“तुम्ही मोदी भक्त आहात का?” या प्रश्नावर अभिनेते अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या आयुष्यात अनेक गुरु असतात, अगदी लहानपणापासून आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण, मोठेपणी चांगला मित्र, आपले शिक्षक पुढे नोकरीला लागल्यावर आपले सहकारी, सिनियर मंडळी अशी कायमच आपल्याला योग्य सल्ले मार्गदर्शन करत असतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अनेक मुलींना आपले वडील हे आपल्या आयुष्यातील हिरो आहेत असं वाटत असत, आपल्या वडिलांना ते फॉलो करत असतात. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कठीण प्रसंगी आपल्याला जर मदत केली असेल तर आपण त्याचे कायमच ऋणी असतो, मग ती व्यक्ती म्हणेल तसे आपण वागत असतो, कारण आपला त्यांच्यावर संपूर्ण विश्वास बसलेला असतो.
आज देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जनमानसात कायमच उलटी सुलटी चर्चा सुरु असते. मोदीभक्त हे अंध आहेत कोणत्याही गोष्टी वर विश्वास ठेवतात अशी टीका मोदी विरोधी लोक कायमच करत असतात. आज मोदींवर सामान्य माणसांपासून ते राजकीय नेते सर्वच स्तरावरून टीका होताना दिसून येते.
नोटबंदी, कोरोनाकाळात लसीवरून झालेला गोंधळ, वाढती महागाई, जीएसटी, बेरोजगारी अशा अनेक समस्यांवरून नरेंद्र मोदींना विरोधक धारेवर धरतात, असे जरी असले तरी त्यांच्या समर्थानात देखील अनेकजण आहेत. आज मोदींच भरभरून कौतुक करणारे देखील सोशल मीडियावर, राजकीय चर्चांमध्ये आढळून येतातच, कलाकार सुद्धा यात मागे कसे राहतील?
अनुपम खेर हे कायमच मोदींच्या समर्थानात अग्रेसर असतात. काश्मिरी पंडित असल्याचा जाज्वल्य अभिमान असलेले अनुपम खेर यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला आपली मुलाखत दिली. त्यात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मोदी भक्त,उजव्या विचारणसरणीचे आहात सरकारची भाषा बोलता, असे आरोप सोशल मीडियावर होत असतात, असे आरोप करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
–
- …तर इंडस्ट्रीतला सर्वात मोठा व्हिलन म्हणून अनुपम खेर नावारूपाला आले असते!
- फिल्म इंडस्ट्रीमधील ‘बाप’ लोकांनी दिले सुपरहिट सिनेमे, त्यांची ‘मुलं’ मात्र सुपरफ्लॉप!!
–
यावर लगेचच अनुपम यांनी उत्तर दिले की आमच्या काळात एक गाणे होते कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम हैं केहना, छोडो बेकार की बातो को….पुढे ते असे म्हणाले की मी शिवभक्त आहे. नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत ते म्हणाले त्यांची स्तुती करणे ही भक्ती असेल तर मला भक्त म्हणूनवून घेण्यास काहीच हरकत नाही.
‘सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर यांचाही मी मोठा चाहता आहे तुम्ही मला त्यांचा भक्त म्हणू शकता’. नसरुद्दिन शहा यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की ‘मी त्यांचा भक्त नाही फक्त त्यांच्या अभिनयाचा चाहता आहे. सुरवातीच्या काळात ते माझे प्रेरणास्थान होते’.
आज एकूणच देशात डावी उजवी विचारसरणी यावरून वाद होत नाहीत तर तुम्ही मोदी भक्त आहात की नाही यावरून नक्कीच वाद होतात.एकीकडे अनुपम खेर सारखे कलाकार मोदींच्या पाठीशी आहेत तर दुसरीकडे स्वरा भास्करसारखे कलाकार मोदींच्या विरोधात आहेत. येत्या २०२४ निवडणुका या सर्वार्थाने महत्वाच्या आहेत, अगदी मोदी भक्तांसाठी तसेच मोदी विरोधकांसाठी, कारण २०२४ निवडणूक मोदी लढवतील का? असं प्रश्न दोघांना पडला आहे….
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.