' ओला ड्रायव्हर्सच्या राईड कॅन्सल करण्यावर CEO भाविश अग्रवालने केली मोठी घोषणा! – InMarathi

ओला ड्रायव्हर्सच्या राईड कॅन्सल करण्यावर CEO भाविश अग्रवालने केली मोठी घोषणा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलाही प्रवास म्हटला की शक्यतो तो प्रवास कसा व्यवस्थित होईल, पोहोचायच्या ठिकाणी आपण कसे लवकरात लवकर पोहोचू शकू असं आपण बघतो. आजकाल आपली ही अपेक्षा काही वर्षांपूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. ते सहाजिकही आहे. कारण, तंत्रज्ञानाने आपल्याला तितकी साथ दिली आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वतःकडचं वाहन सोडल्यास सर्वसामान्य माणसाला प्रवास करायचा असेल तर त्याच्यासमोर रेल्वे, एक्स्प्रेस ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. प्रत्येक वेळेला हे पर्याय सोयीचे होते असंही नाही.

 

public transport inmarathi

 

अपेक्षित ठिकाणी पोहोचायचं असेल तर एक ठराविक वेळ लागायचाच. वाहनं येईपर्यंत वाट बघावी लागायची. ट्रेनचं बुकिंग शक्य असलं तरी बाकी सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत तशी स्थिती नव्हती. आपली तब्येत ठीक नसेल, घरात वयस्कर मंडळी असतील तरी ट्रेन, एक्प्रेस ट्रेन किंवा बसने प्रवास करण्याखेरीज पर्याय नव्हता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

अलीकडच्या काही वर्षांपूर्वी ओला, उबरची सोय उपलब्ध झाली आणि आपला प्रवास आधीपेक्षा अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पुढे पडलं. पण मग हळूहळू त्यातल्याही समस्या लक्षात येऊ लागल्या.

 

ola uber IM

 

आपली ‘ओला राईड’ ड्रायव्हरने स्वीकारल्यानंतर आयत्या वेळी अचानक ड्रायव्हर आपली आधी स्वीकारलेली राईड रद्द करू लागले. अशाने आयत्या वेळी लोकांची गैरसोय होऊ लागली.

यापूर्वी जेव्हा आपली ‘ओला राईड’ आपण बुक करायचो तेव्हा नेमकं आपल्याला कुठे जायचंय आणि आपण कॅश, कार्ड, युपीआय यापैकी नेमक्या कुठल्या प्रकारे पेमेन्ट करतोय हे चालकाला आधीपासून माहीत नसायचं. ते त्याला ‘राईड’ स्वीकारल्यानंतर कळायचं.

चालक जर आपल्याला आपल्या इच्छित स्थळी घेऊन जायला राजी नसेल आणि जर आपण ज्या पद्धतीने पेमेंट केलंय ती पद्धत त्याला मान्य नसेल तर तो बऱ्याचदा आपली आधी स्वीकारलेली राईड आयत्या वेळी रद्द करायचा.

 

ola ride IM

 

राईड सुरू करेपर्यंत आपल्याला ग्राहकाला नेमकं कुठे सोडायचंय आणि त्याचा पेमेंट मोड काय आहे हे चालकाला माहीत नसायचं त्यामुळे ही समस्या उद्भवायची. पण यापुढे असं होणार नाही.

“माझा चालक माझी ओला राईड रद्द का करतो?” या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय प्रश्नाचं उत्तर ओलाचे सीइओ ‘भाविष अग्रवाल’ यांनी २१ डिसेंबरला आपल्याला ट्विटमधून दिलं.

त्यांनी असं म्हटलंय की, “ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही त्या दृष्टीने पावलं उचलतो आहोत. ओला राईड स्वीकारण्यापूर्वी आता ओला चालकाला ग्राहकाला ज्या स्थळी पोहोचायचंय त्याच्या आसपासचं ठिकाण आणि ग्राहकाचा पेमेंट मोड कळू शकेल. अशा प्रकारे अचानक राईड रद्द होणं कमी करायचं असेल तर चालकाला अधिक सक्षम करणे महत्त्वाचे आहे.”

ola CEO IM

 

भाविश अग्रवाल यांनी असं सांगितलं आहे की ओला चालकांच्या ऍपमध्ये आता दोन नवीन फीचर्स ऍड करण्यात आलेले आहेत ज्याद्वारे ओला चालकाला ग्राहकाला कुठे जायचंय त्याच्या आसपासचं ठिकाण आणि ग्राहक कॅश, कार्ड, युपीआय यापैकी कुठल्या मोड ने पेमेंट करतोय तो पेमेंट मोड कळू शकेल.

हे फीचर्स ऍड करण्यामुळे राईड रद्द होण्याची समस्या बऱ्यापैकी कमी होईल अशी भाविश अग्रवाल यांना आशा आहे.

‘ओला इलेक्ट्रिक्स’ने १५ डिसेंबरला त्यांच्या फार प्रतीक्षेत असलेल्या ‘एस १ अँड एस १ प्रो’ या इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरीसुद्धा भारतात सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी पहिल्या दिवशी बंगलोर आणि चेन्नईतल्या १०० ग्राहकांना या स्कूटर्सची डिलिव्हरी दिली.

या सगळ्यामुळे कदाचित आपलं ओलाचं बुकिंग पूर्वी जितक्या झटपट होतं तितकं होणार नाही. पण किमान आपलं बुकिंग आयत्या वेळी रद्द तर होणार नाही ना याची टांगती तलवार आपल्यावर नसेल.

 

ola ride IM 2

 

त्यामुळे जे बुकिंग होईल त्याबाबत आपण निश्चिंत असू. आपला ओलाचा अनुभव आधीपेक्षा अधिक चांगला ठरायला त्याने मदतच होईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?