तरुणींनी या ६ सोप्या सवयी लावल्या तर पैशांसाठी कुणावरही अवलंबून रहावं लागणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात आजही बऱ्याच महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नाही. अगदी स्वतः कमावत्या असल्या तरी बऱ्याच जणींचे आर्थिक व्यवहार त्यांच्या घरातील पुरुषांच्याच हातात असतात. आणि बऱ्याच गृहिणींना तर आर्थिक स्वातंत्र्य कधी मिळतच नाही. घर चालवण्यापुरते पैसे त्यांच्या हातात असतात पण स्वतःच्या खाजगी गरजांसाठी मात्र त्यांना नवऱ्यावर किंवा इतरांवरच अवलंबून राहावे लागते.
आता काही घरातील पुरुष स्वतःच्या आईचा, पत्नीचा विचार करून त्यांना काही मागावे लागणार नाही याची काळजी घेतात. पण बऱ्याच महिलांना नवऱ्याकडे स्वतःच्या काही गरजांसाठी पैसे मागण्यात संकोच वाटतो. बरेच नवरे स्वतःच्या पत्नीच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात किंवा फारसे महत्व देत नाहीत. अशावेळी त्या महिलांची खूप कुचंबणा होते.
पण महिलांनो तुम्ही जर तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये हा थोडा बदल केलात, पुढील सोप्या सवयी लावून घेतल्यात, तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अधिक सोपे जाईल. मैत्रिणींनो, तुमची स्वतःची बचत असणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला पैसे कसे वाचवायचे आणि गुंतवायचे हे माहित असले पाहिजे जेणेकरून आर्थिक निकड आली तर तुमच्याकडे नेहमी काहीतरी असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पुढील ६ सवयी सर्व महिलांनी अंगिकारल्या तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील.
१. कायम बजेटनुसारच खर्च करा
तुमची आर्थिक स्थिती सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने बजेट तयार करणे व त्याप्रमाणेच खर्च करणे हे पहिले पाऊल आहे. प्रत्येक हुषार व्यक्तीची सुरुवात याच पायरीपासून होते. सुज्ञ लोक आपले उत्पन्न बघून त्याप्रमाणे बजेट ठरवतात आणि बजेटच्या बाहेर जाऊन कधीही खर्च करत नाहीत.
बजेट सांभाळण्याचे अनेक मार्ग आहेत.त्यापैकी एक म्हणजे कायम खर्चाची नोंद ठेवणे. काहीजण त्यांच्या खर्चाची नोंद करण्यासाठी एखादी वही किंवा डायरी ठेवतात तर काही लोक विविध ऍप्लिकेशन्सचा वापर करतात. हे ऍप्स तुम्हाला बजेट बनवण्यात मदत करतात शिवाय तुमच्या खर्चाचा मागोवा देखील घेऊ शकतात.
हे ऍप्स तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांनुसार तुमचे बजेट सुधारण्यात आणि अपडेट करण्यात मदत करु शकतात. त्यामुळे कायम बजेट ठरवा, प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा म्हणजे खर्च बजेटच्या बाहेर जाणार नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकाल.
२. अनावश्यक खर्चाला आवर घाला
व्यवहारचतुर स्त्रीला कुठल्या गोष्टींना केव्हा प्राधान्य द्यायचे आणि अनावश्यक खर्चांना नाही कसे म्हणायचे हे चांगलेच माहीत असते. गरज नसताना उगाच केलेली भारंभार खरेदी, डिस्काउंट आणि ऑफर्सच्या मोहात पडून केलेली खरेदी ह्यापासून स्वतःला लांब ठेवा. कारण एखादे उत्पादन सवलतीच्या दरात असले तरीही तुम्ही पैसे खर्च करताच.
अर्थतज्ज्ञ सांगतात की आपली आर्थिक स्थिती आपल्या खर्चाच्या व्यवस्थापनावर ठरते. व्यवहारात तरबेज असणाऱ्या स्त्रिया कायम जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता जिथे जमेल तिथे बचत करू शकतात.म्हणूनच शक्य तितकी बचत करा आणि अनावश्यक खर्चाचा मोह टाळा.
३. डिस्काऊंट्स, ऑफर्स, व्हाउचर्सचा योग्य वापर करा
पैसे वाचवणे म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड करणे नव्हे. तुम्हाला आवश्यक असलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी डिस्काऊंट्स व ऑफर्सचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर करा.
आपल्याला हव्या असलेल्या उत्तम क्वालिटीच्या वस्तू सेलच्या काळात खरेदी करणे ही एक उत्तम युक्ती आहे. सणांच्या काळात अश्या भरपूर ऑफर्स सुरु असतात. ऑनलाइन ऑर्डर देण्यापूर्वी कूपन कोड आणि व्हाउचर वापरा.
स्वतःच्या आवडत्या ब्रँडवर आणि सेलवर लक्ष ठेवा व ऑफर्स असताना खरेदी करून पैसे वाचवा. बाजारात सर्वोत्तम उत्पादने खरेदी करताना कमीत कमी खर्च व्हावा यासाठी अश्या काही युक्त्यांचा वापर करा.
४. आपत्कालीन गरजांसाठी काही निधी राखून ठेवा
एफडी, गरज पडली तर लागतील म्हणून वेगळी ठेवलेली रोकड किंवा केव्हाही वापरता येणारे स्त्रीधन अर्थात सोने तुम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये वापरू शकताच. परंतु, ह्या शिवाय देखील बहुतेक आर्थिकदृष्ट्या स्मार्ट महिलांकडे आपत्कालीन निधी असतो जो त्यांच्या इतर बचतीपासून वेगळा असतो. हे पैसे आपत्कालीन परिस्थितीत कामी येऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते आपत्कालीन निधी हा तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान ६ पट असावा. मागच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा बऱ्याच जणांचे उत्पन्न बंद झाले होते तेव्हा अनेकांना याच आपत्कालीन निधीने तारले होते.
५. आधी बचत मग खर्च हा नियम पाळा
महिन्याच्या शेवटी बचत करणे शक्य होत नाही. जर तुम्ही पैसे वाचवण्याबाबत गंभीर असाल, तर तुम्हाला तुमच्या बजेटमधील रक्कम आधीच म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवावी लागेल.
बजेट आखताना ५०/२०/३० या नियमाचे पालन करा. म्हणजेच तुमच्या उत्पन्नातील ५०% भाग हा तुमच्या आवश्यक गरजा जसे की किराणामाल, भाडे, बिले ह्यात खर्च करा आणि ३०% भाग तुमच्या इतर आवश्यक गरजांसाठी राखून ठेवा आणि २०% बचत आणि गुंतवणूक करा.
–
- श्रीमंत व्हायचंय, पण कसं? जाणून घ्या.. श्रीमंतांच्या “या” १५ सिक्रेट सवयींमधून…!
- उत्पन्न कमी असो वा अधिक, तुमच्या उत्तम आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचे ५ प्रकार!
–
तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे प्रमाण बदलू शकता परंतु उत्पन्नाच्या किमान २०% तरी बचत करणे खूप महत्त्वाचे आहे.
६. उत्पन्नाचे नवे मार्ग शोधा
व्यवहारी महिला त्यांच्या नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त, उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. मोठे घर बांधून ते भाड्याने देणे, फावल्या वेळेत फ्रीलान्सिंग करणे किंवा काही अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी शिकवणी घेणे किंवा चांगले रिटर्न्स मिळतील अश्या ठिकाणी गुंतवणूक करणे यामुळे तुमचे मासिक उत्पन्न वाढू शकते.
नोकरीव्यतिरिक्त तुमचा एखादा छंदही तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.
तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर वर सांगितल्याप्रमाणे पैश्याचे योग्य नियोजन करणे व खर्चाला शिस्त लावणे आवश्यक आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.