जाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजच्या युगात युट्यूब कोणाला माहित नाही असं होणार नाही. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती युट्युबवर व्हिडियो बघण्याला देते हे एका सर्वेमधून सिद्ध देखील झाले आहे. मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून या काळात युट्युब समोर येत आहे.
अश्या या युट्युबबद्दल आजही लोकांना महत्त्वाची गोष्ट माहिती नाही ती म्हणजे युट्युब सुरु झालं कसं? कस झाला या क्रांतिकारी मनोरंजनाच्या साधनाचा जन्म?? चला तर जाणून घेऊया युट्युबची कधीही न ऐकलेली गोष्ट!
जगात सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाईट म्हणजे युट्यूब! युट्यूबची सुरुवात २००५ मध्ये झाली होती. पॅपेलचे ३ कर्मचारी चॅड हर्ले, स्टीव्ह चॅन आणि जावेद करीम यांनी ही साईट बनविली होती ही साईट सुरु करण्यामागे दोन घटना कारणीभूत ठरल्या.
तिघेही मित्र एकदा डिनर करत होते. त्यावेळी त्यांना एक दिवस आधी शूट केलेला व्हिडिओ शेअर करताना अडचण आली. त्यावेळी इमेल तंत्रज्ञानात आजच्यापेक्षा अनेक त्रुटी होत्या. इमेल पाठविण्यासाठी मोठी फाईल अटॅच करणे शक्य नव्हते.
दुसरे एक कारण जे सर्वात महत्त्वाचे आहे, ते होते जेनेट जॅक्सनचे वॉर्डरोब मालफंक्शन. मायकल जॅक्सनची बहीण जेनेट जॅक्सनचे एका कार्यक्रमात वॉर्डरोब मालफंक्शन झाले. तिघांना या घटनेचा व्हिडिओ बघायचा होता.
जंग जंग पछाडूनही त्यांना व्हिडिओ काही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ शेअर करण्यामध्ये येणा-या सर्व अडचणी दूर करुन यूट्यूब वेबसाईटची निर्मिती केली.
युट्यूबला बनविण्यात पॅपेल कंपनीचा मोठा वाटा आहे. तिघेही मित्र तिथेच काम करत हाते. चॅड हर्लेचा पॅपेलचा लोगो बनविण्यात सहभाग होता. बोनसच्या स्वरूपात मिळणा-या पैशातून तिघांनी युट्यूब उभे केले होते. सर्वप्रथम त्यांनी युट्यूबला एक व्हिडिओ डेटींग वेबसाईट म्हणून सुरु केले होते. त्यावेळी साईटचे नाव ‘टयून इन हूक अप’ असे ठेवले होते.
युट्यूब हे नाव २००५ मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता. एकसारखे वाटत असल्यामुळे युनिव्हर्सल ट्यूब आणि रोलफॉर्म इक्विपमेटच्या वेबसाईटला याचा फायदा झाला होता.
लोक youtube.com ऐवजी utube.com वर जात होते. परंतु, साईट ओव्हरलोड झाल्यामुळे क्रॅश झाली. त्यामुळे २००६ मध्ये त्या कंपनीने युट्यूबविरुद्ध खटला दाखल केला होता. परंतु, युट्यूबविरुद्ध ते खटला हरले आणि त्यांनाच युआरएल बदलावी लागली.
नोव्हेंबर २००५ मध्ये त्यांनी जगात क्रांती घडवून आणणारी ही साईट लॉंच केली. परंतु, दिड वर्षांमध्ये गुगलने युट्यूबची ताकत ओळखली आणि गुगलने १.६५ अब्ज डॉलर्स मोजून ही साईट विकत घेतली.
जगभरात प्रत्येक मिनिटाला १०० तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडिओ युट्यूबवर टाकण्यात येतात. दरमहा १ अब्जपेक्षा जास्त लोक या साईटला भेट देतात. म्हणजेज इंटरनेट वापरणा-या प्रत्येक दोन जणांपैकी एक जण या साईटला भेट देतो.
दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायचा ‘गंगनम स्टाईल’ हा युट्यूबवर सर्वाधिक पाहण्यात आलेला म्युझिक व्हिडिओ आहे. भारतीय गाण्यांचा विचार केल्यास सीरीयल किसर इम्रान हाशमी आणि तनुश्री दत्ता यांचे ‘आशिक बनाया आपने’ हे हॉट गाणे सर्वाधिक वेळा पाहण्यात आले आहे.
यापूर्वी जस्टीन बीबरचे ‘बेबी फीट’ हे गाणे सर्वाधिक वेळा पाहण्यात आले होते. जगभरात एकूण २० टक्के लोक मोबाईलवरुन युट्यूबचा वार करतात. तर उर्वरित ८० टक्के लोक कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपचा वापर करतात.
आज युट्यूबवर २२ टक्के ट्रॅफिक अमेरिकेतून येते. तर ७८ टक्के युझर्स इतर देशांमधील आहेत. युट्यूबवर प्रचंड व्हिडिओ आहेत. ते सर्व पाहण्यासाठी एका व्यक्तीला कमीत कमी १७०० वर्षांचे आयुष्य लागेल.
युट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत. त्यात ‘हाऊ टू’ श्रेणीतील व्हिडिओ सर्वाधिक वेगाने पाहण्यात येतात. शैक्षणिक कामासाठीही युट्यूबचा मोठा वापर होतो.
युट्यूबवर ४३ देशांच्या ६० भाषांमधील व्हिडिओ उपलब्ध आहेत. युट्यूबकडे १० हजारांपेक्षा जास्त जाहीरातदार आहेत. ते या माध्यमातून लाखो डॉलर्सचा नफा कमावितात. युट्यूबवर १५ हजारांपेक्षा जास्त चित्रपट उपलब्ध आहेत. तसेच सर्व व्हिडिओजचा १० टक्के कंटेंट एचडीमध्येही उपलब्ध आहे.
इतर वेबसाईटच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. युट्यूबचे जगभरात ४९ कोटी पेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. सरासरी एक प्रेक्षक १४ वेळा वेबसाईटवर येतो.
युट्यूब केवळ एक व्हिडिओ वेबसाईट नाही. तर जगातील दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अनेक जण समस्या आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युट्यूबवर येतात.
युट्यूबनंतर व्हीमियो, हूलू, ब्लिप टीव्ही इत्यादी अनेक वेबसाईट सुरु झाल्या. त्यापैकी अनेक साईट्स बंद पडल्या तर काही सुरु आहेत. युट्यूबवर म्युझिक व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय ठरतात. युट्यूबवर जवळपास २० टक्के कंटेंट हा म्युझिक व्हिडिओचाच आहे.
असं आहे हे युट्युबचं रंजक विश्व
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.