व्यवसायाची गुरुकिल्ली सांगणारे मिलिंद तारे यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुकतंच नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन पार पडलं, संमेलन पाहिल्यासूनच चर्चेत होते, कारण संमेलनला पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना निमंत्रित केले होते, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यांचा विरोध सुद्धा केला होता. साहित्य संमेलन पार पडलं खरं मात्र याला गालबोट सुद्धा लागले…
लोकसत्ता वृत्तपत्राचे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली, साहित्यसंमेलनामध्ये अशी लाजिरवाणी घटना घडली. खरं तर साहित्यसंमेलन म्हणजे साहित्य प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी, त्यानिमित्ताने अनेक लेखकांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळते.
साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची पर्वणी असते, आज आम्ही या लेखात अशाच एका पुस्तकाबद्दल आणि त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात नेमकं कोणतं पुस्तक आहे ते…
आज मराठी माणूस व्यवसायात मागे अशो ओरड कायमच केली जाते, यावर श्री. मिलिंद तारे यांनी व्यवसाय करण्याबाबत एक पुस्तक लिहले आहे, ज्याचं नाव आहे बिजनेस सिक्रेट्स. या निमिताने आमच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधून पुस्तकाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
लेखकाचा परिचय :
बिजनेस सिक्रेट्स हे पुस्तक मिलिंद तारे यांनी लिहले असून ते स्वतः एक व्यावसायिक आहेत. पेशाने ते सिव्हिल इंजिनियर असून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी द्वारे अनेकांना व्यवसायासाठी मार्गदर्शन करतात. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर स्टार्टअप बिझनेस मेंटॉर म्हणून काम करतात.
अनेक स्टार्टअप कंपन्यांना त्यांनी प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. व्यवसाया व्यक्तिरिक्त ते अनेक पदावर कार्यरत आहेत. संगीताची आणि अभिनयाची देखील त्यांना आवड आहे.
पुस्तकाची संकल्पना :
पेशाने इंजिनीअर असलेल्या मिलिंदजींनी आपले स्वतःचे शिक्षण झाल्यावरच हे निश्तिच केले होते की, नोकरीच्या मागे न लागत स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा, ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी यात आपण करियर करू शकतो’, असा त्यांना आत्मविश्वास होता. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
व्यवसायच्या बरोबरीने त्यांनी अनेक इंजियरिंग कॉलेजेसमध्ये सिव्हिल इंजियरिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी यावर लेक्चर देण्यास सुरवात केली, तेव्हा त्यांचा अनेक तरुणांशी संपर्क झाला.
आजच्या तरुणांमध्ये व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छाआहे, मात्र ठोस मार्ग मिळत नाही, अनेक मुलांनी देखील त्यांना यावर पुस्तक लिहा असा पर्याय सुचवला, आपण सर्वच मुलांपर्यंत पोहचू शकत नाही हे लक्षात आल्यावर मिलिंदजींनी पुस्तक लिहायचे ठरवले, जेणेकरून पुस्तकांमार्फत त्यांचे विचार मुलांपर्यंत पोहचतील.
पुस्तकात नेमकं काय आहे?
जे लोक आपल्या सुरु असलेल्या व्यवसायाला कंटाळले आहेत किंवा ज्यांना नोकरीच्या बरोबरीने जोड धंदा सुरु करायचा आहे, अशा सगळ्यांचा विचार करून त्यांनी पुस्तकात विस्तृत मुद्द्यांमध्ये आपले विचार मांडले आहेत.
पुस्तकामध्ये अगदी सुरवातीलाच एका छान मुद्द्याला हात घातलाय तो म्हणजे नोकरी की धंदा करावा? हा प्रश्न कायमच अनेकांनापडतो किंवा ज्यांचे क्षेत्र चुकले आहे, असे वाटत राहते अशांसाठी यात मार्गदर्शन केले आहे.
ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे पण नेमका कोणता करावा? त्यासाठी काय तयारी करावी, आपली पॅशन कशी ओळखावी, आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल लोंकाना कसे सांगाल? असे मुद्दे जे खरं तर आपण लक्षात घेत नाही मात्र मिलिंदजींनी हे मुद्दे अगदी सोप्या भाषेत सांगितले आहेत.
ज्यांना स्वतःचे मॅनुफॅक्चरिंग युनिट सुरु करायचे आहे, त्यासाठीची पूर्व तयारी मग अगदी MIDC मधील जागा घेण्यापासून, सबसिडीसाठी काय करावे लागते, ते नेमके कोणत्या झोनमध्ये येते? यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली, ज्यात ते असं म्हणतात फूड इंडस्ट्रीसाठी, वुमन्स डेव्हलपमेंटच्या अंतर्गत वेगळी सबसिडी लागू होते, थोडक्यात सबसिडी बद्दलची विस्तृत माहिती सांगितली आहे.
खादी ग्रामोद्योगांना चालना मिळण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी नेमकं काय केले पाहिजे याचीही माहिती दिली आहे स्टार्टअप्स सुरु करताना गुंतवणूकदार कसा शोधायचा? स्टार्टअप्स सुरु करताना कोणते ऍग्रिमेंट करावे लागतात..याबद्दलची माहिती आहे.
पेटंटसारख्या मुद्दयांवर त्यांनी भर दिला आहे, त्यांच्या मते ‘आज भारत पेटंटच्या बाबतीत खूप मागे आहे तर जास्तीत जास्त लोकांनी हे पेटंटन्स आपल्या नावे करावे जेणेकरून पुढे आपल्यालाच त्रास नको’, तसेच नुसता व्यवसायावर भर न देता तो वाढवता देखील आला पाहिजे त्यासाठी डिजिटल मार्केटिंगच पर्याय त्यांनी सुचवला आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये अगदी छोट्या व्यवसायापासून ते मोठ्या व्यवसायाचे प्रमोशन करू शकतात.
तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांनासाठी त्यांनी एक मुद्दा लिहला आहे, आज अनेक महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते, अशा महिलांसाठी सुद्धा माहिती दिली गेली आहे. व्यवसाय करणे हे खरं तर पुरुषांपेक्षा स्त्रीला जास्त चांगले जमते असा ठाम विश्वास मिलिंदजींचा आहे. व्यवसायात आल्यानंतर गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी तसेच तज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनानंतरचे उद्योगविश्व :
मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांचे उद्योगधंदे ढासळले होते, नोकरदार वर्गाला सुद्धा यांचा ठपका बसला होता. आता हळूहळू पुन्हा एकदा जग सावरू लागले आहे. त्यामुळे आज जरी कोणाला एखादा उद्योग सुरु करायचा असल्यास त्यांच्यासाठी देखील या पुस्तकात मार्गदर्शन केले गेले आहे. नेमका कोणता व्यवसाय करावा? मार्केट सर्व्हे कसा करावा? असे मुद्दे मांडले आहेत.
–
- पांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी का पडतात? जाणून घ्या…
- आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं मनात खोल रुजवा; मग जीवनात अशक्य काहीच नाही!
–
याचबरोबरीने मिलिंदजींनी आमच्यासोबत इतर विषयांबाबत देखील चर्चा केली. महाराष्ट्र सरकारची उद्योगधंद्याला चालना देण्याबाबत तसेच भाऊबंदकीचा शाप यासारख्या विषयांवर मिलिंदजींनी आपली मते मांडली. मराठी तरुणवर्ग जास्तीत जास्त पुढे येऊन व्यवसायात उतरावा हीच एक प्रबळ इच्छा लेखकाची आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.