शिवसेना – भाजपचं भवितव्य काय? ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“१९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं” कंगनाच्या या स्टेटमेंटवरुन सध्या चांगलंच वातावरण तापलेलं आहे. तिने केलेल्या या वक्तव्यामुळे तिची पद्मश्री काढून घेण्याचीसुद्धा चर्चा सध्या चांगलीच रंगतीये.
या सगळ्या प्रकरणात कोणताही कलाकार काहीच बोलत नाहीये, बॉलीवूडमधून कुणीच कंगनाच्या बाजूने किंवा कंगनाविरुद्ध काहीच बोलत नाहीये, संपूर्ण बॉलीवुडने यावर मौन बाळगलं आहे, पण आता एका ज्येष्ठ मराठी कलाकाराने यात उडी घेतली आहे ते म्हणजे विक्रम गोखले!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
“कंगनाने केलेलं स्टेटमेंट योग्य आहे” आणि याला माझं समर्थन आहे अशी टिप्पणी त्यांनी केली असून त्यांच्या या स्टँडमुळे राज्यात बराच वादंग निर्माण झाला आहे. कलविश्वातलं कुणीच यावर भाष्य करत नसताना विक्रम गोखले यांनी घेतलेल्या या स्टँडमुळे बरीच उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
काही लोकं यामागे राजकीय हेतू असल्याची शक्यता वर्तवतायत तर काही लोकं कंगना आणणी विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर टिंगल टवाळी करतायत. फक्त कंगनाच नव्हे तर मुंबईच्या क्रूझ पार्टी प्रकरणावरसुद्धा विक्रम गोखले यांनी निशाणा साधला आहे.
या प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की “सीमेवर २१ वर्षाचा जवान जेव्हा गोळी लागून मृत्युमुखी पडतो तो खरा हीरो, आर्यन हा हीरो नाही, आर्यन किंवा शाहरुख माझं काहीच वाकडं करू शकत नाही!”
हे सगळं बोलताना विक्रम गोखले यांनी देशातल्या तसेच राज्यातल्या राजकारणावरसुद्धा टिप्पणी केली. “बाळसाहेब ठाकरे हे आमच्या नात्यातले होते, त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र वळणावर येऊन ठेपलं आहे. या सगळ्या राजकारणात फक्त सामान्य माणूसच भरडला जातोय.”
याबरोबरच शिवसेना आणि भाजपा यांनी पुन्हा एकत्र यायला हवं अशी मनातली इच्छासुद्धा त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारपुस केलेली आहे.
“त्यावेळीच मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षं वाटून घेतलं असतं तर काय फरक पडला असता?”
–
- “…तर मी पद्मश्री परत करेन!” कंगनाच्या या वादग्रस्त स्टेटमेंटमागचं सत्य
- बाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला!
–
असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. जातीवरून होणारे मतभेद यामुळेच महाराष्ट्र मागे पडतो आहे, खरे आंबेडकर या देशाला कधी कळलेच नाहीत.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीसुद्धा त्यांनी भाष्य केलं, त्यांच्यामते “मोदी हेच माझ्यासाठी नायक असून जे ७० वर्षात झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं, पक्षासाठी सगळेच काम करतात पण मोदी ही देशासाठी काम करतायत!”
“देशाला एकमेव उत्कृष्ट पंतप्रधान लाभले ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री, आणि त्यांची जयंती हेतुपुरस्सर पुसली जाते याचा खेद वाटतो” असंही विक्रम गोखले यांनी स्पष्ट केलं.
हे सगळं म्हणताना “हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहील” असं नमूद करून हिंदुत्वाबद्दलसुद्धा विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं.
ज्या प्रकरणाविषयी मोठमोठे कलाकार मौन बाळगून आहेत त्याबद्दल विक्रम गोखले यांनी अगदी स्पष्टपणे त्यांची बाजू मांडली आहे, त्यांनी केलेली वक्तव्यं योग्य की अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे, पण एक नागरिक म्हणून प्रत्येक कलाकाराने असं व्यक्त होणं अत्यंत गरजेचं आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.