या प्राचीन मंदिरातील प्रसाद घेऊन भक्त होतात ‘लगेच मालामाल’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देव, परमेश्वर, अल्लाह, खुदा, परमात्मा, ईश्वर, पर्वर्दिगर, मालिक, भगवान, उपरवाला असे एक ना अनेक नावांनी आपापल्या इष्ट देवतेला संबोधले जाते.
काहीही झालं तरी आपण ज्याच्यापुढे नतमस्तक होतो, ज्याचा आदर करतो,कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात सगळ्यात आधी ज्याचे नाव मनात येते / किंवा ज्याची आठवण होते,कसल्याही प्रसंगात ज्याचा आधार वाटतो,जो सदैव आपल्याच सोबत आहे असा दृढ विश्वास ज्याच्याबद्दल प्रत्येकालाच असतो तो ईश्वर आहे यात कसलीही शंका नाही.
ज्याच्या चरणाशी लीन होऊन रहावे आणि सगळा भार,सगळ्या चिंता त्याला सोपवून त्याच्या नावाचा जप करत रहावे असे प्रत्येकाचे श्रद्धा स्थान म्हणजेच परमेश्वर होय.
विविधतेत एकता हे आपल्या भारत देशाचे खास वैशिष्ट्य आहे आणि कायमच राहील कारण आपल्या देशात सर्वच धर्माची,जातीची भरपूर मंदिरे आहेत. सर्वच धर्माची लोकं आपल्या देशात फक्त राहत नाहीत तर सर्वच आपला धर्म,जात,सण- वार,रुढी – परंपरा यांचे खूप उत्साहाने आणि श्रध्देने पालन करतात.
कोणीही कोणाच्या जाती धर्मावरून कोणाला दुखवत नाही तर एकमेकांच्या धर्माचा आदर करतात, माहिती करून घेतात आणि सगळे मिळून एकमेकांच्या सणात सहभागी देखील होतात.
आपल्या भारत देशात भरपूर मंदिरे तर आहेतच पण नवल म्हणजे ही मंदिरे चमत्कारांनी आणि रहस्यांनी भरलेली आहेत. प्रत्येक मंदिराचे काही खास आकर्षण आहे. अशी बरीच मंदिरे आहेत ज्यांच्याशी संबंधित रहस्ये अजूनही उलगडलेले नाहीत.
असेच एक रहस्य म्हणजे मध्य प्रदेशच्या रतलाम मधील मानक येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिरात प्रसाद म्हणून चक्क सोने चांदी वाटतात. विश्वास बसत नाही ना पण हे खरे आहे.या महालक्ष्मी मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी चालूच असते.दिवाळीचा उत्सव या मंदिरात खूप खास असतो.
येथे येणारे श्रद्धाळू भक्त या दिवसात मातेच्या चरणाशी त्यांनी आणलेले दागिने किंवा रोख रक्कम देतात. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या चलनी नोटा आणि दागिने सजावटीसाठी वापरले जातात. कारण धनत्रयोदशी पासून ते दिवाळी पर्यंत पाच दिवस दीपोत्सव साजरा केला जातो तसेच या दरम्यान पूर्ण मंदिर अगदी भिंतीपासून ते खांब, छत, झुंबरपर्यंत सगळेच नोटांनी सजवले जाते.
–
- पाकिस्तानात आहेत ही प्रसिद्ध “हिंदू” मंदिरं, विश्वास बसत नाहीये ना! मग हे वाचा
- या मंदिरातील मूर्ती ‘चक्क’ ३ वेळा रंग बदलते, कुठे आहे हे अद्भुत मंदिर?
–
माता महालक्ष्मीला फुलांनी नव्हे तर हिरे,मोती,भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी आणि करोडो रुपयेनी सजवले जाते. हेच दागिने किंवा रक्कम भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात दिली जाते.त्यासाठी ओळखीची कागदपत्रे सादर केली जातात.
कारण धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत माता महालक्ष्मी क्या चरणी आणि त्यांच्या दरबारात जे काही अर्पण केले जाते ते गुणगुणत होते,द्विगुणित होते अशी समजूत आहे आणि करोडो भाविकांची श्रध्दा सुद्धा.असे केल्याने घरात सुख समृध्दी रहाते.
दिवाळीच्या दिवसात हे मंदिर कडक पोलिस बंदोबस्तात असते. या दरम्यान कुबेराचा दरबार लावला जातो.दिवाळीच्या दिवसात या मंदिराची कपाटे चोवीस तास उघडी असतात. कोणताही भक्त खाली हाताने जात नाही. असे म्हटले जाते की धनत्रयोदशी दिवशी महिला भक्तांना कुबेराची पोटली आणि दिवाळीच्या दिवशी काहीना काही दिलेच जाते.
ऐकुन नवल वाटले ना पण रहस्य छान आहे ना ?? तर मग सुखी समाधानी आणि समृध्द होण्यासाठी या मंदिराला एकदातरी निश्चितच भेट द्यायला हवी. हो ना??
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.