' ४८ वर्ष हवेत हात उंचावलेल्या साधूचं शरीर गुरुत्वाकर्षणालाही जुमानत नाही – InMarathi

४८ वर्ष हवेत हात उंचावलेल्या साधूचं शरीर गुरुत्वाकर्षणालाही जुमानत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सगळीकडेच विविध स्वभावांची माणसे आहेत. काही देवभोळी असतात तर काही अंधश्रद्धाळू, काही माणसे अगदी प्रॅक्टिकल आणि रॅशनल विचार करणारी आणि फक्त विज्ञान आणि लॉजिक मानणारी असतात तर काही मूर्ख माणसे देखील सापडतात.

माणसाचे मानसशास्त्र समजून घेऊन, त्यांची दुखरी नस अगदी बरोबर ओळखून त्याचा गैरफायदा घेऊन विविध ‘चमत्कार’ करून पैसा कमावणारी आणि भोळ्याभाबड्या जनतेला लुबाडणाऱ्यांची या जगात अजिबात कमी नाही. उलट अशा माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दिवसेंदिवस पुढे जात आहे. खरंतर त्यामुळे लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या व्यक्ती आणि घटनांवर विश्वास ठेवणारी माणसे आता कमी असायला हवीत, पण घडतेय मात्र उलटेच!

तंत्रज्ञानाचा वापर करून अंधश्रद्धा पसरवणारी माणसे देखील भरपूर आहेत आणि असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवणारी देखील माणसे असंख्य आहेत. अर्थात काही दुर्मिळ घटना अशाही असतात, की ज्यांचे वरकरणी कुठलेही लॉजिकल किंवा वैज्ञानिक स्पष्टीकरण आपल्याला सापडत नाही, पण त्या घटना आपण नाकारू शकत नाही. माणसाच्या बुद्धीपलीकडे देखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे गूढ अजून उकललेले नाही.

 

Superstitions IM

 

काही लोक इच्छाशक्तीच्या जोरावर असे काही अचाट करून दाखवतात, की आपल्याला त्यामागचे शास्त्रीय कारण लक्षात येत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे अमर भारती हे होत. अमर भारती हे एक साधू आहेत. काही लोक त्यांना ऋषी समजतात, तर काही लोक त्यांना रहस्यमय संन्यासी म्हणून ओळखतात.

अमर भारती हे एक अशी व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांची जिद्द आणि दृढ हेतूमुळे जगाला थक्क केले आहे. तब्बल ४८ वर्षांपासून ते एक हात हवेत उंचावून उभे आहेत. पण त्यांनी असे का आणि कोणासाठी केले असावे?

अमर भारती हे काही लहानपणापासूनच असे नव्हते. काही वर्षांपूर्वी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते आयुष्य जगत होते. ते बँकेत कामाला होते. त्यांचे स्वतःचे पत्नी आणि तीन मुले असे कुटुंब होते. त्यांच्या आयुष्यात तसे सगळे व्यवस्थित सुरु होते..

एके दिवशी अचानक त्यांनी कुटुंब,संसार, नोकरी, मित्र-नातेवाईक हे सगळे सोडून धार्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान शंकराच्या पायी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

 

amar bharati inmarathi

 

संन्यास घेतल्यानंतरही अमर भारती यांच्या मनात अशा गोष्टी करण्याची इच्छा होत असे ज्या एखाद्या साधुसाठी किंवा संन्यास घेतलेल्या व्यक्तीसाठी वर्जित आहेत. आपले मन केवळ देवाच्या ठायी असावे आणि इतर कुठलेही विचार मनात येऊ नयेत तसेच भगवान शंकरावरची आपली भक्ती व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी एक हात हवेत उंचावून तो आयुष्यभर तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला.

आपल्याला शाळेत हात वर करण्याची शिक्षा झाली की काहीच वेळात आपले हात दुखू लागत असत. एखाद्या सामान्य माणसाला असा हात हवेत ५ मिनिटंही धरून ठेवणं शक्य नाही, पण अमर भारती यांनी १९७३ सालापासून त्यांचा हात असाच हवेत उंचावून ठेवला आहे. तेव्हापासून आजतागायत त्यांनी हात खाली केला नाही.

सुरुवातीला हे सोपे नव्हते. त्यांना खूप वेदना होत होत्या. पण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी त्या सगळ्या वेदनांवर विजय मिळवला. सगळ्या वेदना सहन केल्या.

 

amar bharati inmarathi1

 

सुरुवातीची दोन वर्षे त्यांच्या हाताला वेदना जाणवत होत्या, पण त्यानंतर हळूहळू हात इतका बधीर झाला, की त्यांची दुखण्याची भावनाही नाहीशी झाली. त्यांचा हात कायमचा बधिर झाला. आज इतकी वर्षे झाली तरी त्यांचा हात कायमचा हवेतच राहिलाय. आता त्यांना तो हात खाली आणण्याची इच्छा झाली तरीही तसे करणे त्यांना शक्य नाही.

हात हवेत उंचावून ठेवण्यामागे अमर भारती यांची शिवाप्रती भक्ती तर होतीच त्याशिवाय दुसरा हेतू म्हणजे समाजहिताच्या भावनेतून जागृत होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या मनात जागतिक शांततेची इच्छा आणि युद्धाविरुद्धच भावनाही होती.

 

amar bharati inmarathi2

 

एका मुलाखतीत ते अमर भारती म्हणाले होते, की “आपण एकमेकांशी का भांडतो, आपल्यात इतका द्वेष आणि वैर का आहे? सर्व भारतीयांनी शांततेत राहावे अशी माझी इच्छा आहे. किंबहुना संपूर्ण जगात शांतता नांदावी अशी माझी इच्छा आहे.”

आज जगातील अनेक लोक अमर भारतींना ओळखतात. काही लोकांनी त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्नही केला, परंतु ते अयशस्वी झाले. पण अमर भारती आजही त्यांचा हात पूर्वीप्रमाणेच हवेत उंचावून आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड मोडणे अजून तरी कुणाला शक्य झाले नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?