' तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करताय, याचा clear सिग्नल देणाऱ्या १० गोष्टी! – InMarathi

तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करताय, याचा clear सिग्नल देणाऱ्या १० गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्ना्च्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी पृथ्वीवर जोडीदार हा आपल्यालाच निवडावा लागतो. एकदा का हा निर्णय चुकला की आयुष्याचा खेळखंडोबा होतो.

लग्न तुटतात, नाती संपतात आणि याचा त्रास आपल्यालाच होतो. केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर अनेक कुटुंबांना याचा मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळे आपण ज्या जोडीदाराची निवड करतो, किंवा ज्यासोबत नातं सुरु करतो तो आपल्यासाठी योग्य आहे की नाही? याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

 

 

पण ही निवड योग्य की अयोग्य कसं ठरवायचं? अशी चिंता वाटत असेल या १० मुद्द्यांकडे लक्ष द्याच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. मुखवटा घालून फिरणे 

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला एम्प्रेस करण्यासाठी त्याच्या आवडीच्या संगीतामध्ये किंवा नृत्य प्रकारात रुची दाखवावी लागत असेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला डेट करत आहात.

 

after break up-inmarathi
youtube.com

 

तुमच्या पार्टनरने तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारणे आवश्यक आहे.

२. त्यांना वाटते की जग त्यांच्याभोवती फिरते

तुमच्या जोडीदाराला तुमच्या वैयक्तिक गरजांपेक्षा तुम्ही त्यांच्या जगामध्ये कसे बसता यात जास्त रस वाटत असल्यास, तुम्ही चुकीच्या व्यक्तीची पार्टनर म्हणून निवड केली आहे.

 

couple im

 

जर त्या व्यक्तीच्या बोलण्यात सातत्याने ‘ मी, मला, माझं ‘ अशा शब्दांचे उल्लेख असतील तर तुमची कदर असणारी दुसरी व्यक्ती तुम्हाला शोधावी लागेल.

३. त्याचे मित्र – मंडळी आणि कुटुंबीय तुम्हाला ओळखत नसतील तर. 

एकत्र चांगला वेळ घालवल्यानंतरही जर त्याने त्याच्या मित्र – मैत्रिणी किंवा कुटुंबीय यातील कुणाशीच तुमची ओळख करून दिलेली नसेल तर ही मोठी धोक्याची सूचना असू शकते.

 

 

no im

 

जर ती व्यक्ती सतत वेगवेगळी कारणे देऊन तुम्हाला त्याच्या जवळच्या लोकांच्या संपर्कात येऊ देत नसेल तर ती व्यक्ती नक्कीच विश्वसनीय नाही. जर तुमचा पार्टनर लाजेखातर त्याच्या सामाजिक वर्तुळामध्ये आमंत्रित करत नसेल तर नातं पुढे नेण्यात अर्थ नसतो.

४. जर ती व्यक्ती तुमचं ऐकुन घेत नसेल तर 

जर तुमचा पार्टनर नेहमी बोलण्याची वाट पाहत असेल पण तुमचं ऐकण्याची त्याची इच्छा नसेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात आहात.

 

fighting couple inmarathi

 

जर तुमच्या पार्टनरला त्याचा दिवस कसा गेला, त्याचे कामाचे प्रॉब्लेम्स याबद्दलच बोलायला आवडत असेल आणि तुमच्या आयुष्याबद्दल त्याला काहीही स्वारस्य नसेल तर हे अतिशय चुकीचं आहे. फिरायला जाताना जर ती व्यक्ती तुमची आवडनिवड लक्षात न घेता फक्त स्वतःची आवड जपत असेल तर तुम्हाला जीवन व्यतीत करायला आत्मकेंद्री नसलेले कोणीतरी शोधायचे आहे.

५. त्यांच्यासोबत हँग आउट केल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर

जर तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी डेटिंग करत आहात.

 

couple inmarathi

 

अगदी उत्तम नातेसंबंधांमध्ये सुद्धा अधूनमधून भांडणे होत असतात, परंतु हा अपवाद असावा, आदर्श नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदी आणि जिवंत वाटले पाहिजे, दुःखी आणि अडकलेले नाही.

६. कठीण संभाषणे टाळणे

धर्म, राजकारण , लैंगिक जीवन अशा किचकट विषयांवर पहिल्याच डेट वर बोलण्याची गरज नसते. परंतु नाते जसे जसे पुढे जाते तसे एकमेकांना अधिक समजण्यासाठी या विषयांवर बोलणे गरजेचे होते. परंतु अशा संवादानंतर तुमच्या मधला दुरावा वाढत असेल आणि म्हणून तुम्ही कठीण संभाषणे टाळत असाल तर हे निरोगी नात्याचे लक्षण नाही.

 

couple 1 inmarathi

 

७. तुमचे नाते हे त्याचे एकमेव उद्दीष्ट असेल –

ज्या व्यक्तीला आयुष्यात काहीही छंद नाही, आवड नाही, ओढ नाही अशा व्यक्तीला डेट करायला कुणाला आवडेल.

 

couple inmarathi 1

 

जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काहीही ध्येय नाही आणि तुमचे नातेसंबंध एवढेच त्याच ध्येय असेल तर ही गोष्ट नंतर तापदायक ठरू शकते. कारण नातेसंबंध आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात परंतु ते जीवनाचे एकमेव उद्दीष्ट असू नये.

८. त्यांना २४/७ सहवासाची अपेक्षा असणे 

“अतिही सुगंधी नसावीत नाती, पुढे येत जाते शिसारी वगैरे ” ह्या ओळी प्रमाणे कोणत्याही नात्याला थोडा स्पेस देण्याची आवश्यकता असते.

 

couple inmarathi

 

थोडा एकांत ही प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याची गरज आहे. त्यामुळे जर तुमचा पार्टनर तुमच्या कडून 24/7 सहवासाची अपेक्षा करत असेल तर तुम्हाला नात्याचा पुन्हा विचार करावा लागेल.

९. स्वतःला सिद्ध करावं लागतंय?….

तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी ते पुरेसे ठरत नसतील. तुम्हाला तुमच्या जोडदारासमोर सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. अशा वागण्यामुळे तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.

 

couple fighting inmarathi

 

लक्षात ठेवा योग्य व्यक्तीला सिद्ध करण्याची गरज पडत नाही त्यांच्या साठी तुम्ही नेहमीच पुरेसे असता.

१०. भविष्य पुसट असणे

जर तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर तुमचा भविष्यकाळ कसा असेल याची कल्पना देखील करता येत नसेल तर अशा नात्यामध्ये स्वतःला अडकवून ठेवणे मूर्खपणाचे ठरेल.

ज्या व्यक्ती बरोबर तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता अशा व्यक्तीचा शोध घ्या.

या आणि अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे पार्टनरी निवड करा, अर्थात कोणताही निर्णय घेण्याआधी त्याच्याशी, कुटुंबाशी मनमोकळ संवाद साधा. या संवादाने अनेक प्रश्न सुटतील.

 

couple-inmarathi

 

संवाद, सुसंवाद आणि विश्वास यांनी नाती भक्कम होतील. कोणत्याही भ्रमात न राहता जोडीदाराची निवड करा म्हणजे आयुष्य अधिक सुंदर होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?