नीरज चोप्रा ते विकी कौशल – २०२१ मध्ये गुगलवर झाली या गोष्टींची तुफान चर्चा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०२१… कोरोनावर यशस्वीरीत्या मात करण्याचं हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आहे. २०२० या वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेली अस्वस्थता ही या वर्षात पूर्णपणे नाहीशी झाली. जागतिक पातळीवर ही लढाई सामाईकपणे जिंकण्यात इंटरनेट आणि विशेष करून गुगलने लोकांची खूप मदत केली हे निर्विवाद सत्य आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
२०२१ या वर्षात लोकांनी गुगलच्या माहिती महासागराचा भारतीयांनी कसा उपयोग करून घेतला? याची माहिती गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे. भारतीयांना यावर्षी काय जाणून घेण्याची उत्सुकता होती? हे क्षेत्रानुसार जाणून घेऊयात.
१. क्रीडा क्षेत्र:
क्रिकेट हा भारतीयांचा सर्वात आवडता खेळ आहे. आयपीएल कधी होणार? कुठे होणार? याबद्दलची उत्सुकता यावर्षी सर्वांनाच होती. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुद्धा यावर्षी असल्याने त्याचं वेळापत्रक, गुणतालिका हे विश्वचषक सुरू असतांना लोकांचे गप्पा मारण्याचे, माहिती शोधण्याचे आवडीचे विषय होते.
टोकियो ऑलम्पिक ही कोरोनाचं सावट दूर झाल्यावर होणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असल्याने पूर्ण जगाचं या स्पर्धेकडे लक्ष होतं. भारतीयांनी यावर्षी क्रिकेट खालोखाल कोणती माहिती शोधली असेल तर ती ‘टोकियो ऑलम्पिक’ होती. आणि का नसणार? नीरज चोप्रा या खेळाडूने भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकून जो आनंद दिला आहे त्यासाठी आपण कित्येक वर्ष वाट बघत होतो.
‘रातोरात स्टार होणे’ हे आजवर केवळ सिनेसृष्टीत व्हायचं, पण, नीरज चोप्रा या २३ वर्षाच्या मुलाने ते सर्व दंडक मोडीत काढले आणि यावर्षी तो लोकांना सर्वात जास्त उत्सुकता असलेला खेळाडू ठरला.
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्याची माहिती कळताच भारतीयांनी खूप जल्लोष केला. तो कोण आहे? विजयाची तयारी त्याने कशी केली? त्याचं बालपण कसं होतं? त्याच्या इतर आवडी काय आहेत? हे सर्व भारतीयांनी गुगलला विचारलं. सोशल मीडिया सुद्धा काही दिवस नीरज चोप्रामय झाला होता.
२. वैद्यकीय क्षेत्र:
एप्रिल – मे २०२१ मध्ये कोरोनाची भीती पुन्हा डोकं वर काढत होती. लस कुठे मिळेल? कोरोना टेस्ट कशी होते? कोविड हॉस्पिटल कुठे आहेत? ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळेल? हे २०२० मध्ये अग्रस्थानी असलेले प्रश्न यावर्षी दुय्यम स्थानावर आले होते.
‘कोविड वॅक्सिन नियर मी’, ‘कोविड टेस्ट नियर मी’ यासारख्या शोध मोहीम लोकांनी इतरांना फोन करून विचरण्यापेक्षा गुगलला विचारणं पसंत केलं. कोविन या ऍप्लिकेशन वरून “आपण घेतलेल्या डोसचं प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं ?” सारखे प्रश्न लोकांना सुरुवातीला खूप पडायचे.
—
- गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा…
- जगाचा नकाशा बनवतात तरी कसा? जाणून घ्या पहिल्यावाहिल्या नकाशाबद्दल
—
३. सिनेसृष्टी:
‘जय भीम’ या सिनेमाला आयएमडीबीवर ९.६ इतकी रेटिंग मिळाली आणि त्यानंतर हा सिनेमा काय आहे? कुठे उपलब्ध आहे हे प्रश्न सर्वांनाच पडले. कोणतीही प्रसिद्धी न करता केवळ कथानक आणि अभिनेता ‘सुर्या’ यांच्या जोरावर हा सिनेमा यावर्षीचा लोकांनी सर्वात जास्त शोध घेतलेला सिनेमा ठरला हे विशेष आहे.
त्या खालोखाल भारतीयांना ‘शेरशाह’ हा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावरील सिनेमा खूप आवडला, त्याबद्दल माहिती शोधली गेली.
२०२१ मध्ये ‘आर्यन खान ड्रग्ज प्रकरण’ ने सुद्धा भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे हे प्रकरण रोजच लोकांच्या कानावर पडत होतं आणि ‘सतत अपडेट्स मिळत रहावेत (विषय कोणता का असेना)’ असं वाटणारी जनता गुगल वर आर्यन खान प्रकरण फॉलो करत होती.
नकारात्मक कारणासाठी का असेना, पण या प्रकरणानंतर जाहिरात क्षेत्रात शाहरुख खानची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढल्याचं काही मार्केटिंग तज्ञांनी सांगितलं होतं. कारण आर्यन खान मध्ये उत्सुक असलेले लोक आपसूकच शाहरुख खानच्या प्रतिक्रियेसाठी गुगल कडे डोळे लावून बसले होते.
वर्ष सरत असतांना ‘विकी कौशल – कतरिना कैफ’ यांचं लग्न हे लोकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरला होता. विकी कौशल कोण आहे? कुठला आहे? दोघांच्या वयात किती अंतर आहे? ही सर्व माहिती लोकांनी गुगलवर शोधली.
लग्नाची पत्रिका, अतिथी यादी, लग्नाचे उखाणे अशा कित्येक आभासी माहितीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. या दोन्ही सेलिब्रिटींनी शेवटपर्यंत लग्नाबद्दल काहीच माहिती न सांगितल्याने ही उत्सुकता ताणली गेली आणि माळा पडेपर्यंत कायम राहिली. जयपूर किल्ल्यावरचे फोटो इन्स्टाग्रामवर आले आणि मग सर्व चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
४. जागतिक, राजकीय क्षेत्र:
अफगाणिस्तानवर तालिबानी लोकांनी मिळवलेला ताबा आणि त्यानंतर तिथून सुटका करण्यासाठी लोकांचे झालेले आतोनात हाल हा या क्षेत्रात गुगलवर सर्वात जास्त शोधला गेलेला विषय ठरला.
पश्चिम बंगालच्या निवडणूकांची माहिती सुद्धा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शोधली गेली.
२०२० मध्ये सर्वात जास्त शोध घेतलेल्या विविध पदार्थांच्या ‘रेसिपी’ यावर्षी तितक्या प्रमाणात शोधल्या गेल्या नाहीत. कारण २०२१ मध्ये कधीच लॉकडाऊन सारखं काही घडलं नाही आणि इथून पुढे कधीच घडूही नये हीच प्रार्थना.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.