गुजरात, बंगाल नव्हे तर मुंबईचे उद्योगपती या राज्यात मोठी गुंतवणूक करत आहेत…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही दिवसांपूर्वी बंगालची वाघीणअसेलल्या ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या, २०२४ निवडणुकांच्या तयारीसाठी त्यांनी जय्यत तयार केलेली दिसून येत आहे कारण त्या आज राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून भाजपला एक सशक्त विरोधक म्हणून एक फळी तयार करत आहे असे दिसून येत आहे.
ममता दीदींनी मुंबईत येऊन शिवसेनेतील आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची भेट घेतली मात्र भाजपने यावर चांगलीच टीका केली. भाजपच्या आशिष शेलार यांनी असे विधान केले की आता महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंगालला नेणार का? अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली.
याला प्रतिउत्तर म्हणून संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले आणि ते म्हणाले की मुंबईमधले उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत तेव्हा का नाही विरोध केलात. भाजप सत्तेत असताना त्यांच्यवर कायमच अशी टीका होत आली आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
उद्योगधंदे हे खरे तर त्या त्या राज्याला देशाला आर्थिक हातभार तर लावतातच पण मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील देत असतात. तसेच बाहेरच्या अनेक कंपन्या आज भारतात येऊ इच्छितात, जगप्रसिद्ध अँपल कंपनी देखील भारतात आयफोन तयार करणार असे बोलले जात आहे.
परकीय कंपन्या आपल्या राज्यात याव्या यासाठी त्या त्या राज्याचे मंत्री झटत असतात, मुंबई तर देशाची आर्थिक राजधानी आहे याच राजधानीतून अनेक व्यवहार, उलाढाली होत असतात. आज अंबानींपासून ते टाटांपर्यंत अनेक उद्योगपती मुंबईत राहून आपापले व्यवसाय सांभाळत असतात. आता याच मंडळींना गुंतवणुकीसाठी किंवा व्यवसायवृद्धी साठी नवे राज्य बघितले आहे ते नेमके कोणते चला तर मग जाणून घेऊयात…
व्यावसायिकांचे गुंतवणुकीचे राज्य नेमके कोणते?
पर्यटकांचे लाडकं असलेले रंगीला राजस्थान, याच राज्यात व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. नुकतंच विकी आणि कॅट ने देखील लग्नसाठी राजस्थानचा पर्याय निवडला, मोठमोठाले राजवाडे, ऐतिहासिक ठेवा, राजस्थानी संस्कृती, पधारो म्हारो देस सारख्या गाण्यातून आपुलकीपणा दिसून येतो.
–
- हिंदुजा कुटुंबातील आपापसातील भांडणांमुळे त्यांचीच करोडोंची संपत्ती धोक्यात…!
- श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात
–
खुद्द राजस्थान सरकारने याबाबतीत खुलासा केला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत १.९४ लाख करोड इतकी मोठी गुंतवणूक व्यावसायिक वेगवेगळ्या क्षेत्रात करणार आहेत अशी त्यांच्याकडूनच हमी आली आहे. राजस्थानच्या उद्योगमंत्री शकुंतला रावत यांनी मुंबईमधील एका गुतंवणुकी संधर्भात असलेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
शंकुतला रावत पुढे म्हणाल्या देशातील मोठ्या कंपन्या राजस्थानमध्ये वेगाने होत असलेल्या औद्योगिक विकासात सहभागी होऊ इच्छितात. JSW ग्रुप ने जैसलमेर भागात ४०,००० ते १०,००० मेगावॅट ऊर्जेचा प्रकल्प उभारणार आहेत. तसेच ग्रेनको एनर्जी कंपनीकडून देखील मोठ्या प्रमाणावर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत.
मुंबई विमानतळापासून चर्चेत आलेले अदानी ग्रुप, त्यांनीदेखील राजस्थानातील काही भागात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे, प्रामुख्याने गॅस क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. क्रिश फार्म कंपनी फार्म क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.
राजस्थानसारखं राज्य आज भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून असणारे या राज्यात आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने साहजिकच रोजगार देखील अनेकांना मिळेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.