' अवघ्या १० रुपयांपासून करा शहिदांच्या कुटुंबियांना मदत, या वेबसाईटच्या माध्यमातून! – InMarathi

अवघ्या १० रुपयांपासून करा शहिदांच्या कुटुंबियांना मदत, या वेबसाईटच्या माध्यमातून!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागे बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय याने छत्तीसगड मध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना २५ फ्लॅट देण्याचे घोषित केले होते. ह्या आधी अक्षय कुमार आणि गौतम गंभीर यांनी पण शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान केली आहे. जर तुम्ही सुद्धा यांच्यासरखे शहिदांच्या कुटुंबियांना मदत करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी गृह मंत्रालयाने एक उत्प मार्ग उपलब्ध करून दिला आहे!

सरकारने www.bharatkeveer.gov.in नावाचे नवीन संकेतस्थळ तयार केले आहे.

ह्या संकेतस्थळावरून तुम्ही थेट शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करू शकता. हे संकेतस्थळ तयार करण्याची विनंती अभिनेता अक्षय कुमारने सरकारकडे केली होती. तसेच केवळ विनंती करून तो थांबला नाही तर या संकेतस्थळाच्या निर्माणामागे त्याचा देखील मोलाचा वाटा आहे.

 

bharat-ke-veer-website-marathipizza01
phirbhi.in

१० रुपयांपासून १५ लाख रुपयांपर्यंतची मदत तुम्ही करू शकता 

कितीतरी लोक आपल्या देशासाठी असलेले कर्तव्य जाणतात, ते देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करू इच्छितात, पण तसे करणे त्यांना जमत नसते. हेच लक्षात ठेवून सरकारने ‘भारत के वीर’ नावाचे हे संकेतस्थळ चालू केले आहे.

या संकेतस्थळावरून तुम्ही कमीत कमी १० रुपये आणि जास्तीत जास्त १५ लाखांपर्यंत मदत करू शकता. पैसे जमा केल्यावर भारत सरकारकडून एक प्रमाणपत्र दिले जाते,जे तुम्ही डाऊनलोडही करू शकता.

या संकेतस्थळावर तुम्हाला शहीद झालेल्या सैनिकांची पूर्ण माहिती मिळेल

ह्या संकेतस्थळावर शहीद झालेल्या सैनिकांची पूर्ण माहिती दिली आहे. म्हणजे ते कुठे व कसे शहीद झाले, त्यांचा नंबर, वय, पत्ता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबात कोण – कोण आहेत,जे त्यांचावर अवलंबून होते, त्याबरोबर हे पण समजू शकते की शहीद झालेल्या सैनिकाला किती आर्थिक मदत दिली गेली आहे.

 

bharat-ke-veer-website-marathipizza02
hindustantimes.com

हे संकेतस्थळ हाताळणे खूप सोपे आहे.

लोकांना आर्थिक मदत करताना काही अडचण येऊ नये अश्या रीतीने संकेतस्थळाची आखणी करण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या होम पेज जाऊन ‘Enter’ बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यावर लगेचच तुम्हाला ‘Bravehearts’ चा पर्याय दिसेल.

त्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व शहिदांची माहिती मिळेल. नंतर ज्या शहीद सैनिकाच्या कुटुंबियांना तुम्ही मदत करू इच्छिता त्या सैनिकाच्या फोटो वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर ‘I would like to contribute’ हा पर्याय दिसेल.

या पर्यायावर क्लिक करताच मागितलेली माहिती देऊन तुम्ही सहकार्य करू शकता. ह्याच्यावरून आतापर्यंत ११६ शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली गेली आहे. या वेबसाईटचे अॅप्प देखील मोबिल फोन साठी उपलब्ध आहे.

 

bharat-ke-veer-website-marathipizza03
mygovernmentschemes.com

आपल्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावून आपले रक्षण करणाऱ्या या सैनिकांसाठी आपण त्यांच्या इतका त्याग करू शकत नाही,पण त्यांच्या कुटुंबियांना थोडी मदत करून हातभार नक्कीच लावू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?