' नोकरावर समलैंगिक अत्याचाराचे आरोप, आली मंत्रीपद गमावण्याची नामुष्की – InMarathi

नोकरावर समलैंगिक अत्याचाराचे आरोप, आली मंत्रीपद गमावण्याची नामुष्की

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकीय व्यक्तींसाठी त्यांची ‘सामाजिक प्रतिमा’ ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. ते कोणतंही आर्थिक नुकसान पचवू शकतात. पण त्यांच्यावर तसेच त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तींवर झालेल्या एखाद्या आरोपाला तोंड देणं हे त्यांना परवडणारं नसतं.

सध्याच्या ‘सोशल मीडिया’च्या जगात जिथे सामान्य माणसाचं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणं हे त्याला आव्हान झालं आहे तिथे राजकीय, सेलिब्रिटी व्यक्तींची परिस्थिती तर फारच बिकट म्हणावी लागेल.

 

maharashtra politician inmarathi

 

‘राघवजी लक्ष्मी सावला’ या माजी भाजपच्या नेत्याच्या संदर्भात तर हे अगदीच लागू पडतं. १९४६ पासून राष्ट्रीय सेवक संघ आणि नंतर भाजप कार्यकर्ता, दोन वेळेस मध्यप्रदेश मधील ‘विदिशा’ मधून खासदार म्हणून काम बघणाऱ्या राघवजी यांचं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका चुकीमुळे राजकीय करिअर समाप्त झालं होतं. काय झालं होतं ? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

राघवजी लक्ष्मी सावला यांचा जन्म ७ जुलै १९३४ रोजी मध्यप्रदेश मधील विदिशा येथे झाला होता. १९५८ मध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

 

savala inmarathi

 

१९६७ मध्ये राघवजी हे विदिशा येथून खासदार म्हणून निवडून आले. १९७७ ते १९७९, १९८९ ते १९९१ या काळात ते लोकसभेत भाजपचे खासदार होते. १९९१ ते १९९२ आणि नंतर १९९४ ते २००० पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी ‘राज्य अर्थमंत्री’ हे पद भूषवलं होतं. २००३ पासून परत मध्यप्रदेशच्या राजकारणात सक्रिय झालेल्या राघवजी यांनी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पांवर काम केलं होतं.

सेवा आणि वस्तुकर यांची राज्यात अंमलबजावणी करण्यात त्यांनी केंद्र सरकारला कित्येक सुधारणा सांगितल्या होत्या. १९६७ ते २०१३ या ४८ वर्ष त्यांचं राजकीय करिअर बहरत होतं. पण, त्याच वर्षी एक आरोप त्यांच्यावर लागला आणि त्यांची राजकीय वाटचाल तिथेच थांबली.

 

rajyasabha 1

 

राघवजी लक्ष्मी सावला हे २०१३ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी मध्यप्रदेशचे अर्थमंत्री म्हणून काम बघत होते. ५ जुलै २०१३ या दिवशी त्यांच्या घरात कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या राजकुमार डांगी या नोकराने राघवजी यांच्यावर हबिबगंज पोलीस स्थानकात जाऊन आरोप केले की, “राघवजी हे माझं लैंगिक शोषण करतात. मला एकट्यात ते राजकुमारी या नावाने हाक मारतात.

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून ते मला अशी घृणास्पद वागणूक देत असतात. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पुरावा सुद्धा आहे. मी हे पुरावे तुम्हाला देईल, फक्त माझ्या कुटुंबाची तुम्ही काळजी घ्या.”

शेर सिंग आणि सुरेश सिंग या दोन नोकरांनी राजकुमार डांगी याच्या आरोपांचे समर्थन केले होते, पोलिसांनी राघवजी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. राघवजी ही बातमी कळताच फरार झाले होते.

 

fir inmarathi

९ जुलै २०१३ रोजी पोलिसांना त्यांना भोपाळमधील त्यांच्या फ्लॅटवर पकडण्यात यश आलं होतं. दरवाजा आतून लॉक करून बसलेल्या एकेकाळच्या राज्याच्या अर्थमंत्र्याला पोलिसांना दरवाजा तोडून अटक करावी लागली होती. वैद्यकीय तपासणीसाठी राघवजी लक्ष्मी सावला यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि नंतर त्यांची रवानगी हबिबगंज पोलीस स्थानकात करण्यात आली होती.

२२ जुलै २०१३ रोजी मध्यप्रदेश हायकोर्टाने राघवजी यांच्या जामीनाचा अर्ज फेटाळून लावला. ३४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर १३ ऑगस्ट रोजी त्यांना वयाच्या आधारावर जामीन देण्यात आला होता. मधल्या काळात, भाजपने त्यांची अनैतिक वागण्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

शिवराज सिंग चौहान हे भाजपचे मुख्यमंत्री असतांना झालेलं हे प्रकरण सोयीस्करपणे बंद करण्यात आलं असा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. पण, मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले होते आणि सांगितलं होतं की, “आम्ही सीडी प्रकाशात येण्याच्या एक तासातच राघवजी यांच्यावर कारवाई केली होती आणि त्यांचं त्वरित निलंबन सुद्धा केलं आहे.”

 

chauhan inmarathi

 

राघवजी लक्ष्मी सावला यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर अर्थमंत्री पदाची जबाबदारी जयंत मालवीय यांच्यावर सोपविण्यात आली होती.

राजकीय करिअरमध्ये इतकी उंची गाठलेला एखादा नेता असा कोसळू शकतो हे भारतीय राजकारणाने २०१३ मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं. आज राजकीय वर्तुळातील सर्वच लोकांनी राघवजी यांना वाळीत टाकलं आहे. त्यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा खटला हा आजही मध्यप्रदेश हायकोर्टात सुरू आहे.

राघवजी लक्ष्मी सावला हे लोकांना विदिशा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वेळी शेवटचे दिसले होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

 

savala 1 inmarathi

 

वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि व्यावसायीक आयुष्य वेगळं असं काही जण नेहमीच म्हणत असतात. तुमच्या वैयक्तिक जीवनाचे पडसाद हे व्यावसायिक जीवनावर आज ना उद्या पडतच असतात हे राघवजी लक्ष्मी सावला यांच्या उदाहरणावरून आपण नक्कीच म्हणू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?