' प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकारांची जादु मात्र बिग बॉसच्या खेळात फिकी पडली – InMarathi

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकारांची जादु मात्र बिग बॉसच्या खेळात फिकी पडली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘बिग बॉस’ मराठीचं घर सध्या चांगलंच गाजत आहे. तिसरा सिझन अंतीम टप्प्यात आला असताना घरातील आठ सदस्यांमध्ये रंगणारे वाद, भांडणं, गॉसिप्स यांमुळे प्रेक्षकांना चांगलंच खाद्य मिळत आहे.

स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचताना काही स्पर्धकांच्या पाठीवर प्रेक्षकांनी कौतुकाची थाप दिली मात्र काही सदस्यांचा खेळ न आवडल्याने त्यांना थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला.

 

big boss inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

केवळ या सिझनमध्येच नव्हे तर यापुर्वीच्या दोन्ही सिझनमध्ये असे काही सदस्य होते, जे घरात येताना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र प्रेक्षकांच्या या अपेक्षांची पुर्तता न झाल्याने अखेरिस त्यांना आधीच घर सोडावं लागलं.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना प्रसिद्धी हा सर्वात महत्वाचा भाग असतो. बाहेरच्या जगात तुमची जितकी जास्त प्रसिद्धी, लोकप्रियता असते तितका जास्त फायदा घरात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी होतो, मात्र या तिन्ही सिझनमध्ये काही कलाकारांच्याबाबत हा निकष चुकीचा ठरला. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले, प्रचंड लोकप्रियता कमावलेले हे कलाकार प्रेक्षकांवर आपली जादु करण्यात अयशस्वी ठरल्याने वेळेआधीच घराबाहेर पडले.

कोण आहेत ते कलाकार? जाणून घेऊयात

१. अक्षय वाघमारे

यंदाच्या सिझनमधील दमदार कलाकार म्हणजेच अक्षय वाघमारे. पिळदार शरीरयष्टी, तितकाच साधाभोळा स्वभाव असा अक्षय घरातील सदस्यांच मन जिंकण्यात यशस्वी झाला.

 

akshay big boss inmarathi

 

प्रत्येक खेळातही त्याने दमदार कामगिरी केली, मात्र खेळाचा मुळ अर्थ, त्यातील बारकावे न समजल्याने पहिल्या दोन आठवड्यातच त्याने घराचा निरोप घेतला.

२. अविष्कार दार्व्हेकर

यंदाच्या सिझनमध्ये इतरांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारा कलाकार अर्थात अविष्कार! काही काळापासून तो प्रसिद्धीपासून दूर असला तरी काही वर्षांपुर्वी त्याने मालिका क्षेत्र गाजवले होते. मालिका, सिनेमा, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून तरुणींना आवडणारा हा त्यावेळेचा चॉकलेटबॉय आता घरात आला.

 

avishkar inmarthi

 

एकंदरित अनुभवाच्या जोरावर अविष्कार यंदाचा सिझन गाजवणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात घरातील सर्वात निष्क्रिय खेळाडू असा टॅग मिळवणारा अविष्कार घराबाहेर पडलाच.

३. सुरेखा कडची

घरात दाखल होताना शंभर दिवस राहण्याचा वायदा करणारी अभिनेत्री सुरेखा कुडची ही प्रेक्षकांना दिलेला शब्द पाळू शकली नाही.

 

surekha inmarathi

 

मालिकांमधून खाष्ट सासुच्या भुमिकेत असणाऱ्या सुरेखा यांचा दरारा असतो. मात्र हा दरारा घरात राखण्यात त्या अपयशी ठरल्या. टास्कमधील शक्तीसह युक्तीतही त्या चमक दाखवू न शकल्याने सुरुवातीला प्रेक्षकांंचा पाठींबा असूनही नंतर त्या एलिमिनेट झाल्याच.

४, विद्याधर जोशी

बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेता विद्याधर जोशी उर्फ बाप्पा घरात दाखल झाले आणि आपल्या खास शैलीत हा सिझन ते गाजवणार यावर अनेकांचं एकमत झालं.

 

vidyadhar inmarathi

 

इतर सदस्यांच्या तुलनेत वयाने मोठे असलेले विद्याधर जोशी आपल्या खट्याळ शैलीत धमाल आणतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. त्यांची प्रसिद्धी लक्षात घेता ते फिनालेतही ते पोहोचतील हा प्रेक्षकांचा अंदाज अखेर खोटा ठरला.

५. दिगंबर नाईक

खुमासदार शैलीत विनोदी रिअॅलिटी शो, चित्रपट गाजवणारा अभिनेता दिगंबर बिग बॉसच्या घरात धमाल उडवणार अशी प्रेक्षकांची खात्री होदतीय मालवणी भाषेतील व त्याचे जोक्स, खट्याळपणा अधिक काळ अनुभवण्याचीही प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र प्रत्यक्षात प्रेक्षकांची अपेक्षा फोल ठरली.

 

big boss digambar inmarathi

 

सुरुवातीला प्रेक्षकांनी भरभरून मतं देत त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकंदरित खेळाचा नेमका बाज लक्षात न आल्याने अवघ्या काही आठवड्यात दिगंबर यांनी घराचा निरोप घेतला.

६ आरती सोळंकी

बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये आरती घरात दाखल झाली आणि घरात एकच हशा पिकला. विनोदी भुमिका करणाऱ्या आरतीची प्रसिद्धी प्रचंड असूनही पहिल्या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात ती नॉमिनेट झाली.

 

arati inmarathi

 

एकंदरित पहिल्या टास्कमधील तिचा परफॉर्मन्स आणि घरातील वावर यांमुळे प्रेक्षकांनी नाराजी दाखवून तिला घराबाहेर काढणं पसंत केलं.

७ नंदकिशोर चौगुले

भुमिका विनोदी असो वा खलनायकाची, नंदकिशोर चौगुले प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत यात शंका नाही. प्रत्येक भुमिका समरसून करणारे नंदकिशोर पहिल्या सिझनमध्ये काहीसे उशीराने दाखल झाले. त्यामुळे खरंतर दाखल होण्यापुर्वी त्यांनी खेळ पाहिला असल्याने अधिक हुशारीने त्यांनी खेळणे अपेक्षित होते.

 

big boss nandkishor inmarathi

 

घरातील सदस्यांपेक्षा त्यांची प्रसिद्धीही अधिक होती. त्यामुळे प्रेक्षकांचे प्रेम, वयाचा अनुभव आणि प्रेक्षक म्हणून बिग बॉसकडे पाहिल्याने पुर्वनियोजितता यांमुळे ते फिनालेपर्यंत टिकतील अशी अपेक्षा होती. मात्र घरातील वाद, इतर सदस्यांशी वारंवार केलेली भांडणं, तीव्र राग हा त्यांचा स्वभाव न पटल्याने प्रेक्षकांनी त्यांना मतं न देता घराबाहेर काढले.

७. विनीत बोंडे

पहिल्याच सिझनमधील कलाकार म्हणजे विनीत बोंडे. लहानश्या उंचीमुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात धमाल करणारा विनीत बिग बॉसच्या घरात दाखल झाला तेंव्हा तो प्रसिद्धीच्या शिखरावर होता.

 

vinit inmarathi

 

सुरुवातीला त्याने खेळ समजून घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र खेळातील एकसुरीपणा, नकारात्मकता यांमुळे प्रेक्षकानी दुसऱ्याच आठवड्यात त्याला सर्वात कमी मतं देत आऊट केले.

बाहेरच्या जगात कितीही प्रसिद्धी असली तरी बिग बॉसच्या घराच्या चार भिंतीत तुम्ही कसे खेळता, कसे वागता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे सेलिब्रिटींना मागे टाकून फारसा प्रसिद्ध नसलेला कलाकारही कधी बाजी मारेल हे सांगता येत नाही.

यंदाच्या सिझनमध्ये ‘बिग बॉस ३’ ची ट्रॉफी कोण पटकावणार? असं तुम्हाला वाटतंय. कमेंट करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?