भारतातील या १० रस्त्यांवर रात्री प्रवास करण्याची डेरिंग चुकूनही करू नका!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सदर लेख उगाच अफवा पसरवण्यासाठी लिहिलेला नसून कृपया मनोरंजनाच्या दृष्टीने त्याचा आस्वाद घ्यावा.
==
भीती सगळ्यांनाच वाटते आणि भीती वाटणे हे स्वाभाविक आहे, पण गोष्ट जेव्हा भूता-प्रेतांची येते तेव्हा त्या भीतीचा आपण अंदाज लावू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या निर्जन हायवेवर रात्रीची गाडी चालवत असाल आणि अचानक –
एखादी पांढरी साडी घातलेली बाई तुम्हाला दिसली किंवा त्या रस्त्यावरून जाताना अचानक तुमच्या समोरून काहीतरी झटकन निघून गेले तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा घाबराल…!
आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्याच काही रस्त्यांबद्दल सांगणार आहोत, जे कुप्रसिद्ध आहेत चित्रविचित्र घटनांसाठी!
१. स्टेट हायवे-४९, ईस्ट कोस्ट रोड
हा दोन लेनचा हायवे आहे, जो ईस्ट कोस्ट रोड (ECR) नावाने ओळखला जातो. हा हायवे पश्चिम बंगालला तमिळनाडूशी जोडतो. चेन्नई ते पाँडेचेरी मधील हा रस्ता अविश्वसनीय घटनांमुळे खूप भीतीदायक आहे, खासकरून रात्रीच्या वेळी!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चालक सांगतात की, रात्रीची अचानक एक पांढरी साडी घातलेली बाई दिसते ज्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे ती बाई दिसल्यानंतर तापमान अचानक कमी झाल्याचे आणि रस्ता आपोआप छोटा होत असल्याचा भास अनेकांना झाला आहे.
२. दिल्ली कंटोनमेंट रोड
या रस्त्यावर सुद्धा पांढरी साडी नेसलेली बाई दिसते. येथील स्थानिकांना तर पक्की खात्री आहे की हा रस्ता झपाटलेला आहे. येथून रात्रीच्या वेळी एकट्याने जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे असे म्हणतात. काही जण तर छातीठोकपणे भूत पाहिल्याचे सांगतात.
३. रांची – जमशेदपूर NH-३३
हा असा हायवे आहे जेथे आकस्मिक अपघातांचे प्रमाण खूप जास्त आहे. मुख्य म्हणजे अनेक अपघात कसे झाले आहेत ते देखील अजून उलगडलेले नाही.या हायवेच्या दोन्ही टोकांना मंदिरे आहेत. असे म्हणतात कीमंदिरात पूजा केल्याशिवाय या हायवेवरून प्रवास करू नये, अन्यथा दुष्ट शक्तींशी गाठ पडतेच पडते.
–
- डेरिंगबाज आहात? मग जगातले हे ११ सगळ्यात भीतीदायक आणि चॅलेंजिंग खेळ एकदा अनुभवाच!
- हे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते!
–
४. मार्वे – मड आयलंड रोड
मुंबईचा मड आयलंड जेवढा सुंदर आहे, तेवढाच भीतीदायक तिथे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता खूप अरुंद आणि निर्जन असून वाहनचालकांनी सांगितले की -या रस्त्यावर रात्री लग्नाचा शालू घातलेली स्त्री भटकताना दिसते तसेच काही भीतीदायक आवाज सुद्धा ऐकावयास येतात.
५. कसारा घाट: मुंबई-नाशिक हायवे
मुंबई-नाशिक हायवेचा कसारा घाट नाशिक आणि मुंबईकरांसाठी परिचयाचा आहेच. पूर्वी इथे विचित्र गोष्टी दिसल्याच्या कित्येक गोष्टी समोर आल्या आहेत.
कधी कोणाला मुंडके नसलेली म्हातारी बाई दिसते, तर कधी कोणाला झाडावर बसलेला म्हातारा दिसतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडे असल्याने रात्रीच्यावेळी हा रस्ता तुमच्या धैर्याची परीक्षा घेतो.
६. कशेडी घाट : मुंबई – गोवा हायवे
हा घाट प्रत्येक चालकाचा कस पाहणारा आहे. इथे आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत आणि खूप लोकांनी आपला जीव गमावला आहे.
ट्रक पडणे, बस पलटी होणे आणि त्यात लोकांचे जीव जाणे रोजचेच झाले आहे. जे लोक या अपघातातून वाचले ते सांगतात की –
रात्रीच्या वेळी चालत्या गाडी समोर अचानक एक माणूस येतो आणि गाडी थांबवण्याची खूण करतो, ज्यामुळे अचानक गाडीवरचा ताबा सुटतो.
७. NH-२०९ : सत्यमंगलम वाइल्डलाइफ सँक्च्यूरी कॉरीडोर
वन्यप्राण्यांसाठी राखीव असणाऱ्या या क्षेत्रातून जाताना लोकांना कधीकाळी कुप्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पनची भीती सतावत असे.
परंतु आता भीतीदायक आवाज, अनोळखी सावल्या आणि अचानक दिसणारा उजेड यांमुळे चालकांची त्रेधातिरपिट उडते. काही जणांचे हे देखील म्हणणे आहे की या रस्त्यावर वीरप्पनचे भूत आहे.
==
- लडाखच्या टेकडीवर बंद गाड्या उताराकडे नव्हे, चढाच्या दिशेने जातात, वाचा हे रहस्य!
- भारतातल्या ७ रेल्वे स्टेशन्सवर असंही घडू शकतं! हे स्टेशन तर होतं चक्क ४२ वर्षं बंद…
–
८. ब्लू क्रॉस रोड
चेन्नईच्या या रस्त्यावर अचानक आत्महत्या वाढल्या आहेत. लोकांचे म्हणणे आहे की येथे आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या अतृप्त आत्मा रात्रीच्या प्रहरी येथे भटकत असतात.
अंधार झाल्यावर कित्येकदा पांढरी आकृती पाहिलेले लोक सुद्धा आहेत.
९. बेसेंट एवेन्यू रोड
सकाळ झाल्यानंतर चेन्नईचा हा रस्ता खूप गर्दीचा आणि रहदारीचा असतो परंतु सूर्यास्त झाल्याबरोबरच इथे भीतीदायक वातावरण निर्माण होते. रात्र होताच इथे विचित्र गोष्टी सुरु होतात.
येथे घडलेल्या काही काही गोष्टी तर हास्यस्पद आहेत, पण अंधारात हे सर्व नक्की कोण करते ते काही अजूनही उजेडात आलेले नाही.
१०. दिल्ली – जयपुर हायवे
भानगढचा भीतीदायक किल्ला तुम्हाला आठवत असेल, हा याच रस्त्यावर आहे. दिल्ली – जयपुर हायवेवर रात्रीच्या वेळी घडलेल्या अनेक गोष्टी आजही ऐकायला मिळतात.
येथून जाणाऱ्या वाहनचालकांचे म्हणणे आहे की त्यांनी अश्या काही गोष्टी पाहिल्या आहेत, ज्या बाहेर कोणाला सांगितल्या तर लोक त्यांना वेड्यात काढतील.तर असे आहते हे भारतातील ‘झपाटलेले’ रस्ते!
पण सध्याच्या विज्ञान युगात अश्या गोष्टी म्हणजे अफवाच आहेत असे म्हणूनच चालावे. कारण जोवर स्वत:च्या डोळ्यांनी काही पाहत नाही तोवर त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अफवांना फुंकर घालण्यासारखे होईल. असो –
जर उत्सुकता वाढलीच असेल तर या रस्त्यांवर होऊन जाऊ दे एक ऍडव्हेंचर ट्रीप!!!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.