भारतीयांचा मृत्यूदर वाढून आयुर्मर्यादा घटत चालली आहे का? तज्ञांचे मत…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात माणसाने खूप प्रगती केली आहे. पण, एखाद्या व्यक्तीचं आयुर्मान किती असेल ? हे मात्र अजूनही कोणीच नक्की सांगू शकत नाही. जन्म, मृत्यू या घटना आपल्या हातात नाहीयेत हे आजच्या पुरोगामी समाजाने निर्विवाद मान्य केलं आहे.
द्वापर युगात मानव हे शेकडो वर्ष जगायची हे आपण पुरातन काळाची माहिती देणाऱ्या मालिकांमधून बघितलं आहे. पण, सध्या मात्र विविध कारणांमुळे जगभरात लोकांचं सरासरी आयुर्मान हे सतत कमी होतांना दिसत आहे. भारतात सुद्धा चित्र वेगळं नाहीये. एक वेळी भारताचं सरासरी आयुर्मान हे ७२ वर्ष होतं, जे आज कमी होऊन ६९ पर्यंत आलं आहे.
कोरोना काळात आपण कित्येक कमी वयाच्या लोकांना जगाचा निरोप घेतांना बघितलंच आहे. पण, कोरोना न झालेल्या सिद्धार्थ शुक्ला (४०), पुनित राजकुमार (४६), इरफान खान (५३) यांचा अचानक झालेला मृत्यू हा सध्या वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
आपण आयुष्याचं खूप टेन्शन घेत आहोत का? अज्ञात भीतीमुळे आपण जगणं विसरत चाललो आहोत का? भारतीयांचं आयुर्मान कमी का होत आहे? या सर्व प्रश्नांवर मध्यंतरी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. काही डॉक्टरांनी यावर काय मत नोंदवलं आहे? जाणून घेऊयात.
जगभरातील लोकांच्या सरासरी आयुर्मानाचा अभ्यास केला की लक्षात येतं की, १९१८ मधील स्पेन, अमेरिका मधील तापाची साथ, २०२० मधील कोरोनाची वैश्विक महामारी सारख्या गोष्टींमुळे सरासरी आयुर्मान हे ७-८ वर्षांनी कमी होतांना दिसत आहे. त्यासोबतच, वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याने सुद्धा सरासरी आयुर्मान हे कमी होत आहे.
कमी वयात होणारे डायबिटीज, स्थूलपणा या गोष्टीसुद्धा कित्येक लोकांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूचं कारण म्हणून समोर येत आहे. भारतात सध्या उंचीला अनुरूप वजन नसलेले ३८% लोक आहेत असं ही या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.
हवामानात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं प्रदूषण, भेसळयुक्त खाद्यपदार्थ हे सुद्धा अचानक होणाऱ्या मृत्यूचं कारण असू शकतं असं तज्ञांचं मत आहे.
उपाय काय आहेत?
आरोग्यदायी जीवनशैली आपण जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत अशा अचानक मृत्यूच्या बातम्या या आपल्या कानावर पडतच राहतील असं मत काही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. आरोग्यदायी जीवनशैली मध्ये सकस आहार, नियमित व्यायाम आणि मनावर येणारा ताण कमी करणे या गोष्टींचा समावेश होतो.
कोरोनानंतर आपल्या प्रकृतीबद्दल लोक जागरूक होत आहेत, पुन्हा एकदा जिम कडे वळत आहेत हे सरासरी आयुर्मान वाढण्याची दृष्टीने केलेला चांगले बदल म्हणता येतील. प्रत्येक व्यक्तीने आता कोणत्याही व्यायामाच्या साधनांवर अवलंबून न राहता घरीच योगासन करावेत असं सल्ला सध्या सर्वच डॉक्टर देत आहेत. योगासन केल्याने तुमची शारीरिक आणि मानसिक प्रकृती ही कणखर होते हे आता सर्वांना मान्य झालं आहे.
तुमच्या कामाच्या ठिकाणी सायकलने जाणे या उपायाने सुद्धा आपण प्रकृतीची काळजी घेऊन अचानक येणाऱ्या मृत्यूला टाळू शकतोअसंही या सर्वेक्षणात समोर आलं आहे.
धूम्रपान, मद्यपान यांच्यापासून दूर राहणे आणि ७ ते ८ तास नियमितपणे झोप घेणे, दिवसभर स्क्रीन समोर न रहाणे हेसुद्धा आजारांना लांब ठेवण्यास आपल्याला मदत करू शकतात.
सामाजिक स्तरावरील उपायांवर बोलतांना काही तज्ञ असं सांगतात की, सरासरी आयुर्मान कमी होण्यामागे काही देशांतर्गत कलह सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. आज कित्येक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे ज्यामुळे छुपे हल्ले होत असतात आणि या सर्वांशी कोणताही संबंध नसलेले लोक मृत्युमुखी पडत आहेत. प्रत्येक देशाने ही नैतिक जबाबदारी स्वीकारून यावर काम केलं पाहिजे.
भारतातील राज्यनिहाय आकडे काय सांगतात ?
७ एप्रिल २०२१ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी जाहीर झालेल्या या सर्वेक्षणात भारतीय व्यक्तीचं सरासरी आयुर्मान हे आता ६९.४ वर्ष असेल असं जाहीर करण्यात आलं आहे.
चांगलं आरोग्य असण्यासाठी लोकांनी जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर हा आकडा वाढू शकतो असाही विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. १९७० च्या तुलनेत सांगायचं तर, त्या काळात अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे भारतीयांचं सरासरी आयुर्मान हे ४९.४ वरून आजचं ६९.४ वर्ष ही वाढ चांगली आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे.
–
- स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ‘मेनोपॉझ’चा त्रास होतो का? वाचा यामागची माहिती
- वाढत्या वयात “स्मरणशक्ती” शाबूत ठेवायची असेल तर जेवणात या गोष्टींचा समावेश कराच!
–
भारतातील दिल्ली, केरळ या राज्यात सरासरी आयुर्मान आणि त्याच्या अपेक्षा या ७५ वर्षांपर्यंत आहे असं सुद्धा समोर आलं आहे. भारताचं सरासरी आयुर्मान हे सर्वात कमी छत्तीसगढ येथे ६५ वर्ष इतकं आहे. भारताच्या ग्रामीण भागात सरासरी आयुर्मान हे ६८ वर्ष इतकं आहे. पुरुष आणि महिलांमध्ये तुलना केली तर असं लक्षात येतं की, महिलांचं सरासरी आयुर्मान हे ७० वर्ष आहे तर पुरुषांचं सरासरी आयुर्मान हे ६८ वर्ष इतकं आहे.
भारताचं सरासरी आयुर्मान कमी होण्यामागे जगातील ५० प्रदूषित शहरांपैकी ३५ शहर भारतात आहेत हे कारण सुद्धा अधोरेखित होत आहे. कॅन्सर आणि एकापेक्षा अधिक अवयवांची अकार्यक्षमता यांचं प्रमाण हे या प्रदूषणामुळे वाढत आहे हे स्पष्ट आहे.
सर्वांनी एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि प्रदूषण विरहित हवेसाठी संबंधित यंत्रणेकडे आग्रही असणे हेच भारताचं सरासरी आयुर्मान परत वाढवू शकेल असं संबंधित विषयावरील अभ्यासकांचं मत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.