आयटीची नोकरी झुगारून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे शब्द सार्थकी लावणारी मराठमोळी अन्नपुर्णा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कधी ऐकलं आहे का? ती साक्षात अन्नपूर्णा आहे हो…असं एखादी बद्दल म्हटलेलं. किंवा लग्नात मुलीसोबत अन्नपूर्णा द्यायची पद्धत काही लोकांत असते. याचं कारण मुलीनं घरादाराला पोटभर खायला घालावं. कुणीही विन्मुख उपाशी जाऊ नये. एखादीच्या हाताला खूप चव आहे असं म्हणतात.
अगदी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती चविष्ट लागेल अशी चव असलेलं जेवण बनवणाऱ्या बायका होत्या. आपली आई, आजी, पणजी कमीतकमी तेल मसाले वापरुन देखील त्यांचं जेवण चवदार व्हायचं. ज्या भागात आपण राहतो त्या भागातील ऋतुमानानुसार आहार असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
त्या ऋतुमानानुसारच तिथं वापरले जाणारे मसाले असतात. आता सांगा, पंजाब मधील लोकांना आपली पुरणपोळी आपल्यासारखी जमेल का?
कदाचित प्रयत्नांनी जमेलही पण जी आपली चव आहे ती त्यात असेल असं नाही! किंवा आपण पंजाबी मसाले वापरुन त्यांची एखादी डिश बनवली तरी तीच डिश अस्सल पंजाबी लोक खाताना आमच्यासारखी नाही जमली असं म्हणतील.
म्हणजेच परराज्यात गेलं की मग आपल्याकडच्या जेवणाची चव खऱ्या अर्थाने समजते. मग तिथं तुमच्याकडं कदाचित चांगला पैसा असेल पण आईच्या हातचं आपल्या चवीचं जेवण नसेल.
मग तेंव्हा लक्षात येतं लहानपणी शाळेत अन्न हे पूर्णब्रह्म का म्हटलं होतं!
सहसा मराठी माणूस व्यवसाय करत नाही असं म्हणतात. समजा जरी केला तरी तो आमची शाखा कुठेही नाही म्हणून मोनोपाॅली करायला बघतो असाही आरोप केला जातो.
म्हणजे आपला भाग सोडायला मराठी माणूस तयार नसतो असं सर्रास म्हटलं जातं. पण काही मराठी नावं अशी आहेत की त्यांनी मराठीपण जपत आपला व्यवसाय उभा केला.
हे काम एका महाराष्ट्रातील महिलेनं केलं आहे, कोण आहे ही महाराष्ट्रातील महिला? जिनं आपला व्यवसाय सुरु केला आणि देशात व परदेशातही त्याची शाखा उघडली.
त्या महिलेचं नांव आहे जयंती कठाळे!!!!
आजची ही प्रेरणादायी कथा आहे जयंती कंठाळे या उद्योगिनीची जिनं आपली आवड हाच आपला व्यवसाय केला आणि या व्यवसायाच्या अनेक शाखा उघडल्या.
जयंतीनी एकदा विमानप्रवासात पाहीलं, महाराष्ट्राची आवडती डिश वडापाव सोडून बाकी सगळे पदार्थ विमानात दिले गेले. मग आपण का मागं?
त्यांनी मनात ठरवलं एक दिवस या विमानात आपला वडापाव असेल..आणि तो मी देईन. मग त्याच स्वप्नासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भक्कम पगाराची नोकरी जयंतीनी सोडून दिली.
कारण एकतर नोकरी किंवा एकतर व्यवसाय..दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य होत नाहीत. आणि सुरु केला आपला व्यवसाय.
जयंती बेंगळुरू येथे असतात. तिथं त्यांनी प्रथम आपले गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक ऑर्डरनुसार करुन द्यायला सुरुवात केले. त्याला जसा प्रतिसाद मिळाला तो पाहून त्यांचा हुरुप वाढला.
हेच आपलं खास महाराष्ट्रीयन जेवण आपण का बरं करु नये? असा विचार करुन त्यांनी पूर्णब्रह्म या हाॅटेलची सुरुवात करायचं ठरवलं.
सगळे पारंपरिक आणि कमी मसालेदार महाराष्ट्रीयन पदार्थ तिथं सुरु केले. मिसळपाव, डाळीचे वडे, साबुदाणा वडा हे आणि गोडामध्ये पुरणपोळी, श्रीखंड पुरी या पदार्थांची विस्तृत श्रेणीच सुरु केली.
आणि याचंच नाव पूर्णब्रह्म!
बघता बघता पूर्णब्रह्म चांगलंच प्रसिद्ध झालं कारण तेथील पदार्थांचा दर्जा, सर्व्हीस आणि अस्सल महाराष्ट्रीयन चव.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कोणताही प्रवास बघताना जितका सोपा दिसतो तितका तो सोपा नसतो. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अडचणी त्यांनाही आल्या पण त्यावर मात करत जयंतीनी पूर्णब्रह्म सुरु केलं.
तिथं असलेला स्टाफ, पदार्थांची चव, दर्जा हे सगळं इतकं प्रसिद्ध झालं की त्यांनी बेंगळुरू येथे सुरु केलेलं पूर्णब्रह्म हळूहळू मुंबई, पुणे, अमरावती आणि परदेशातही पोहोचली आहे.
जयंती स्वतः स्टाफच्या बरोबरीने काम करतात. अगदी महाराष्ट्रीयन फील यावा अशीच हाॅटेलची मांडणी आहे. त्या स्वतः नऊवारी साडी नेसून जातात.
पूर्णब्रह्म मध्ये आलेल्या ग्राहकांना महाराष्ट्रीयन पद्धतीनं भारतीय बैठक, चौरंगावर सुशोभित केलेलं भरगच्च जेवणाचं ताट, चटणी कोशिंबीर भाजी पुरणपोळी वरणभात आमटी, हा सारा जामानिमा बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे.
जयंती एक गोष्ट कटाक्षाने पाळतात, अन्नाची नासाडी होऊ देत नाहीत. त्यासाठी जो ग्राहक सगळं पान स्वच्छ करेल त्याला बिलामध्ये ५% सवलत दिली जाते.
ही सवलत फक्त त्यांनाच जो जेवण वाया जाऊ देत नाही! मग यामध्ये लहान मुलेही मागे रहात नाहीत. पानात अन्न न टाकणाऱ्या मुलांना छानसा स्टार आणि त्यांच्या पालकांना बिलात सवलत मिळाल्याने पालक आणि मुलांवर नकळत हा महत्वाचा संस्कार केला जात आहे.
हातात घेतलेलं काम जेंव्हा यशस्वी होतं तेंव्हा लोकांना तुमची महती कळते. पूर्णब्रह्म ची ख्याती कर्नाटक, महाराष्ट्र करता करता साता समुद्रापार अमेरिका, लंडन येथे जाऊन पोहोचली.
याच ऑस्ट्रेलियाच्या फ्लाईटमध्ये असताना वडा पाव न मिळाल्याने जयंती कंठाळेनी महाराष्ट्राची पारंपारिक चव जगभर पोहचवण्याचा विचार केला होता.
विचार तर खूपजण करतात पण तो अंमलात सगळेच आणतात असं नाही.
पण जयंतींनी तो नुसता विचार केला नी बुडबुड्यासारखा सोडून नाही दिला. त्याचा पाठपुरावा केला. अनंत अडचणी उभ्या राहिल्या समोर. पण त्यांना भक्कम पाठिंबा दिला तो त्यांच्या पतीनं आणि कुटूंबानं. महत्वाचं म्हणजे त्यांचे सहकारी संदिप गढवाल आणि पुर्णब्रह्मचा संपुर्ण परिवार यांच्या पाठबळाशिवाय हा डोलारा सांभाळणे शक्य नसल्याचे त्या आवर्जून सांगतात.
एका मुलाखतीत जयंती कंठाळेनी सांगितलं होतं, पहाटे चार वाजता त्यांचा दिवस सुरू होतो.
हाॅटेलमध्ये जाऊन पूर्ण दिवसाचं शेड्यूल त्यानुसार पदार्थ करणं एखादा स्टाफ रजेवर असेल तर त्याचंही काम करावं लागतं पण त्यात कमीपणा कसला?
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि ते करताना लाजूही नये.
पण हे सगळं सांभाळताना घरची आघाडी सांभाळतात पती, आणि बाकीचे.. कष्ट करून यश मिळवता येतं पण ते टिकवता आलं पाहिजे. आणि हे करत असताना घरचे लोक आपला कणा असतात.
त्यामुळं उत्तुंग भरारी घेता येते.
खरोखर जयंती कंठाळेंची ही कहाणी त्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे जिनं मोठं काही करायचं स्वप्न पाहीलं आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.