' १३ तारीख अशुभ का मानली जाते? त्यामागची ‘ही’ कारणं तुम्हाला पटतात का? – InMarathi

१३ तारीख अशुभ का मानली जाते? त्यामागची ‘ही’ कारणं तुम्हाला पटतात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या समाजात आजही बरेच लोक जुन्या रिती, परंपरा या बरोबरच पिढीजात चालत आलेल्या काही गोष्टी डोळे झाकून पाळताना दिसून येतात.

जसं की मांजर आडवे गेले तर पाच पाऊले मागे जावे, तडा गेलेली काच घरात नसावी, शनिवारी नखे कापू नये, पायावर पाय टाकून बसू नये, सतत पाय हलवू नये, हा अमुक एक रंग वापरू नये असे बरेच काही.

 

indian-superstitions-inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या गोष्टी काहींना पटतात तर काही जणांना पटत नसूनही घरचे सांगतात म्हणून ऐकाव्या लागतात. हा खरंतर ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग आहे. श्रद्धा जरूर असावी पण डोळस असावी, त्यामागची कारणे पाळणाऱ्याला स्पष्ट असावीत नाहीतर ती अंधश्रद्धा ठरू शकते.

असंही पाहण्यात येतं की जे लोक या गोष्टी पाळतात त्यांना यामागचे कारण विचारले तर सांगताही येत नाही पण कटाक्षाने सगळ्या गोष्टी पाळतात मात्र.असो हा खूप मोठा चर्चेचा आणि वाद विवादाचा विषय आहे.

असेच काही वाद हे अंकांबद्दल, वाराबद्दल/दिवसांबद्दलसुद्धा दिसून येतात.अमुक एक अंक/दिवस शुभ किंवा अमुक एक अंक/दिवस अशुभ.

१३ हा आकडा त्यातल्या त्यात शुक्रवारी आलेली १३ तारीख ही अशुभ मानली जाते. साधारणपणे १३ तारीख शुक्रवारी वर्षातून दोनदा येते.

 

13 friday inmarathi

 

१३ तारखेची सुरुवात साधारणपणे रविवारी होते याला शास्त्रीय भाषेत त्रिस्कायदेका फोबिया असे म्हटले जाते तर शुक्रवारी येणाऱ्या १३ तारखेला परस्केविदा कत्रिया फोबिया असे म्हटले जाते.

ग्रेगोरियन लोकांच्या दिनदर्शिका नुसार कोणत्याही महिन्यांची १३ तारीख शुक्रवारी आली तर तो दिवस वाईट दिवस मानला जातो.

ग्रीक आणि स्पॅनिश लोकांच्या दिनदर्शिकानुसार गुरुवारी आलेली १३ तारीख वाईट मानली जाते तर इटलीतील लोकांच्या दिनदर्शिकेनुसार १७ तारीख असलेला शुक्रवार वाईट मनाला जातो.

आपल्या भारतात समुद्रमंथनाच्यावेळी घडलेली घटना १३ अंक अशुभ मानण्यासाठी कारणीभूत ठरते.अमर असलेले बारा आदित्यची नावे बारा महिने म्हणून ओळखले जातात. मंथन करतेवेळी अमृत वाटत असताना राहू आणि केतू या असुरानी स्वतःला देव आहे म्हणून अमृत प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हा सर्व देवांनी मोहिनीचे रूप घेतलेल्या विष्णूंना हा प्रकार सांगितला,तर असुरांच्या घशाखाली अमृत जाण्याआधी विष्णूने सुदर्शन चक्राने त्याचे डोके शरीरापासून वेगळे केले. तेंव्हापासून त्याच्या डोक्याला राहू आणि शरीराला केतू म्हटले जाते.

 

rahu ketu inmarathi

तर हेच राहू आणि केतू नंतर ग्रह म्हणून ओळखले जाऊ लागले, तोच तेरावा अमर ग्रह मानला जाऊ लागला. म्हणून तेरा अंक अशुभ मानला जातो.

US मधील आणि उत्तर कोरियामधील १७ ते २१ अब्ज लोक तापामुळे आजारी पडले, इतकेच नव्हे तर तापाची इतकी भीती बसली की लोक नेहमीचे रूटीन,बाहेर येणे जाणे टाळू लागले,तर बरेच लोक अंथरुणातून उठूच शकले नाहीत.

एका दिवसात ८००-९०० अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागले. तो दिवस इतिहासातील सगळ्यात भयावह दिवस म्हणून ओळखला गेला. दुर्दैवाने तो दिवस होता १३ डिसेंबर २०१९.

त्यामुळे ताण/ तणाव सांभाळणाऱ्या आणि भीतीची कारणे स्पष्ट करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार १३ तारखेची भीती सगळ्या लोकांच्या मनात निर्माण झाली.

 

13 number inmarathi

 

तर वरील पाहिलेल्या कारणांनुसार तेरा अंक अशुभ आहे असे मानले जाऊ शकते. कारण घडलेली प्रत्येक दुर्घटना ही १३ तारखेलाच घडली. पण घडणारी प्रत्येक गोष्ट ही विधिलिखित किंवा नियतीने ठरवलेली असते.

तो दिवस किंवा तारीख १३ असणं हा योगायोग सुद्धा असू शकतो, पण सातत्याने काही वाईट गोष्टी एकाच दिवशी घडत असतील तर आपणही ती गोष्ट वाईट आहे किंवा अशुभ आहे असे मानतो. बाकी हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे.

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?