्याने महिला सार्वजनिक ठिकाणी गरज असूनही मुलांना अंगावरचं दूध देणं टाळतात असे तिला वाटते.

६. मीरा राजपूत 

आईपणाच्या आपल्या दोन्ही अनुभवांबद्दल बोलताना एके ठिकाणी मीरा असे म्हणाली की तिने आपल्या दोन्ही मुलांना संपूर्ण कालावधीसाठी स्तनपान केले. स्तनपान ही आईने आपल्या बाळाला दिलेली सर्वोत्तम भेट असते. तेव्हा आपल्या बाळाला स्तनपान अवश्य करावे.

 

meera 1 im

 

मित्रांनो स्तनपान ही आई आणि तिच्या बाळामधील नाते दृढ करणारी गोष्ट आहे तेव्हा स्तनपानाकडे वेगळ्या नजरेने न बघता त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?