' बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या ‘पुष्पा’मध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही खारीचा वाटा आहे! – InMarathi

बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या ‘पुष्पा’मध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही खारीचा वाटा आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘औरत पर हाथ डालनेवाली की उंगलीया नही काटते, काटते हैं उसका गला’,  असा डायलॉग मारत बाहुबली आपल्या पत्नीची ज्याने छेड काढली त्याचे थेट मुंडके उडवतो. सिनेमागृहात हा सीन बघताना अंगावर काटा तर येतोच मात्र आपोआप तोंडात शिट्टी येतेच..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमा जरी दृश्य माध्यम असले तरी सिनेमातील डायलॉग हे खरं तर सिनेमात मज्जा आणतात. हिरो व्हिलनमधले संवाद असो किंवा हिरो हिरॉइनमधील संवाद असो, ते तितकेच लक्षवेधी आणि खुमासदार असायला हवेत.

 

bahubali-marathipizza04
jfwonline.com

 

जितके सशक्त संवाद असतात तितक्याच ताकदीने ते बोलावे देखील लागतात. संवादातील चढ उतार, शब्दांवरच जोर या सगळ्या गोष्टी अभिनेत्याला, अभिनेत्रीला याव्या लागतात.

बाहुबलीमधला प्रभास जितका शारीरिक दृष्ट्या भावतो तितकाच त्यांच्या आवाजातून देखील भावतो, प्रभासच्या बाहुंमध्ये जितके वजन तितकाच त्याला दिलेल्या आवाजात सुद्धा वजन होते. हिंदीमधल्या बाहुबलीमध्ये मराठमोळ्या शरद केळकरने प्रभासला आवाज दिला होता. त्यामुळे बाहुबलीच्या यशामध्ये त्याचाही मोठा वाटा आहे.

 

sharad ke inmarathi

 

बाहुबलीनंतर आता पुन्हा एका साऊथच्या सिनेमामध्ये एका मराठमोळ्या कलाकाराने आवाज दिला आहे, तो नेमका कोण चला तर मग जाणून घेऊयात…

अल्लू अर्जुन साऊथचा सलमान खान म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आलेला आर्या सिनेमाने तो चांगलाच लोकप्रिय झाला. आ आंटे अमलापूरम हे गाणं आठवत असेलच त्यातही तो होता, तर अशा या साऊथच्या सल्लूचा पुष्पा नावाचा सिनेमा रिलीज झाला आहे.

लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे, तर सांगायचा मुद्दा असा की हा सिनेमा तेलगूत बनवला आहे त्याच प्रमाणे हिंदीत सुद्धा डब केला आहे. आणि या हिंदी डबमध्ये अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे तो श्रेयस तळपदे या मराठमोळ्या कलाकाराने….

 

pushpa inmarathi

 

श्रेयसने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून या बद्दलची माहिती सांगितली आहे. त्यात तो असं म्हणाला आहे की मला आनंद होतोय की भारतातील सर्वात स्टईलीश आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा ( हिंदी ) सिनेमासाठी मी आवाज दिला आहे. याआधी सुद्धा हॉलिवूडच्या लायन किंग सिनेमासाठी त्याने आवाज दिला होता. मात्र तेलगू सिनेमासाठी त्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

shreyas talpade inmarathi

आज बॉलीवूडची अनेक मंडळी हॉलिवूडच्या सिनेमांना आपला आवाज देत असतात. प्रत्येक अभिनेता आपल्या विशिष्ठ अशा शैलीत आवाज देत असल्याने सिनेमाला देखील चार चांद लागतात. सध्या श्रेयस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसत आहे, झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधून तो आपल्याला दिसतो.

साऊथच्या इतक्या मोठ्या स्टार्सना आपल्या मराठमोळ्या कलाकारांचे आवाज देत असल्याने साहजिकच ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच अभिनमानास्पद आहे. आज चेतन शशितल सारखे दिग्गज व्हॉइस आर्टिस्ट अगदी पशु पक्षांपासून ते मोठमोठाल्या कलाकारांचे आवाज अगदी सहज काढू शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?