RRR मध्ये दिसणाऱ्या, धनुष्य बाण घेऊन ब्रिटिश सैन्याला भिडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अल्लूरी सीताराम राजू आणि कोमराम भीम या दोन स्वातंत्र्यवीरांची नावं आपण कदाचित आपण ऐकले नसतील. पण, येत्या वर्षात ही व्यक्तिमत्व सर्वांना माहिती होतील हे नक्की.
कारण, ‘बाहुबली’ नंतर आपल्या सर्वांचे आवडते दिगदर्शक राजमौली सर हे आता ‘आरआरआर’ या आपल्या आगामी सिनेमातून यांचा स्वातंत्र्य संघर्ष आपल्या मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.
बाहुबली पासून सिनेमाची परिभाषा बदलून टाकणाऱ्या राजामौली सरांनी या स्वातंत्र्य सैनिकांना लोकांसमोर ‘हिरो’ म्हणून आणायचं ठरवलं आहे. बाहुबलीचे दिगदर्शक जेव्हा एखाद्या कथेवर काम करतात तेव्हा ती कथा विशेष असते हे आपल्याला मान्य आहेच.
अल्लूरी सीताराम राजू आणि कोमराम भीम यांनी इंग्रजांची कशी पळताभुई थोडी केली होती ? जाणून घेऊयात. २०२० मध्ये शुटिंग सुरू झालेल्या ‘आरआरआर’ मधील पात्रांवर राजमौली यांचं कित्येक वर्षांपासून संशोधन सुरू होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे दक्षिणेतील सुपरस्टार या सिनेमात आपल्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमामध्ये अजय देवगण आणि आलिया भट हे बॉलीवूड कलाकार सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
राम चरण यांनी साकारलेल्या अल्लूरी सीताराम राजू यांचा १८९७ मध्ये विशाखापट्टणम येथे झाला होता. त्यांचे वडील वेंकट रामाराजू यांनी लहानपणीच सीताराम राजू यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार केले होते.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता. स्वातंत्र्य संग्रामात अल्लूरी यांनी मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश, बद्रीनाथ, आसाम, बंगाल, नेपाळ सारख्या ठिकाणी प्रवास करून त्यांनी घोडेस्वारी, धनुर्विद्या, योगा आणि ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला.
काली मातेचे उपासक असलेल्या अल्लूरी सीताराम राजू यांना स्वातंत्र्याचं महत्व लहानपणीच पटलं होतं आणि जिथे प्रवास करतील तिथे ते लोकांना इंग्रजांच्या कारवायांबद्दल जागरूक करायचे.
–
- राजमौलीच्या RRR मधल्या या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून डोळे पांढरे पडतील!
- विदेशी भूमीवर ‘पहिल्यांदाच भारतीय झेंडा फडकावणाऱ्या’ भिकाजी कामा यांच्याविषयी…
–
अल्लूरी सीताराम राजू यांच्यावर सुरुवातीच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. १९२० च्या दशकात त्यांनी आदिवासी लोकांना शिक्षण देणे, आदिवासी भागात दारूमुक्ती करणे, गावातील तंटे पंचायतीमध्ये सोडवणे या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. पण, एक वेळ आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, सशस्त्र इंग्रजांना देशातून हाकलून लावायचं असेल तर आपल्याला ‘धनुष्यबाण’ हातात उचलावाच लागेल.
अल्लूरी सीताराम राजू आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध धनुष्यबाणाने लढण्याचं ठरवलं आणि ‘वनवासी’ सैन्याची त्यांनी मोर्चेबांधणी केली.
मलबार येथील रॅम्पा या भागातून त्यांनी ‘रॅम्पा मुव्हमेंट’ नावाने आपली स्वातंत्र्य मोहीम सुरू केली. २२ ऑगस्ट १९२२ रोजी अल्लूरी यांनी ३०० सशस्त्र सैनिकांसह चिंतापल्ली या पोलीस स्थानकावर हल्ला केला आणि तेथील हत्यारं, दारूगोळा यांची लूट केली.
जंगलात राहणारं सैन्य असल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य व्हायचं नाही.
‘रॅम्पा मुव्हमेंट’चं पुढचं पाऊल हे कृष्णादेवीपेट येथील पोलीस स्थानकावर हल्ला करणं होतं. त्यानंतर, ‘छोदावरन’, ‘रमावरन’ या पोलीस स्थानकांवर हल्ला करून दक्षिण भारतात इंग्रजांचं खच्चीकरण केलं.
सरकारने अल्लूरी सीताराम राजू यांची इतकी धास्ती घेतली होती की, ‘रॅम्पा मुव्हमेंट’ संपवण्यासाठी इंग्रजांनी ‘आसाम रायफल्स’ला पाचारण केलं होतं.
उपेंद्र पटनायक हे त्या काळात ‘आसाम रायफल्स’चं नेतृत्व करायचे. अल्लूरी सीताराम राजू यांना पकडून देण्याचा उपेंद्र यांनी विडा उचलला होता. ७ मे १९२४ रोजी अल्लूरी हे जंगलातून फिरत असताना एका पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेस पडले.
लांब दाढीमुळे पोलीस आधी अल्लूरी यांना ओळखू शकले नाहीत. पण, एकटीच व्यक्ती बघून त्यांनी पाठलाग केला आणि अखेरीस ‘गोरटी’ नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने अल्लूरी सीताराम राजू यांना पकडलं आणि त्यांना झाडाला बांधलं.
सैनिकांनी ओळख विचारली असता त्यांनी, “होय, मीच अल्लूरी सीताराम राजू आहे” अशी त्यांनी स्वतःची ओळख सांगितली. इंग्रज सैन्याने त्यानंतर त्या एकट्या व्यक्तीवर अमानुष हल्ला करून त्यांचा जीव घेतला.
‘आरआरआर’ मधील दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिक कोमराम भीम यांचा जन्म १९०० मध्ये आदीलाबाद येथे झाला होता. हैद्राबाद मुक्ती संग्रामासाठी त्यांनी जंगलात राहून ‘असफ जाही’ यांच्याविरोधात बंड पुकारलं आणि त्यांनी या प्रवासात आपल्या जीवनाचं बलिदान दिलं.
हॉलीवूडमधील सुपरहिरो बघून धन्यता मानणाऱ्या आजच्या पिढीला अल्लूरी सीताराम राजू यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्याचा ‘नायक’ बघूनसुद्धा तितकाच आनंद होईल अशी आशा करूयात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.