' फक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या! – InMarathi

फक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२०-२१ मध्ये कोरोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन होते. यादरम्यान कॉलेज, शाळा, मार्केट, चित्रपटगृह, सरकारी आणि खासगी ऑफिस सगळंकाही बंद झालं. अशावेळी काम सुरु ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागली.

तसे तर ही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.

 

work from home inmarathi

 

आता २०२१ हे वर्ष संपणार असून नवीन वर्ष २०२२ सुरु होणार आहे, तरीदेखील कोरोना विषाणु संबंधी काही स्पष्टता नाही.

काही दिवसांपूर्वी असे वाटत होते की कोरोना विषाणुचा प्रभाव संपला आहे, परंतु अशातच ओमरिकॉन (Omricon) या कोरोना विषाणुच्या नवीन वैरिएंट ने पुन्हा एकदा जगामध्ये थैमान घालायला सुरुवात केली आहे.

 

omicrone virus inmarathi

 

सध्यातरी भारतामध्ये स्थिती सामान्य असून अर्थव्यवस्था देखील पुन्हा रुळावर येत आहे.

त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चर संपवले असून कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयामध्ये बोलवायला सुरुवात केली आहे. परंतु जगामध्ये आता अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ‘वर्क फ्रॉम होम’ याच संकल्पनेवर भविष्यात काम करणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्या कंपनी पुढीलप्रमाणे :-

● Slack :

 

slack IM

 

ही एक एप्लीकेशन सर्विस देणारी कंपनी आहे, ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना आपली सर्विस देत असते ज्यामध्ये ते रियल टाइम मेसेजिंग, फाइल्स स्टोर करण्यासारख्या सर्विस देतात.

२०२० मध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेव्हा या कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरु केले होते आणि आता त्यांनी हे कायमस्वरूपी करून टाकले आहे. तसेच या कंपनीमध्ये नवीन भरती देखील याच बेसिस वर केली जात आहे.

● Twitter :

 

twitter IM

 

ट्वीटरने देखील वर्क फ्रॉम होम कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्या कर्मचाऱ्यांची ऑफीसमध्ये गरज असते, त्यांना ऑफिस मध्ये येऊनच काम करावे लागेल.

मागे एका मुलाखतीमध्ये ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी सांगितले होते की, कोरोना विषाणु येण्याच्या आधीपासुन आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेवर काम करत आहोत.

● Spotify :

 

spotify IM

 

स्पॉटीफाय ही एक स्वीडीश कंपनी असून, ही कंपनी संगीत, कॉमिक्स आणि स्ट्रीमिंग सारख्या सेवा प्रदान करते. स्पॉटीफाय वर आपण गाणे डाऊनलोड न करता देखील ऐकू शकतो.

कंपनीने आपल्या परिपत्रकात जाहिर केले आहे की, कंपनी मधील कर्मचारी आता जगामध्ये कुठून ही काम करु शकतात. त्याचप्रमाणे ज्या देशांमध्ये स्पॉटीफायचे एकही ऑफिस नाहीये तिथून देखील ते काम करु शकतात.

● Meta :

 

facebook meta IM

 

काही दिवसांपूर्वी फेसबुकने आपले नाव ‘Meta’ असे केले आहे. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली होती. परंतु आता ३१ जानेवारी पासून त्यांची कार्यालय पुन्हा सुरु होणार आहेत.

तरी ज्या लोकांचे काम ऑफिसमध्ये न येता, घरी बसून पूर्ण होऊ शकतात. अशा लोकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात येईल.

● Amazon :

 

amazon IM

 

एकूण ९२००० कर्मचाऱ्यांसोबत Amazon ही जगामधील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी ई-पुस्तके, फर्निचर, घरगुती वस्तू, पोशाख, इलेक्ट्रॉनिक्स, संगीत, चित्रपट आणि बरेच काही ऑफर करते.

लॉकडाऊन दरम्यान कंपनीने कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली होती आणि आता कंपनीने असे नवीन नियम बनवले आहे की, ज्यामुळे कर्मचारी आता कायमचे वर्क फ्रॉम होम करु शकततील.

याचप्रमाणे एडोब(Adobe), ऍपल(Apple), कॉइनबेस(Coinbase), ड्रॉपबॉक्स(Dropbox), लिंकलन (Lincoln), मायक्रोसॉफ्ट(Microsoft), झूम (Zoom) या प्रमुख कंपन्यादेखील वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देतांना दिसत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?