' प्रत्येकाला प्रेरणा देईल पराग अग्रवाल यांची गरुडझेप! – InMarathi

प्रत्येकाला प्रेरणा देईल पराग अग्रवाल यांची गरुडझेप!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय कोणत्याही क्षेत्रात आणि जगाच्या कानाकोपऱ्यातही आपले अस्तित्व सिद्ध करतात याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. गुगलच्या सिईओ पदाची धुरा सांभाळणारे सुंदर पिचाई असो वा नासामध्ये सक्रीय असलेले भारतीय शास्त्रज्ञ, परदेशातही आपल्या बुद्धीच्या बळावर भारतीय वंशाचे वीर खिंड लढवत आहेत.

 

indians inmarathi

 

या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांनी ट्विटर सारख्या बलाढ्य आणि महत्वकांक्षी माध्यमाचा कारभार हाती घेतला आहे.

समस्त भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मात्र ज्यांनी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली ते पराग अग्रवाल नेमके कोण आहेत? यशाचे हे शिखर त्यांनी कसे गाठले? हे जाणून घेणेही गरजेचे आहे. त्यांच्या या यशोगाथेतून अनेकांना प्रेरणा मिळेल.

कोण आहेत पराग अग्रवाल 

मुळचे मुंबईकर असलेले पराग यांचे शालेय शिक्षण मुंबईतील अॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कुल येथून झाले. आयआयटी बॉम्बे मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी अमेरिका गाठली.

अमेरिकेतील स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटी येथून कम्प्युटर ऑफ सायन्समध्ये त्यांनी पीएचडी मिळवली.

 

parag inmarathi

 

शिक्षण सुरु असतानाच कुशाग्र बुद्धी आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी यांच्या बळावर पराग यांनी याहु, गुगल अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशीप पटकावली.

इंटर्नशीप दरम्यान त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी करून दाखवले. ‘आर्टिफिशिअल इंटिलीजन्स’ या विषयात त्यांचा हातखंडा असल्याने गुगलमध्ये त्यांनी नोकरीही मिळवली. काही वर्ष गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी २०११ साली ट्विटर कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.

यावेळी ट्विटरचा कार्यभार आता एवढा वाढला नव्हता. कंपनीत केवळ १००० कर्मचारी काम करत होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

टेक्नॉलॉजीचा गुरु

ट्विटर संस्थेत काम करताना पराग यांनी टेक्नॉलॉजीशी निगडित अनेक प्रयोग केले. आर्टिफिशिअल इंटिलिजन्समध्ये त्यांनी केलेल्या प्रयोगांचे नेहमीच कौतुक झाले.

कोणत्याही समस्येचे उत्तर पराग हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देत असल्याने त्यांना टेक्नॉलॉजीचा गुरु म्हटले जायचे. ट्विटर संस्थेत २०१८ साली त्यांच्यावर सीईओ पदाचा कार्यभार सोपवण्यात आला.

 

parag 1 inmarathi

 

त्यांच्या हाताखाली अनेक नवख्या, हरहुन्नरी तरुणांनी धडे गिरवले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या ट्विटरची नवी फळी तयार झाली आहे.

गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा…

लोणचं, मसालेदार करी बनवून भारतीय वंशाचा हा पट्ठ्या बनला ऑस्ट्रेलियाचा मास्टर शेफ

कर्मचारी ते सिईओ

ट्विटरचे मुळ सीईओ जॅक डोर्सी यांच्याच मार्गदर्शनाखाली पराग यांनी काम केले. मात्र जॅक हे स्वतः ट्विटरसह स्क्वायर या कंपनीचे सीईओ पदही भुषवत आहेत.

स्क्वायर या कंपनीची सुरुवातच स्वतः जॅक यांनी केली असल्याने दोन नामांकित कंपन्यांचे सिईओपद एकाच व्यक्तीने सांभाळावे या प्रश्नावर आजपर्यंत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले. यापुर्वी जॅक यांनी त्या प्रश्नांचे खुलासेही केले होते. मात्र कंपनीच्या निर्णयानुसार अखेर जॅक यांना एका कंपनीचे सीईओपद सोडावे लागणार असल्याचे जाहीर झाल्याने त्यांनी ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

जॅकनंतर या पदाचा कार्यभार कुणाच्या खांद्यावर सोपवला जाणार? ट्विटरचा वाढता आवाका लक्षात घेता ही महत्वपुर्ण जबाबदारी सांभाळण्यासाठी कुणाचा विचार होवू शकतो? अशा चर्चा सुरु असताना पराग अग्रवाल यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याने काल याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

parag jack inmarathi

 

कॅलिफोर्निया येथिल कार्यलायात हजारो कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टिम्स, ट्विटरचा वाढता आवाका, नवी आव्हाने या सर्वांची जबाबदारी भारतीय व्यक्ती सांभाळत असल्याची बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचीच आहे. पराग अग्रवाल यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?