अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या ‘मॉडर्ना’च्या कोविड-१९ लसीमागेदेखील आहे भारतीय वंशाची व्यक्ती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जगभरात सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवला, तेव्हा सगळ्याच देशातल्या शास्त्रज्ञांनी, औषध कंपन्यांनी त्यावर औषधे शोधण्यास सुरुवात केली, तसेच कोरोना होऊच नये यासाठी त्यावर लस शोधण्यावर मोठे काम जगात सगळीकडेच सुरु झाले.
यापैकी एक मॉडर्ना ही कंपनी सुद्धा आहे. मॉडर्ना कंपनीची लस जगभरात लाखो लोकांना दिली जात आहे. आपल्याकडे जरी ही लस आली नसली तरीही ही लस तयार करण्यात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मोठा वाटा आहे. या व्यक्तीचे नाव आहे मिहीर मेतकर.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH) च्या शास्त्रज्ञांना, ज्यांच्या सहकार्याने ही लस विकसित केली गेली त्यांनाही लसीचे शोधक म्हणून श्रेय दिले जावे, ही मागणी मान्य व्हावी म्हणून मॉडर्नाने दाखल केलेल्या दस्तऐवजात मेतकर यांचे नाव “फर्स्ट नेम्ड इन्व्हेंटर”म्हणून दिले आहे.
कोरोना महामारी लवकर आटोक्यात यावी म्हणून त्वरीत लस तयार करण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड कार्यक्रमांतर्गत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या संशोधनासाठी १.५३ अब्ज डॉलर्स प्रदान केले आहेत.
—
- अँटिबायोटिक्स आणि कॅन्सरवर जगात सर्वप्रथम शोध लावणारा, दुर्लक्षित भारतीय शास्त्रज्ञ
- ४० हून अधिक vaccine चा जनक; वाचवतोय दरवर्षी ८० लाख लोकांचा जीव
—
आरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना व्हायरस व्हॅक्सिनसाठी मेतकर यांनी पेटन्ट मिळवले. आणि मॉडर्ना कंपनीने कोरोना व्हॅक्सिनसाठी मिहीर मेतकर ह्यांना ‘फर्स्ट नेम्ड इन्व्हेंटर’ घोषित केले आहे. फर्स्ट नेम्ड इन्व्हेंटर म्हणजे ती व्यक्ती होय जी एखाद्या शोधासाठी प्राथमिक योगदान देते.
मिहीरना आणखी दोन आवेदनांमध्येही मॉडर्नाकडून नामांकन मिळाले आहे. ही दोन आवेदने अमेरिकन पेटन्ट ऑफिसमध्ये सादर करण्यात आली आहे.
या पेटंटच्या मूळ आवेदनामध्ये मिहीर मेतकर ह्यांच्यासह व्लादिमिर प्रेस्नायक व गिलोम स्ट्यूअर्ट जोन्स ह्या आणखी दोन संशोधकांची देखील नावे आहेत.
मॉडर्नाची लस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. पारंपरिक व्हॅक्सीन्स मध्ये एकतर व्हायरसचा मृत स्ट्रेन शरीरात टाकला जातो किंवा व्हायरसचा एक भाग शरीरात सोडला जातो. किंवा व्हायरसचा एक संशोधित जीन शरीरात सोडला जातो, पण या आधुनिक तंत्रज्ञानात मेसेंजर आरएनएचा वापर केला जातो.
हे मेसेंजर आरएनए शरीराला कोव्हीड १९ व्हायरस सारखेच प्रोटीन तयार करण्यासाठी संदेश देते. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्षम होते आणि कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.
बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये संशोधनाचे काम करणाऱ्या मिहीर मेतकर ह्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे हे विशेष. मिहीर मेतकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी मधून एमएससीचे शिक्षण घेतले आहे.
त्यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ह्या संस्थेत प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम केले आहे.
त्यानंतर त्यांनी मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कुल मधील आरएनए थेरेप्युटिक्स इन्स्टिट्यूट मधून पीएचडी केली व त्यानंतर त्यांनी पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काही काळ काम केले व नंतर २०१८ साली मॉडर्ना कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.
मॉडर्नाच्या एका वेगळ्या पेटंट आवेदनात मॉडर्ना कंपनीने बीटाकोरोना व्हायरस व्हॅक्सिनच्या एका संशोधनासाठी सनी हिमांशू या आणखी एका भारतीयाचे नाव दिले आहे. सनी हिमांशू हे डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस केले आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कण्ट्रोलच्या मते मॉडर्नाची लस अमेरिकेतील मुख्य दोन लसींपैकी एक आहे. आतापर्यंत अमेरिकेत मॉडर्नाचे १६४ दशलक्ष डोस दिले गेले आहेत. अमेरिका खेरीज युरोप व इतर काही देशांत सुद्धा मॉडर्नाची लस दिली जात आहे.
अमेरिकेत कोरोनाची दुसरी लस फायझर बायोटेकची दिली जात आहे. ही लस जर्मनीत तयार केली गेली. या लसीत एम-आरएनएचा वापर केला जातो. अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस देखील दिली जात आहे.
दोन भारतीयांचे नाव अमेरिकेत चमकले याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग असाच होत राहो आणि त्यांचे नाव असेच कायम चमकत राहो अशी भारतीयांकडून शुभेच्छा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.