हनीट्रॅप – कोल्हापुरच्या व्यापाऱ्याने गमावले ३ कोटी; शेवटी वाचवले पोटच्या पोराने…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती के के मेनने अभिनय केलेल्या स्पेशल ऑप्स १.० या वेबसिरजची, याआधी तिचा पहिला सीजन येऊन गेला होता. पहिल्या सीजन हा पूर्णतः आपल्या रॉ एजन्ट कसे देशाच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालत असतात. आताची सिरीज ही हनी ट्रॅप हा मुद्दा प्रकर्षांने मांडला होता.
आज जसे सायबर गुन्हे वाढत चालले आहेत त्याच प्रमाणे एक गंभीर गुन्हा मोठ्या प्रमाणावर होतो तो म्हणजे हनी ट्रॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला पुरुषांना गंडा घालतात. पुरुषांना फसवणाऱ्या या महिला साध्यासुध्या नसतात तर आपल्या क्षत्रू राष्ट्राच्या गुप्तहेर देखील असू शकतात. देशाबद्दलची माहिती त्या अशा प्रक्रारे काढू शकतात..
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
हनी ट्रॅपचे नुकतेच प्रकरण आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये घडून आले आले. कोल्हापूरमधील एक व्यापारी असाच एका महिलेच्या जाळ्यात अडकत गेला आणि शेवटी आत्महत्येच्या पर्याय निवडला, काय आहे नेमकी भानगड चला तर मग जाणून घेऊयात…
गंडा घातला तरी कसा?
घटनेची सुरवात दोन वर्षांपूर्वी झाली म्हणजे २०१९ जेव्हा हाच व्यापारी कामाच्या निमित्ताने कोल्हापूरहुन मुंबईमध्ये आला होता, मुंबईत आल्यावर साहजिकच ऐशोआरामात राहणायसाठी त्याने फाईव्ह स्टार हॉटेलचा पर्याय निवडला. कामाच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत असतात मात्र याच भेटीगाठी कधी कधी आपल्यावरच भारी पडू शकतात.
–
- देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ ललना, सुंदर पण त्यापेक्षा जास्त खतरनाक!
- आयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ
–
हॉटेलमध्ये वास्तव्य असताना याच व्यापार्याची सपना मोनिका आणि अनिल यांच्याशी ओळख झाली, नंतर ही ओळख वाढत गेली. व्यापाऱ्याने त्यांना राहत असलेल्या रूममध्ये बोलवले, रूममध्ये जाताच त्या महिलांनी व्यापाऱ्याला धमकवायला सुरवात केली आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र विविध वृत्तपत्रांनी याबाबतची वेगवेळी माहिती सांगितली आहे,
काहींच्या मते, तीन मुलींपैकी दोन मुली रूममध्ये आल्या आणि त्यातील एका मुलीने कपडे काढण्यास सुरवात केली आणि दुसऱ्या मुलीने त्याचा व्हिडिओ काढून व्यापाऱ्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तर काहींच्या मते त्यातील एकच मुलगी रूममध्ये आली आणि काही काळानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरवात केली आणि व्यापाऱ्यावर विनयभंगाची केस टाकेन अशी धमकी सुद्धा दिली.
व्यापाऱ्याने आपल्या इज्जतीखातर तब्बल ३ करोड तीस लाख रुपये दिले, मात्र त्यांची यावर भूक भागेना त्यांनी पून्हा एकदा व्यापाऱ्याला धमकवायला सुरवात केली आणि १० करोड रुपयांची मागणी केली, व्यापारी हताश झाला होता, वर्षभर त्याला सतत धमक्या येत होत्या. त्याला काय करावे समजत नव्हते अशातच त्याने आपले आयुष्य संपवण्याचा विचार केला.
व्यापाराच्या मुलाला आपल्या वडिलांबद्दल घडत असलेल्या घटनेचा अंदाज येऊ लागला आणि त्या मुलाने आपल्या वडिलांना विश्वासात घेतले आणि त्यांच्याकडून घडलेला सर्व प्रकार समजून घेतला. मुलाने तातडीने स्थानिक पोलीस ठाणे गाठले.
पोलसांनी लगेचच आपली यंत्रणा कामाला लावली, आणि अखेर पोलिसांनी या टोळीमधील तिघांना जेरबंद तर केलंच तसेच या रॅकेटमध्ये आणखीन कितीजण सामील आहेत याची तपासणी करत आहेत.
आज समाजात अगदी सामान्य लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत अगदी सगळ्यांना गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, त्यामुळे आपण प्रत्येकानी वावरताना जबाबदारीने आणि आपले भान ठेवून वागायला हवे. अनोळखी लोकांशी जोवर खात्री होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी जवळीक अथवा मैत्री वाढवू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.