या ५ पुस्तकांना मित्र बनवा; तुम्हाला काहीतरी जबरदस्त करून दाखवण्याची प्रेरणा देतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : निखील सुभेदार
===
कोणीतरी म्हणून गेलंय की, माणसापेक्षा पुस्तकांना आपला मित्र बनवा, ते तुम्हाला कधीही फसवणार नाहीत, तुम्हाला कधीही निराश करणार नाही. उलट नेहमी जीवनात तुमची साथ देतील, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवतील आणि समाजाचा खरा आरसा दाखवतील.
आज मी तुमच्यासमोर अशी ५ प्रेरणादायी पुस्तके मांडतोय.
ही पुस्तकं निराशेत गुरफटलेल्यांना आशेची नवी किरण दाखवतील. यशाचा खडतर मार्ग चोखाळू पाहणाऱ्यांना संयमाचे आणि मेहनतीचे धडे देतील.
तरुणांना नवा आत्मविश्वास देतील आणि प्रौढांना उत्तम साहित्य वाचल्याचे मानसिक समाधान देतील.
याच कारणांमुळे प्रत्येकाने ही ५ पुस्तके आपपल्या संग्रही ठेवायलाच हवीत!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
१) अग्निपंख :
वर्तमानपत्रे वाटून शिक्षण पूर्ण करणारे आणि संपूर्ण भारतीय जनतेचे लाडके असणारे माजी राष्ट्रपती श्री कलाम सर यांचे अग्निपंख पुस्तक वाचून मन खरंच उत्साहित होते.
हे पुस्तक वाचल्यानंतर दुर्दम्य आशावाद काय असतो याची प्रचिती येते.
संपूर्ण आयुष्य या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करणारे श्री कलाम सर यांचे हे पुस्तक खरोखरच खूप प्रेरणादायी आहे.
२) मुसाफिर :
हे दुसरे पुस्तक आहे एका इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बॉम्बे (IIT-B) या मानांकित संस्थेतून पदवी मिळवणाऱ्या एका अवलियाचे. हा अवलिया आहे प्रसिद्ध लेखक श्री अच्युत गोडबोले.
अच्युत गोडबोले यांच्या बद्दल जितके बोलावे तेवढे कमीच आहे. एक Chemical Engineer ते एक यशस्वी लेखक हा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे.
या पुस्तकात अच्युत गोडबोले यांनी त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे. या त्यांच्या जीवन प्रवासात येणारी आव्हाने कशी पेलली किंवा वैयक्तिक जीवनात येणारी आव्हाने खूप सुंदर अशा शब्दात मांडलेली आहेत.
आज एखाद्या computer engineer ला operating system बद्दल चार वाक्ये बोलायला किंवा लिहायला लावलीत तर त्याची त्रेधा तिरपीट उडेल.
परंतु या माणसाने operating सिस्टिम काय, कॉम्पुटर networks काय, संगीत,अर्थशास्त्र, व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत.
–
- “मटण ऐवजी माझी पुस्तकं घ्या!” नामदेवराव जाधवांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा धुराळा!
- विनोदी रामायण ते गांधीहत्येचं षडयंत्र उलगडणाऱ्या या १० पुस्तकांवर भारतात बंदी आहे!
–
३) इडली, ऑर्किड आणि मी :
या पुस्तकाचे लेखक आहेत श्री विठ्ठल कामत. आज विठ्ठल कामत यांचे नाव माहित नसणारा खाद्यप्रेमी सापडणार नाही. या पुस्तकात श्री कामत यांनी आपल्या जगातील पहिल्या अशा इको फ्रेंडली हॉटेलची सुरुवात करताना ज्या अनंत अडचणींना तोंड दिले ते या पुस्तकात मांडले आहे.
असे म्हणतात कि, माणसाला सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. या माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशी आर्थिक अडचण आली. परंतु या माणसाने त्याच्या संकटांवर मात करून एक आलिशान हॉटेल उभे केले.
हा त्यांचा प्रवास खरंच खूप प्रोत्साहित करणारा आहे. हे पुस्तक खरोखरच संग्रही असावे.
४) एक होता कार्व्हर :
हे पुस्तक वीणा गवाणकर यांनी मराठीत भाषांतरित केले आहे.
एक निग्रो मुलगा ज्याला त्याचे आई-वडील माहित नाहीये. त्याला असेच कोणीतरी सांभाळले, हाती येईल ती कामे म्हणजे कपड्यांना इस्त्री ते रंगकाम अशी सगळी कामे करून तो शिकत राहिला.
पुढे हाच मुलगा – अमेरिकेचा एक थोर शास्त्रज्ञ झाला…!
हा थोर शास्त्रज्ञ म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.
खूप प्रेरणादायी कथा आहे ही.
–
- पुस्तकांचा खजिना लुटा, भारतातील या सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’मध्ये!
- ही १० पुस्तकं वाचली नाहीत – तर मराठी वाचता येण्याचा काहीच उपयोग नाही!
–
५) स्टिव्ह जॉब्स याचे आत्मचरित्र :
आज iPhone किंवा iPad किंवा iPod माहित नसेल अशी व्यक्ती या जगात सापडणार नाही. कुठलेही तांत्रिक शिक्षण न घेता किंवा कुठलीही पदवी नसताना स्टिव्ह जॉब्स ह्याने जे साम्राज्य निर्माण केले आहे, याला खरोखरच तोड नाहीये.
शून्यापासून सुरुवात ते अॅपल कंपनीचा मालक, तिथून हकालपट्टी आणि मग परत शून्यावर आणि मग परत अॅपलमध्ये पुनरागमन!
खरंतर ह्या घटना चित्रपटात शोभतील अशा आहेत। परंतु या खरोखर स्टिव्ह जॉब्सच्या आयुष्यात घडल्या आहेत.
आपल्याला जर काही मोठं, वेगळं, खास असं साध्य करायचं असेल तर ही पाच पुस्तके खरोखरच वाचावीत. काहीतरी नावीन्यपूर्ण घडवण्यासाठी जी जिद्द लागते ती निर्माण करण्यासाठी ही पाच पुस्तके नक्की मदत करतील.
तुम्हाला आवडणारी अशी इतर कुठली पुस्तकं आहेत का? जी मनाला भावली, जीवनाला नवी दिशा-उमेद देणारी? असतील तर आम्हाला नक्की सांगा!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.