' “शाहरुखच्या मन्नतवर बॉम्ब फोडेन” अशी धमकी देणारा माथेफिरू आहे तरी कोण? – InMarathi

“शाहरुखच्या मन्नतवर बॉम्ब फोडेन” अशी धमकी देणारा माथेफिरू आहे तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई दर्शन म्हंटलं की त्यात सीएसटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्सपासून थेट बांद्रा फोर्ट पर्यंत कित्येक पर्यटनस्थळ येतात. शिवाय मुंबई दर्शन करणाऱ्या प्रत्येकाला इथे राहणाऱ्या सुपेरस्टार्सच्या बंगल्याचं भारी कौतुक असतं.

सलमानचं गॅलक्सि अपार्टमेंट, अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला, अंबानी यांचा अंटालिया एकदातरी बघायला हवा असं प्रत्येकालाच वाटत असतं. यापैकीच आणखीन एक मुंबईतलं सुपरस्टारचं घर म्हणजे किंग ऑफ रोमान्स म्हणजेच शाहरुख खानचा मन्नत.

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi05

 

सध्या गेले काही महीने आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख विचित्र कारणांसाठी चर्चेत असला तरी शाहरुखच्या मन्नतची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. देशविदेशातून कित्येक लोकं आज त्याच्या घरासमोर येऊन फोटो काढतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याचं घर हे हेरिटेज वास्तूमध्ये येत असल्याने त्याबद्दल लोकांना जास्तच आकर्षण आहे, शिवाय शाहरुखच्या या बंगल्याची किंमतसुद्धा खूप जास्त असल्याने सर्वात महागड्या सुपरस्टारचा बंगला म्हणून खूप लोकं आजही त्याची ही वास्तु बघण्यासाठी लांबून येत असतात.

नुकतच काही दिवसांपूर्वी शाहरुखचा हा बंगला बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली होती, या धमकीमागे कोण आहे? आणि असं करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे? यात काही अतिरेकी संघटना सामील आहेत का? तेच आपण जाणून घेणार आहोत.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून नुकतंच जितेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, शाहरुखचा बंगला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी यानेच दिली होती हे समोर आलं आहे, याशिवाय ६ जानेवारी रोजी मुंबईतील अन्य ठिकाणीसुद्धा असेच बॉम्ब हल्ले करण्याची धमकीसुद्धा जितेशने दिल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

jitesh thakur IM

६ जानेवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आलेल्या या कॉलनंतर पोलिसांनी हा कॉल कुठून केला गेला याचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना जबलपूर इथला पत्ता सापडला.

याची पुष्टी केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी जबलपूर इथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना समोर आलेल्या माहितीनुसार जितेश ठाकूर याला दारूचे व्यसन असून त्याने याआधीसुद्धा दारूच्या नशेत फोन करून पोलिसांशी हुज्जत घातली होती हे स्पष्ट झाले आहे.

 

mumbai police inmarathi

 

आरोपीकडे संशयास्पद काहीच आढळले नसले तरी धमकावणे आणि सार्वजनिक सेवेला खोटी माहिती पुरवणे यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

सध्या एकंदरच शाहरुख खानच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलं असून आर्यन खानच्या अटकेनंतर लोकांनी त्याचा राग शाहरुखवर काढायला सुरुवात केली आहे. शाहरुखच्या आगामी सिनेमावरसुद्धा बंदी घाला अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी होताना दिसत आहे.

 

shahrukh IM

 

अशातच त्याच्या घरावर थेट बॉम्ब हल्ला करण्याच्या धमक्यांनी पोलिसांमध्येसुद्धा खळबळ माजली होती. फक्त शाहरुखचं घरच नाही तर मुंबईत इतरत्र कुठेही आत्ता दहशतवादी हल्ले झाले तर परिस्थिति फार बिकट होऊ शकते.

आधीच कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे महाराष्ट्राच्या एकंदरच यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, त्यामुळे या पोकळ धमकीचासुद्धा तपास लावून आरोपीला अटक करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानायलाच हवेत!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?