ओमिक्रोनचा धोका; हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार मतदान ऑनलाईन पद्धतीने होणार का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
निदान २०२२ हे वर्ष कोरोनमुक्त असेल अशी आशा होती,पण या वर्षात कोरोंना सोबतच ओमिक्रोन या नव्या आजाराचा धोका सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे.त्यामुळे येत्या वर्षात तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
हळू हळू परिस्थिती निवळत असतानाच,सगळ्या गोष्टी पूर्ववत सुरू होत असताना, नव्या वर्षाचे तसेच क्रिसमसचे नव्या जोशात आणि उत्साहात स्वागताचे नियोजन आखले जात असताना अचानक कोरोन आणि ओमायक्रोन पेशंटची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.सगळे नियोजन रद्द झाले आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
नोकरवर्ग,व्यावसायिक,मोलमजुरी करणारे,रोज छोटी मोठी कामे करून पोटाची खळगी भरणारे,विद्यार्थी वर्ग,तळागाळातील लोकांनापासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच या आजारामुळे चांगलाच फटका बसणार आहे.
विद्यार्थीवर्गाचे तर खूपच नुकसान होत आहे,शाळेत जाणं,खोड्या करणं,मित्र मैत्रीणी मध्ये बसून डबा खाणं,एकत्र खेळणं,एकमेकांसोबत भांडणं,गप्पा मारणं सगळं मिस करत आहेत ही मुलं. जी मजा शाळेत जाऊन शिकण्यात आहे ती ऑनलाईन शिकण्यात कशी असेल ??
वाढत्या रोगाचे प्रमाण लक्षात घेता काही गोष्टी करणेच हिताचे ठरणार आहे.त्यामुळे पुन्हा पहिल्यासारखे कडक निर्बंध लागू होणार का ?? लॉक डाऊन पडणार का ?? याचीच चर्चा आणि बातम्या पाहायला मिळत आहेत.सरकारमान्य शाळा तर बंद ही करण्यात आल्या आहेत.
आरोग्यमंत्री माननीय टोपे सर यांनी नियम कडक केले आहेत. पुन्हा एकदा वाढणारे कोरोना आणि ओमिक्रोनची संख्या ही चिंतेची बाब झाली आहे.
अशातच निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना मतदान कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.मतदान हा सगळ्यांचा नैतिक अधिकार ही आहे आणि जबाबदारी सुद्धा.ही जबाबदारी पार पाडणे हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.पण हे कोरॉना संकट लक्षात घेता ई वोटिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे.
आजकालचे प्रगत तंत्रज्ञान लक्षात घेता ई वोटिंग ही साधी गोष्ट झालेली आहे.तसही या लॉक डाऊन काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत म्हणजेच शिक्षण,व्यवसाय तसेच घरी बसून ऑनलाईन काम करण्याचे प्रमाण खूप जास्त वाढते आहे.त्यातच आता मतदानसुद्धा ऑनलाईन झाले तर त्यात नवल ते काय ??
सध्या बऱ्याच कंपन्यांमध्ये सुद्धा लोकांचे मत जाणून घेण्यासाठी मोबाईल अँप्लिकेशनचा वापर केला जातो.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वे सारख्या खूप लोकसंख्येच्या देशात तर बऱ्याच वर्षांपासून ऑनलाईन मतदान पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
निवडणूक आयोगाने याआधीच ई मतदानाची मागणी होती. २०१०-२०११ मध्ये गुजरात नगरपालिकेने मतदान केले होते. त्यावेळी ऑनलाईन मतदान करण्यासाठी मतदाराची ओळख म्हणून मतदाराचे आधार कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या माहिती असलेले रजिस्टर यांच्या साहाय्याने ऑनलाईन लिंक दिली जाईल तसेच त्यामुळे मतदाराची ओळख करणे सोपे होईल असेही म्हटले होते.
ऑनलाईन मतदानामुळे रांगेत उभारण्याची गरज नसते,वेळ वाया जात नाही तसेच हे मतदान लवकर होते.त्यामुळे कोरोनाच्या संक्रमण काळात ई वोटिंग हा उत्तम पर्याय आहे.यामुळे मतदानासारखे महत्वाचे काम पूर्ण होईल आणि लोकांना घराबाहेर पडण्याची गरजच नसेल त्यामुळे संक्रमणाचा धोका उद्भवणार नाही.
उत्तराखंड येथील हायकोर्टाने निवडणूक आयोगाला ई वोटिंगच उत्तम पर्याय असल्याचा सल्ला दिला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्या लाटेनंतर बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती, त्यावेळी झालेल्या ऑनलाईन मतदान नुसार हे मतदान लवकर आणि विश्वसनीय परिणाम देऊ शकते, मतदान टक्केवारी वाढू शकते असे दिसून आले होते.
ईवोटिंग हे पोस्टल मतदानाचा म्हणजेच पोस्टाने पाठवून केलेल्या मतदानाचा विस्तारित भाग किंवा पुढचा टप्पा आहे असे म्हणता येईल. जे लोक भारतीय सेनेत किंवा दूतावासात काम करतात ते लोक या अधिकाराचा किंवा या पद्धतीचा अवलंब करू शकतात. तसेच जे लोक भारतीय अनिवासी आहेत यांना सुद्धा केवळ मतदानासाठी भारतात यावे लागू नये यासाठी या अधिकाराचा वापर करण्याची परवानगी दिली जाते.
त्याच प्रमाणे अपंग आणि वयस्कर लोकांनाही विधानसभा निवडणुकीत घरी बसून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे यामध्ये उत्तर प्रदेश सोबत इतर पाच राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोस्टाने केल्या जाणाऱ्या मतदानात आणि ई मतदानात फरक हा आहे की,पोस्टाने केल्या जाणाऱ्या मतदानात निवडणुकीच्या सात दिवस आधी मत देण्याची परवानगी असते, तर ई मतदानात त्याच दिवशी, त्याच वेळी मत देणे शक्य होते.
ऑनलाईन मतदान करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे जसं की ..
– ठराविक मोबाईल नंबर वरील इंटरनेट कनेक्शन असावे लागते कारण त्याद्वारे ही सोय पुरवली जाते.
– यासाठी मतदाराची ऑनलाईन नोंदणी केली जाते.
– नोंदणी करताना मतदाराचा फोटो वापरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
– ज्यांचे ऑनलाईन नोंदणी झाली आहे अशा लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जातात, ज्यामुळे मतदान केंद्रात जाऊन ते मतदान करू शकणार नाहीत.
ईमतदानाचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे पण आहेत.जसं की …
– मतदान करणाऱ्याची ओळख होणार नाही.
– मतदान करताना मतदाराला प्रभावित केले जात नाही ना,हे समजणार नाही.
– बोगस किंवा खोटे मतदान होण्याची शक्यता असते.
– ज्या संगणक वरून नोंदणी झाली आहे त्याच संगणक वरून मतदान व्हायला हवे म्हणजेच एका संगणक वरून एकच मतदार मतदान करू शकतो.
– जितके मतदार असतील तितक्या संगणकाची गरज लागेल,एखाद्या घरात सहा मतदार असतील तर सहा संगणकाची गरज लागते.
– ज्यांच्याकडे संगणक नाही अशा लोकांसाठी ई पोलिंग केंद्रची व्यवस्था करावी लागेल.
–
- व्होटर आयडी ऑनलाईन काढायचं असेल, तर हीच आहे सुवर्णसंधी! प्रक्रिया जाणून घ्या…
- मतदानपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज : गोवा आणि पंजाबमध्ये नक्की कोण बाजी मारणार?
–
आता या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानावर आधारित आहेत म्हटल्यावर काही तांत्रिक अडचणी तर येणारच. जसे ऑनलाईन शिकण्यात काही मजा नाही तसेच ऑनलाईन मतदान करण्यात पण नक्कीच नाही पण मतदान करणे महत्त्वाचे आहे आणि परिस्थितीनुसार बदलणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे आताच्या बदलत्या परिस्थितीनुसार सगळ्या अडचणींवर मात करत ऑनलाईन मतदान करूया आणि देशाच्या विकासाला हातभार लावूया.
मग करणार ना ऑनलाईन मतदान ??
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.