' फायटर जेट सुद्धा सहजरित्या उतरवण्याची क्षमता असलेला “पूर्वांचल एक्सप्रेसवे” – InMarathi

फायटर जेट सुद्धा सहजरित्या उतरवण्याची क्षमता असलेला “पूर्वांचल एक्सप्रेसवे”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुलतानपूर जिल्ह्यातील करवल खेरी येथे ३४१ किमी लांबीचा पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. हा उत्तर प्रदेश सरकारचा पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी सर्वात मोठा प्रकल्प आहे.

पंतप्रधान मोदी आज उद्घाटनासाठी C-130 हर्क्युलस विमानातून हवाई पट्टीवर उतरले. जुलै २०१८ मध्ये पंतप्रधानांनी आझमगढमध्ये पायाभरणी केल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला. पंतप्रधानांनी एक्सप्रेसवेवर विमान उतरवल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या महामार्गावर विमान उतरवू शकतो हे दिसून आले.

 

expressway inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला महुवा, आझमगड, बाराबंकी या प्रमुख शहरांसह प्रयागराज आणि वाराणसीशी जोडेल. हा एक्‍सेस कंट्रोल्ड एक्‍सप्रेसवे असल्‍याने, अपघात कमी होण्‍यासोबतच इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषण पातळी नियंत्रण यांसारखे फायदे मिळतील. तसेच या द्रुतगती मार्गात समाविष्ट असलेल्या क्षेत्रांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. कृषी, वाणिज्य, पर्यटन आणि इतर औद्योगिक विकासालाही चालना मिळेल..

 

express way inmarathi

 

या सोबतच पूर्वांचल एक्सप्रेसवे बद्दल आपण काही माहिती जाणून घेऊ,

हा उत्तर प्रदेश सरकारचा पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी सर्वात मोठा प्रकल्प असून त्याची किंमत अंदाजे २२,४९६ कोटी रुपये आहे, त्याला अविकसित पूर्वांचल प्रदेशासाठी “विकासाचा वाहक” म्हंटले आहे.

 

yogi adityanath inmarathi

हा एक्सप्रेसवे लखनौ-सुलतानपूर मार्गावरील लखनौ जिल्ह्यातील चांदसराय गावातून सुरू होतो आणि गाझीपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील हैदरिया गावात संपतो. सध्या हा सहा पदरी महामार्ग असून भविष्यात त्याचा आठ पदरी विस्तार केला जाऊ शकतो.

३४१किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेसवे लखनऊ ते बिहारमधील बक्सर दरम्यानचा प्रवास सात तासांवरून चार तासांपर्यंत कमी करेल. एकदा ते लोकांसाठी खुले झाल्यानंतर, लखनौ ते गाझीपूर प्रवासाची वेळ ६ तासांवरून ३.५ तासांपर्यंत कमी होईल.

यमुना एक्सप्रेसवेला नोएडा ते आग्रा जोडतो तर लखनौ-आग्रा एक्सप्रेस वे राज्याच्या राजधानीपर्यंत जातो. पूर्वांचल एक्सप्रेसवे यूपी-बिहार सीमेपासून सुमारे १८ किमी अंतरावर संपेल.

 

expressway 2 inmarathi

 

अंदाजे २२,५०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला, पूर्वांचल एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागांच्या आर्थिक विकासाला चालना देणार आहे. ज्यात मुख्यतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, महुवा आणि गाझीपूर, सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगढ, मारू या जिल्ह्यांचा समावेश करणाऱ्या महामार्गावर 18 उड्डाणपूल, सात रेल्वे ओव्हर ब्रिज, सात लांब पूल, १०४ छोटे पूल, १३इंटरचेंज आणि २७१अंडरपास आहेत.

 

expressway inmarathi 1

 

सरकारने द्रुतगती महामार्गालगत जमीन विकसित केल्या आहेत. उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाने या महामार्गालगत औद्योगिक हब विकसित करण्याची सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पूर्वांचल द्रुतगती महामार्ग राज्याच्या पूर्व भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असेल.

“हा द्रुतगती मार्ग पूर्व उत्तर प्रदेशचा कणा ठरेल. सुलतानपूरजवळील साडेतीन किमी लांबीचा पट्टा विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी एअरस्ट्रिप म्हणून विकसित करण्यात आला आहे,” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

द्रुतगती मार्गाचे उद्घाटन होत असताना, त्यात अद्याप पेट्रोल पंप किंवा लांबच्या प्रवासात आवश्यक असलेल्या अन्य सुविधा नाहीयेत. जे लोक रस्त्यावर प्रवेश करतात त्यांच्या वाहनांमध्ये काही अन्न आणि पाण्यासह इंधनाची टाकी पूर्णपणे भरलेली असणे गरजेचे आहे आहे कारण मध्ये कोणतेही रेस्टॉरंट व पेट्रोल पंप नाहीये.

 

petrol pump featured inmarathi
jagoinvestor.com

 

द्रुतगती मार्गावर प्रत्येक १००किलोमीटरवर दोन विश्रांती थांबे बांधण्यात येत आहेत. ते पूर्ण झाल्यावर या भागात रेस्टॉरंट्स, शौचालय सुविधा, पेट्रोल पंप, मोटार गॅरेज आणि इतर मूलभूत सुविधा बांधण्यात येतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?