' श्रीकृष्णाच्या पवित्र जागेवर दावा करणारी ही मंडळी आहेत तरी कोण? – InMarathi

श्रीकृष्णाच्या पवित्र जागेवर दावा करणारी ही मंडळी आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राम जन्मभूमी आणि राम मंदिराचा विषय कायदेशीररित्या संपला असला, राम मंदिराचं बांधकाम सुरू झालेलं असलं, तरीही हा विषय अजूनही चर्चेत कायम आहे. एवढंच नाही, तर कृष्ण जन्मभूमी हा मुद्दा लवकरच राजकारणाचा ज्वलंत विषय ठरेल, असं म्हटलं तरी ते फारसं वावगं ठरणार नाही.

 

अशातच वक्फ बोर्डाने एक खळबळजनक दावा करत नव्या वादाला तोंड फोडलंय असं म्हणायला हवं. कृष्णाचा थेट संबंध मानला जाणाऱ्या द्वारका भूमीतील २ बेटांवर त्यांनी चक्क स्वतःचा दावा पेश केलाय.

 

ram mandir inmarathi

 

थेट कोर्टात सुनावणी…

गुजरातमध्ये असलेल्या द्वारका नगरीमधील या दोन बेटांवर दावा सांगताना, वक्फ बोर्डाने थेट कोर्टचा आधार घेतलेला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने केलेला हा विचित्र दावा असलेलं प्रकरण न्यायालयात दाखल होताच खुद्द न्यायधीश सुद्धाआश्चर्यचकित झाले.

न्यायालयाने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माणक करत तो फेटाळून लावला आहे. श्रीकृष्णाची भूमी असलेल्या द्वारकेतील बेटावर कुणी कसा दावा पेश करू शकतं असा प्रतिप्रश्नही कोर्टाने वक्फ बोर्डाला केला आहे.

 

court inmarathi 1

 

याचिकेवरील सुनावणीत कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

हा दावा मान्य करण्याचं कुठलंही कारण कोर्टाला मिळालं नाही. न्यायाधीश संगीत विशेन यांनी या याचिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करत याचिका फेटाळून लावली. “भगवान श्रीकृष्णाच्या भूमीवर तुम्ही कसा दावा पेश करू शकता?” असा प्रश्न विषेण यांनी वक्फ बोर्डाला विचारला.

द्वारकेतील एकूण ८ बेटांपैकी दोन बेटांवर श्रीकृष्णाची मंदिरं आहेत. मात्र या दोन्ही बेटांवर असणारी लोकवस्तीची आकडेवारी विचारात घेऊन वक्फ बोर्डाने हा निर्णय घेतला. जवळपास ७००० कुटुंबं या दोन बेटांवर राहतात.

 

law-court-inmarathi

यापैकी ६००० कुटुंबं मुस्लिमधर्मीय असल्यामुळे, ती भूमी मुस्लिमांची असल्याचा दावा सुन्नी वक्फ बोर्डाकडून करण्यात आला होता. मात्र प्राचीन कथांचा आधार घेत, कोर्टाने ही याचिका अभ्यासपूर्ण नसल्याचं म्हटलं आहे. कृष्णाची भक्ती करत असतानाच मीरा इथल्या कृष्णमूर्तींमध्ये एकरूप झाली असल्याचं अनेक पौराणिक कथानमःये वाचायला मिळतं.

ही याचिका फेटाळून लावताना, ‘पुन्हा याचिकादाखल करायची असल्यास ती योग्य अभ्यास आणि संशोधन करून दाखल केली जावी’ असंही कोर्टाने वक्फ बोर्डाला सांगितलं आहे.

महाभारतानंतर…

द्वारकानगरीचा उल्लेख ९००० वर्षांपूर्वीच्या कालखंडापासून आढळतो. याला कार्बन डेटिंगसारख्या शास्त्रीय पद्धतीसुद्धा दुजोरा देतात. मात्र ४००० हजार वर्षांपूर्वी ही द्वारकानगरी लुप्त झाली होती असंही म्हटलं जातं. महाभारत काळानंतर श्रीकृष्णाची ही भूमी समुद्रात सामावून गेली होती. द्वापार युगात श्रीकृष्णाने याठिकाणी मोठं रम्य शहर वसवलं होतं असं मानलं जातं.

 

dwarka arjun with family InMarathi

 

गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर मोठ्या दिमाखात ही नगरी उभी होती. मात्र हिमयुगात समुद्राच्या पाण्याची पातळी तब्बल ४०० फुटांनी वाढली आणि ही नगरी समुद्रात एकरूप झाली असल्याची शक्यता आहे.

महाभारत युद्ध संपल्यानंतर जवळपास ३६ वर्षांच्या कालखंडानंतर हे सगळं घडलं असल्याचं सांगितलं जातं. द्वारका जलसमाधीत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सुद्धा वैकुंठाला निघून गेले. ज्या भागात द्वारका नगरीचं अस्तित्व होतं, त्याच भागात समुद्रात आज द्वारका नगरीमधील बेटं मोठ्या दिमाखात उभी आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?