भारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताला एकेकाळी सोन्याचा देश म्हणून ओळखले जाई आणि ते काहीसे खरेही होते म्हणा, कारण पूर्वीच्या काळी राजा-राजवाड्यांकडे आणि नगरातील इतर धनसंपन्न लोकांकडे भरपूर सोने, चांदी, हिरे, मोती असायचे.
पण ते आपल्या संपत्तीची माहिती गुप्त ठेवत असतं. विशेष गोष्ट म्हणजे अजूनही अश्या गुप्त खजिन्यांचा शोध लागलेला नाही.
आजही कित्येक जण या खजिनांच्या आशेने प्रयत्नशील आहेत पण अजूनही त्यांचे हात रिकामीच आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्याच काही दडलेल्या खाजिनांची माहिती देणार आहोत.
१) नादिर शाहचा खजिना –
नादिर शाहने १७३९ मध्ये भारतावर हल्ला करून दिल्ली काबीज केली होती. ह्या ह्ल्यामध्ये फक्त हजारो निर्दोष लोक मेले नाहीत तर शाह संपूर्ण दिल्लीच लुटून घेऊन गेला होता.
लुटलेल्या धनामध्ये मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिऱ्या बरोबरच लाखोंच्या संख्येत सोन्याच्या मुद्रा आणि दागिनेही होते.
कितीतरी वर्षांपासून ऐकण्यात येणाऱ्या गोष्टींवरून हे मानले जाते की युद्धाच्या त्या काळात नादिर शाह लुटलेल्या संपूर्ण धनावर लक्ष ठेवू शकला नाही. त्याच्या सैन्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि शिपायांनी ह्यामधील बहुतेक धन भारतातच लपवून ठेवले. या खजिन्यांचा शोध आजही सुरु आहे.
२) बिंबीसारचा खजिना –
इसवी सन पूर्व पाचव्या शतकात बिंबीसार नावाचा मगध राजा होता. ह्यानंतरच मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला होता. मानले जाते की बिहारच्या राजगीर मध्ये बिंबीसारचा खजिना लपवलेला आहे.
इथे असलेल्या दोन गुहांमध्ये (सोन भंडार गुहा) जुन्या लिपीमध्ये काही तरी लिहिले आहे, ज्याचा अर्थ आजवर कोणालाही लावता आलेला नाही.
–
हे ही वाचा – भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!
–
असे मानले जाते की यामध्येच खजिन्याशी निगडीत काही संकेत लपलेले असू शकतात. इंग्रज देखील या खजिनाच्या मागे लागेल होते. त्यांनी हा खजिना शोधण्यासाठी तोफेचा वापर केला होता. परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
लोकांच्या म्हणण्यानुसार इथे लिहिलेल्या संकेतांवरून कुठे दुसरीकडे लपवलेल्या खजिन्याचा नकाशा मिळू शकतो.
३) जहांगीरचा खजिना –
राजस्थान पासून १५० किलोमीटर लांब अल्वरचा किल्ला आहे. जुन्या गोष्टींवरून हे समजते की शहेनशाह जहांगीर मृत्यूच्या वेळी अल्वर मध्ये राहिला होता.
ह्यावेळी जहांगीरने आपला खजिना इथेच कोणत्यातरी गुप्त जागेवर लपवला होता. कितीतरी लोक मानतात की हा खजिना आजही इथेच कुठेतरी अल्वर किल्ल्यामध्ये दडलेला आहे.
४) राजा मान सिंहचा खजिना –
मान सिंह पहिल्यांदा अकबराच्या दरबारात मोठ्या हुद्यावर होते. १५८० मध्ये मान सिंहानी अफगानिस्तान जिंकले होते. मानले जाते की, ह्या लढाईत जिंकलेल्या खजिन्याला मान सिंहने कोणत्यातरी ठिकाणी लपवले होते.
ही गोष्ट इतकी खरी आहे की, स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने आणीबाणीच्या वेळी लगेचच ह्या खजिन्याला शोधण्याचे आदेश दिले होते. ह्या खजिन्याचा वाद घेऊन घेऊन खूप काळ सत्ताधारीपक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू होते. परंतु आजही हा खजिना गोष्टींमध्येच अडकून आहे, हा खजिना एका गुप्त ठिकाणी असल्याचे म्हटले जाते.
५) श्री मोक्कबिंका मंदिराचा खजिना –
कर्नाटकच्या पश्चिमी घाटात कोलूर मध्ये स्थापित असलेल्या मोक्कबिंका मंदिरात खजिना असल्याचे म्हंटले जाते. मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे मंदिरात सापांचे खास निशाण बनलेले आहेत.
असे म्हणतात की लपवलेल्या खजिन्यांची रक्षा साप करतात. जुन्या काळात खजिना लपवणारे अश्या प्रकारची सांकेतिक चिन्हे बनवत असत. या मंदिरामध्ये ठेवलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आतापर्यंत खजिन्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही आहे.
६) कृष्णा नदीचा खजिना –
आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये कृष्णा नदीच्या तठाचा परिसर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. एके काळी हा परिसर गोवळकोंडा राज्यात होता.
विश्व प्रसिद्ध कोहिनूर हिरा पण इथल्याच खाणींमधून काढण्यात आला होता. मानले जाते की या तठावर अजूनही हिरे मिळतील म्हणून लोक आशेने शोध मोहीम चालवतात.
===
हे ही वाचा – “टाटा स्टील” वाचवण्यासाठी उपयोगात आला “ग्वाल्हेरचा खजिना”! काय आहे कनेक्शन?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.